Author: अनंत पांगारकर

संगमनेर, २३ जून – प्रतिनिधी:  अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर, संगमनेर शहर पोलिसांनी प्रवरा नदीकिनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सुरु असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५,११,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांची चर्चा सुरू होती. विशेषतः, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील दोन मोठ्या मटका चालकांवर कारवाई केली होती. असे असतानाही, शहरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…

Read More

अकोले, २३ जून- प्रतिनिधी समाजासाठी दिशादर्शक ठरणारी मदत ही एक उत्कट आणि आध्यात्मिक समाधान देणारी बाब आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालय, सहसचिव विजय चौधरी यांनी केले.  रविवारी (दि. २२) अकोले येथील अगस्ती मंदिरात आयोजित गुरुकुलच्या ५४ हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसनशेठ लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक, राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज-  १२ वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. साधना धोंडिराम भोसले असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले धोंडिराम भोसले यांची मुलगी साधना १० वी मध्ये ९२.६०% गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. तिला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिची खासगी शिकवणी सुरू होती. नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडील धोंडिराम चिडले होते. शुक्रवारी रात्री (२१ जून) धोंडिराम यांनी साधनाला कमी गुणांबद्दल विचारणा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज-  गृहपाठाच्या बहाण्याने एका ८ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (२० जून) सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यावर रडू लागली. आईने विचारणा केली असता, गणिताच्या तासाला शिक्षकाने स्वाध्याय आणि गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी (२१ जून) आरोपी शिक्षकाला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेले दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यंदाच्या वृक्षारोपण अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झालेल्या १९ व्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी, बाबुराव गवांदे, अनिल थोरात, सतीश गुंजाळ,…

Read More

यंत्रणेच्या मुर्दाडपणामुळे एखाद्या विद्यार्थीनीने तिचं आयुष्य कितीकाळ तुरुंगात काढावं? आंदोलनात भाग घेतला म्हणून या विद्यार्थीनीला कितीकाळ जामिनाविना तुरुंगात ठेवावं याला काही मर्यादा? केवळ ती विद्यार्थीनी मुस्लिम आहे म्हणून जर तिला असं खितपत पडावं लागत असेल तर लोकशाही म्हणून ढोल पिटण्यात काय अर्थ? तुम्ही घरी आहात. अचानक पोलिस येऊन तुम्हाला अटक करतात. तुम्ही कारण विचारता. एका गंभीर गुन्ह्याचा आरोप लावून ते तुम्हाला तुरुंगात टाकतात. तुम्ही भांबावून जाता. या गंभीर आरोपामागचा गुन्हा तुम्हाला जाणून घ्यायचा असतो. तुम्ही तो न्यायालयात जाणून घ्या, असं ते सांगत असतील आणि त्यासाठी पाच वर्षं न्यायालयात न्याय मिळत नसेल तर काय म्हणावं? ही मुलगी आशावादी आहे. पण तितकीच…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने काल, (२० जून) संगमनेर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३५ लोकांवर कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये थेट पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता संगमनेरमधील अन्य अवैध धंद्यांकडे लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस, एलसीबी हे अवैध धंदे बंद करण्यात यश मिळवितात की हे धंदे सुरूच राहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अशा कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता तेलीखुंट…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सह्याद्री विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले, योगामुळे शरीर लवचिक होते, त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करावीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही आरोग्याला जपण्याचा मंत्र दिला होता. दररोज किमान वीस मिनिटे योगाभ्यास करणे आवश्यक…

Read More

मुंबई, २१ जून, २०२५:  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत…

Read More