Author: अनंत पांगारकर
संगमनेर | प्रतिनिधी शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून विक्रीसाठी आलेला साठा जप्त करावा, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत असून या जीवघेण्या मांजामुळे अनेक नागरिक आणि मुले जखमी होण्याच्या घटनांचे गांभीर्य मोठे आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. हा मांजा मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत असल्याने त्याचा वापर, साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नायलॉन मांजाची चोरटी विक्री रोखण्यासाठी शहरातील उपनगरांमधील सर्व दुकानदारांना सूचना देऊन त्यांच्यावर…
संगमनेर / अकोले- नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरुवातीच्या सर्वेक्षणाप्रमाणे म्हणजेच अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. या भागातील जनभावनेची सरकारने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. ‘नांदूर खांदरमाळ’ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरल्यानुसार, सर्व तालुक्यांमध्ये ‘लेटर टू सी. एम.’ ही व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहणार चळवळ- रेल्वेची ही मागणी तळागाळातील जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही मोहीम अधिक आक्रमक केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या…
संगमनेर- मराठी साहित्याचा गौरव करण्याची परंपरा जपत ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या वतीने सन २०२६ सालासाठी विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा कवितासंग्रह, गझल, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य, विनोद, चरित्र आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांसाठी एकूण १२ स्मृती पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्व. यशवंत चिंधू नेरे, स्व. विष्णूपंत माळोकार, स्व. सुंदर बोंगाळे, स्व. दिलीप दमाणे, स्व. रुक्मिणीबाई चवडेकर, शंकर घोरसे, स्व. भिमाई बाविस्कर, स्व. जयवंती तावडे, स्व. रत्नाबाई घोडके, स्व. शालिनी चिंचवडकर, ॲड. मदन फडणीस आणि स्व. पुष्पावती धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचा समावेश आहे. साहित्य पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी १५०१/- रुपये रोख, १०००/- रुपयांची पुस्तके,…
संगमनेर (प्रतिनिधी): मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत असताना, मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अत्यंत घातक ठरणाऱ्या ‘चायनीज’ नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी संगमनेरकरांनी या मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे. चायनीज मांजा हा काच, धातू आणि विविध रासायनिक घटकांपासून बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तर शेकडो निष्पाप पक्षी आपले प्राण गमावतात. हा मांजा निसर्गतः लवकर नष्ट होत नसल्याने तो झाडाझुडपांमध्ये अडकून दीर्घकाळ पर्यावरणाला हानी…
संगमनेर, प्रतिनिधी- भारतीय संविधानावर विश्वास ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व जिल्हाध्यक्ष युवक अहिल्यानगर उत्तर ॲड. पांडुरंग औताडे यांच्या आदेशानुसार, अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर श्रीरंग गवांदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष (युवक) ॲड. पांडुरंग केशव औताडे पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. ॲड. शेखर गवांदे हे उच्चशिक्षित वकील असून त्यांचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडाल. व्यापारात धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक आघाडीवर वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद मिटतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, मात्र कामाच्या गडबडीत विश्रांती घेण्यास विसरू नका. वृषभ – आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायायदे ठरेल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये अधिक गोडवा येईल.…
अकोले (प्रतिनिधी): माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत आपण प्रचंड सकारात्मक व आशावादी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार यांनी अकोले येथे केले. सध्या माध्यम क्षेत्रात मोठी रचना आणि व्यवस्थापन बदलत आहे, ज्यामुळे काही आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र, या बदलांतून संधी शोधणारा माणूस हा पत्रकारच असून तो उत्तम पद्धतीने या बदलांशी जुळवून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार दिनानिमित्त अकोले नगर पंचायत व अकोले पत्रकार यांच्या वतीने शीतल पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सोशल मीडियावर मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वृत्तपत्रांमध्ये जागेची मर्यादा असल्याने आता या व्यक्त होणाऱ्या विचारांना डिजिटल मीडियावर जागा द्यावी…
महाराष्ट्र संवाद न्यूज: विशेष क्राईम बातमी अहिल्यानगर – राहाता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराला संगमनेरमधून त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी जगतात पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी सचिन गिधे हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे गेले असताना आरोपी प्रवीण वाघमारे याने त्यांच्या पत्नीला…
संगमनेर – विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी (सर्व रा. कळंब, ता. मुरबाड, जि. कल्याण) या तिघांविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जब्बार हसन शेख (वय ५०, रा. अलकानगर, संगमनेर) हे ग्रामीण भागातून शेळ्या-मेंढ्या खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचा व्यापारी जुनेद अहमद कुरेशी याने १ ऑगस्ट २०२४ रोजी शेख यांच्या शेडवर येऊन २ लाख रुपयांची जनावरे खरेदी केली. जुन्या…
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. बस स्थानकावरील पाकीटमारी असो किंवा रस्त्यावरील चैन स्नॅचिंग, गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गणेश नगर भागात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे गंठण ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. राजापूर (संगमनेर) येथील रहिवासी नंदा हासे या गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले. त्यांनी संधी साधून नंदा हासे यांच्या गळ्यातील ३…
