Author: अनंत पांगारकर
नाशिक/संगमनेर: राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तत्काळ त्यांच्या पाठीशी उभे राहून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि आकडेवारी ही फसवी असून, त्यातून शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ते नाशिक रोड येथे आयोजित उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ.शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष कोतवाल, बी. एम. संदीप, आकाश छाजेड, हनीफ बशीर, गणेश पाटील, मुन्ना ठाकूर, डॉ. सचिन सावंत, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, रईस शेख, ॲड.…
संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना ठळक करण्यासाठी पुढाकार घेतला असून, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध आणि विकसित झालेल्या संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्समुळे विद्रूपीकरण वाढले होते. संगमनेर हायटेक बसस्थानक, इंजिनिअरिंग कॉलेज रोड आणि परिसरासह शहरातील अनेक दर्शनी भागात, चौकात, इमारतींवर, अगदी धार्मिक स्थळांचे सौंदर्य झाकोळून टाकणारे अवैध फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. यामुळे…
अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेचे (L.C.B.) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध कत्तलखाने आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर माहिती काढून कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि दिपक मेढे यांच्यासह पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतो, खैरे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, प्रमोद जाधव, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर, आणि भगवान धुळे यांचे…
मेष (Aries): आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी अधिक जागरूक राहण्याची आणि विशेषतः वरिष्ठांशी बोलताना आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत किंवा मनोरंजनात जाईल. सामाजिक स्तरावर सन्मान मिळेल. वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही जमीन-मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असाल, ज्यातून उत्तम लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक कामात लक्ष दिल्यास यश मिळेल. मात्र, सर्व काही ठीक असतानाही मनात काही नकारात्मक विचार डोकावू शकतात, त्यासाठी थोडा वेळ ध्यानधारणा किंवा निसर्गात घालवा. मिथुन (Gemini): तुम्ही आज मानसिकदृष्ट्या मजबूत…
संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराचे ‘विद्रूपीकरण’ थांबवण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी (९ ऑक्टोबर) एक कळकळीचे पत्र लिहिले आहे. शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टरमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार या पत्राच्या अनुषंगाने काय दखल घेतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. ‘एक संगमनेरकर’ म्हणून संवाद – तांबे यांनी हे पत्र आमदार म्हणून नव्हे, तर ‘एक संगमनेरकर’ म्हणून लिहिले असून, ते स्वतः देखील याप्रकरणी दोषी असल्याची कबुलीही देतात. राजकीय स्पर्धेत नाईलाजाने आवडत नसतांनाही आम्हाला उतरावे लागते, असे त्यांनी…
संगमनेर – नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले असून नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोलवसुली थांबवा असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. आमदार तांबे म्हणाले, पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होत होता. मात्र सध्या त्याच अंतरासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असून नाशिक ते पुणे हा प्रवास तब्बल सहा तासांपर्यंत वाढला आहे. महामार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापन यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.…
संगमनेर – प्रवरा चिट्स प्रा. लि. कंपनीच्या भिशी व्यवहारात दिलेला धनादेश अनादरीत झाल्याचे सिद्ध झाल्याने संगमनेर येथील कोर्टाने आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावत थकीत रक्कम महिनाभराच्या आत फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संगमनेरचे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. प्रवरा चिट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टचे कलम १३८ नुसार दाखल केलेल्या या खटल्यामध्ये सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी हे आरोपी होते. आठ वर्षे हा खटला सुरू होता. न्यायालयात ॲड. कुलभूषण महाले यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा कंपनीच्या भिशी योजनेचा सदस्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचा उद्देश असलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याबद्दल दोन तरुणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, (४ ऑक्टोबर २०२५) श्रीरामपूर येथील शाहिद हुसेन शेख (वय २१) आणि सात हशम सय्यद (वय २०) या दोघांनी परिसरामध्ये एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूरहून लोणी…
छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र अधिनियम गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक वसंत राऊत (वर्ग २) यांनी ही लाच स्वीकारली. आरोपी लोकसेवक, वसंत राऊत (वय ४३ वर्षे) हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात मदत करणे, पुढील कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करणे आणि न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपी राऊत यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,०००/- रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ८,०००/- रुपये निश्चित…
आज ०९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन. टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्वित्झर्लंड राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “पोस्ट फॉर पीपल” या थीमवर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात पोस्टाच्या विविध योजना,भूमिका सामाजिक व आर्थिक विकासातील योगदान याविषयी जनसामान्यांमध्ये…
