Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या १५९ व्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांतील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. १९७० मध्ये…
मुंबई: सध्या राज्यात मराठी-अमराठी वादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कडक आदेश जारी केले आहेत. यापुढे कोणीही त्यांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने स्वतःचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत किंवा व्यक्तिगत प्रतिक्रिया देऊ नयेत. महत्त्वाचे म्हणजे, पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषेच्या…
संगमनेर, ०९ जुलै २०२५- प्रतिनिधी: संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचे गोमांस आणि हत्यारं जप्त करण्यात आली असून, तिघे आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने, या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या अनुषंगाने माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी…
संगमनेर, प्रतिनिधी: भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रवरा, आढळा आणि म्हाळुंगी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अमृतवाहिनी प्रवरा नदीला आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पूजन करत आरती केली. प्रवरानदीच्या गंगामाई घाटावर हा सोहळा पार पडला. यावेळी प्रवरा नदीचे विधिवत जलपूजन आणि आरती करण्यात आली, तर म्हाळुंगी नदीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, अजित काकडे, प्रमिला अभंग, ॲड. मुन्ना…
संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करत उच्चांकी भाव दिला आहे. आता महाराष्ट्रात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने, कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन AI वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीबद्दल अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या…
संगमनेर, प्रतिनिधी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत कनोली येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपयांची मागणी या तलाठ्याने केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये घेताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांचे मित्र शासनाच्या धोरणानुसार मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू वाहतुकीचं काम करत होते. संगमनेरचे तहसीलदार यांनी या कामासाठी त्यांना मंजुरी दिली होती. मात्र, तलाठी संतोष शेलार यांनी या कामासाठी ३०…
मुंबई: राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई: मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच ठाणे-पालघरचे मनसे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने या मोर्चाचे आयोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असून, अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होती. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता…
महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करा: आमदार सत्यजित तांबेंनी विधान परिषदेत मुद्दा मांडला
मुंबई, 7 जुलै 2025: महाराष्ट्रात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिक जिल्ह्यातील ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आणि गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येची उदाहरणे देत तांबे यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली. आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला होता. त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षणाबाबत कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोमवारी दुपारी १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापूर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली आणि ओझर बंधारा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की, नदीपात्रात असलेले जनावरे, पाण्याचे पंप, शेती…
