Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने रविवारी (१० मे) शहरात एका विशेष विनामूल्य कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली आहे. सह्याद्री महाविद्यालयातील के.बी. दादा देशमुख सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कथाकथन क्षेत्रातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कार्यशाळेत पुणे येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संचलित सानेगुरुजी कथाकथन प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष शामराव कराळे, अपर्णा निरगुडे आणि रमेशराव काळे हे अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कथा निवेदक कसा तयार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील चावडीवरील तलाठी कार्यालयात सुरू असलेला गंभीर गैरप्रकार आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उघडकीस आणला आहे. या कार्यालयात दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार एका महिलेने व्हाट्सअप मेसेजद्वारे आमदारांकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आमदार खताळ यांनी तातडीने कार्यालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली. शासकीय कर्मचारी उपस्थित नसताना मन्सूर शेख आणि त्यांचा जावई या खाजगी व्यक्ती तेथे बसून अधिकृत कागदपत्रांची हाताळणी करत असल्याचे दिसून आले. यावेळी आमदारांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या अधिकारांबाबत जाब विचारला. शासकीय कामकाजात खाजगी व्यक्तींचा अशा प्रकारे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासकीय स्तरावर पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले आहेत. या नव्या फेरबदलांनुसार डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती ‘रुसा’च्या प्रकल्प संचालकपदी, तर मंगेश जोशी यांची नियुक्ती पर्यटन संचालक म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आणि रेवैया डोंगरे यांची केळापूर उपविभागात यवतमाळ येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्य सरकारने ४० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या, तरी यामध्ये तुकाराम मुंढे यांची बदली सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभागात पारदर्शक कारभार करत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या साडेतीन वर्षांच्या पुतणीचा विनयभंग करून तिच्या आईवर (भावजयीवर) जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका नराधम चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शंकर राऊत (वय ३४, रा. घुलेवाडी, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी संतोष राऊत याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोर्चा काढला. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना वीज मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अपुरा दाब यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रोटेशन कालावधीत ११ तास वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी भर उन्हात सुमारे चार तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, संपतराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील सोनांबेकर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी या रुग्णास उपचारासाठी सोनांबेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेरच्या सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच दळवी यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समाजातील अनेक महनीय व्यक्तींपासून नेहमीच प्रेरणा मिळत असते. पूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी असली तरी, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाची ठरते. समाजाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत घेतलेला विचार आणि कृती समाजाला अभिप्रेत जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. खऱ्या अर्थाने पुरस्कारासाठी सुयोग्य व्यक्ती शोधणे कठीण असते, मात्र संगमनेर रोटरी क्लबने या पुरस्कारांसाठी केलेली निवड सार्थ आणि समाजासाठी पथदर्शक आहे. ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे सामाजिक कार्य अत्यंत गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी केले. येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या सभागृहात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे, तर डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होईल. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली मोहीम सुरूच ठेवली असून, सोमवारी झालेल्या कारवाईत तब्बल ९५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात एलसीबीने केलेली ही चौथी मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. नगरहून येऊन एलसीबीचे पथक वारंवार कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलीस मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले आणि उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई…
