Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी- कमी पटसंख्येचे कारण पुढे करत राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छात्र भारतीच्या मते, शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सदैव सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून राज्याला परिचित आहे. याच परंपरेत आता आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच ‘रक्षक दल’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, आज रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.…

Read More

महिला दिन विशेष… जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. संगमनेरच्या राजकीय पटलावर गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुण, सुशिक्षित आणि धडाडीच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. निवडणुकीच्या राजकारणात एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेली महायुती शून्यावर बाद होण्याची स्थिती निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल समोर आला. या विजयातून जिने प्रस्थापितांना विचार करायला भाग पाडले आहे. त्या म्हणजे संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी. उच्च शिक्षणाची शिदोरी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून समाजकारणात उतरलेल्या साक्षी सूर्यवंशी यांनी अत्यंत कमी कालावधीत महिलांच्या हक्कासाठी लढणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून…

Read More

अमेरिका खरोखरच भारताचा मित्र आहे की आणखी कोण? आजवरच्या इतिहासात भारताच्या उपयोगी न आलेल्या पहिल्या देशात ज्याचं नाव घ्यायचं ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. तो जर कोणाचा मित्र होत असेल तर त्यामागे प्रचंड सौदेबाजी आलीच म्हणून समजा. या सौद्यासाठी तो मित्राचीच काय पण सग्यांचीही गय करत नाही. तो आपल्या मित्राची आब राखेल हे कदापि शक्य नाही. अमेरिकेचा हा अनुभव जगातल्या अनेक देशांच्या पदरी असताना भारताने त्याच्यासाठी उघडलेली दारं हा आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विशाखापट्टणम इथे आयोजित ‘मिलन 2026’ या नौदल संचलनासाठी आपण पाचारण केलेल्या इराण नौदलाच्या आयआरआयएस देना या लढाऊ जहाजावर मागच्या दाराने हल्ला करून अमेरिकेने भारताला औकात दाखवण्याचा…

Read More

आजचे राशिभविष्य: रविवार, ८ मार्च २०२६ ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. ​वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. ​मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता ठेवा, यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल. ​कर्क: आज तुम्हाला भाग्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी “जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या घोषणांनी संगमनेर शहर शनिवारी अक्षरशः दणाणून गेले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने तब्बल सात तास शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक देखावे, ढोल-ताशांचा कडकडाट, अघोरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि अफजलखान वधाचा जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेपासून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. यावेळी शिवचरित्रकार एस. झेड. देशमुख, नीलम खताळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह…

Read More

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त काल संगमनेर शहरात निघालेली ऐतिहासिक पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता, तर ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे दर्शन ठरले, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक मिरवणुकीच्या आरतीचे मानकरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे ठरले. त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिवज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शिवसेना महिला आघाडी आणि तमाम सर्वपक्षीय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कतारी-चव्हाण म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  मार्चअखेर जवळ आल्याने संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांतील २२ नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत थकबाकीदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कर वसुलीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी श्वेता शिंदे, कर निरीक्षक बाजीराव नवले आणि वसुली विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची प्रसिद्धी बॅनर आणि वर्तमानपत्रांतून केली जाणार आहे. नगरपरिषदेने यापूर्वीच थकबाकीदारांना जप्ती आणि नळ कनेक्शन कापण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, त्यांचे हे यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या क्रीडा स्पर्धा केवळ खेळ नसून महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धांमधून मिळणारा आनंद आणि ऊर्जा महिलांना वर्षभराच्या कामासाठी नवी उभारी देईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित ‘महिला क्रीडा महोत्सव २०२६’ च्या शानदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत नावानिशी सांगितल्यानंतर, अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी या दोघांचीही तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार खताळ यांनी हिवाळी अधिवेशनापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीवर टीकेची झोड उठवली होती. जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा महापूर आला असून, हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी ‘सिस्टीम’च्या नावाने दरमहा सुमारे ९० लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता. केवळ आरोपच नव्हे, तर या वसुलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी…

Read More