Author: Annant Ppangarkar

नवी दिल्ली दि. २५- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर ११ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ मान्यवरांना पद्मश्री-  कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले…

Read More

नवी दिल्ली, दि. २५ : राज्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ तर ४४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली असून यात राज्यातील एकूण ४८ पोलिसांचा समावेश आहे. ४४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर झाले असून यातील ३९ पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून…

Read More

संगमनेर दि. २५ – राज्य नव्हे तर देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आणि कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस, जिल्हा सायबर विभागाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात कारखान्याचे एन्व्हायरमेंट केमिस्ट भास्करराव पानसरे यांनी या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही अहिल्यानगर सायबर सेल पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून विशेषतः काही ठराविक विचाराने प्रेरित व्हाट्सअप ग्रुप वरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक थोरात कारखान्याचे कार्यकारी…

Read More

अहिल्यानगर दि.२५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.  सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी असताना मतदार ९.७ कोटी कसे? निवडणूक आयोगाने ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ बनवले. मुंबई, दि. २५ जानेवारी २०२५ लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख…

Read More

अहिल्यानगर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाशिवाय ७०० जागांवर नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. बँकेच्या आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरती निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे. यावेळी हिरालाल पगडाल, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, के. जी. भालेराव, राजीव साळवे, अरविंद सांगळे, फ्रान्सिस सोनवणे, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे, सुभाष ब्राह्मणे, राजाभाऊ अवसक, नितीन कसबेकर, सिताराम राऊत, अनिकेत घुले आधी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याचे अग्रेसर बँक…

Read More

मुंबई : महायुती सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर केल्यानंतर भाजपाने नव्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये भाजपाचे मंत्री पालकमंत्री आहेत. उर्वरित १६ जिल्ह्यांमध्ये भाजपाने ज्येष्ठ नेत्यांकडे संपर्क प्रमुख या पदाची जबाबदारी देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आणि सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना पालकमंत्री केले आहे. याच १६ जिल्ह्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते संपर्क प्रमुख म्हणून काम करणार आहेत. भाजपाचे संपर्क प्रमुख सरकार आणि स्थानिकांमधील दुवा म्हणून पक्षाच्यावतीने काम करतील. मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांचे निर्णय भाजपासाठी त्रासदायक ठरू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतील. भाजपाच्या या हालचाली म्हणजे मित्र पक्षांवर राजकीय कुरघोडीचा प्रयत्न असल्याची…

Read More

मुंबई – राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय महसूल आयुक्तांना दिले आहेत. शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.

Read More

मुंबई : बदलापूर डोंबिवलीनंतर आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या स्टेशन परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड लपवल्याची घटना घडली आहे. राम मंदिर स्टेशनच्या आवारात २० वर्षीय तरूणी बेशुद्ध अवस्थेत आढळली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. राम मंदिर स्टेशन परिसरात पीडित २० वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. बेशुद्ध अवस्थेतील या तरुणीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या गुप्तांगातील ब्लेड व दगड काढण्यात आले आहेत. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी या तरुणीचा जवाब नोंदवला असून तिने जवाबात एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले. नराधम…

Read More

संगमनेर – ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चपळगावकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या आखिल भारतीय सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती राहिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो. नरेंद्र चपळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! https://x.com/bb_thorat/status/1883033860524437607?t=TmNELHXoHd0bb6hh5Yea-A&s=19 अशा आशयाची श्रद्धांजली बाळासाहेब थोरात यांनी आपल्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर – माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज शनिवारी (२५ जानेवारी) निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. तसेच न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी भूमिका बजावली. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. साहित्य क्षेत्रात न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके प्रसिद्ध आहे. चपळगावकर यांनी १९६२ ते…

Read More

मुंबई, दि. २५ : नव्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील नागरिकांचा प्रवास महाग झाला आहे. प्रवाशांच्या खिशाला तब्बल पंधरा टक्के झटका देण्यात आला असून हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी पासून (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) अंमलात येत असल्याची माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. या कारणासाठी भाडेवाढ – वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…

Read More

मुंबई, दि. २५ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्तेकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२४ जानेवारी) गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान चालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,…

Read More

मुंबई, दि. २४ : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. आता ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार…

Read More

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘ट्रूथ अँड डेअर’च्या गेममध्ये हरलेल्या १७ वर्षीय तरुणीवर २२ वर्षीय मित्रांनीच बलात्कार केल्याची बातमी समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं चाललय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतो पण अलीकडे याच पुणे शहरात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, ड्रिंक अँड ड्राईव्ह, आत्महत्या या अशा घटनांमध्ये पुणे मागे राहिलेलं नाही. पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याच विद्येच्या माहेरघरात ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली आहे. पिंपरी-चिंचवड येथे शिक्षणाच्या निमित्ताने १७ वर्षीय तरुणी राहत होती. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची ‘इन्स्ट्राग्राम’वर ओळख झाली.…

Read More

संगमनेर – महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवत ते शहरातील सोनाराला विकण्यात आले. चोरीचे दागिने घेणाऱ्या त्या महिला सोनाराला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळताना अर्जदार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दागिने स्वीकारले असले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच नव्हे तर अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व गुन्हा करणाऱ्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अर्जदार आरोपीचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचा व अर्जदाराला अटकपूर्व जामीन दिला तर तपसी यंत्रणेला कायद्याने प्राप्त झालेले अधिकार हिरावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत हा महत्त्वाचा निष्कर्ष न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी नोंदविला आहे. झेंडावंदनाचा…

Read More

नाशिक – बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जन्म दाखल्यांचे वितरण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर सरकारने यासाठी नेमलेल विशेष तपास पथक (एसआयटी) तीन दिवसापासून तळ ठोकून चौकशी करत असतानाच आता राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कार्यरत असलेले नितीनकुमार देवरे, मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह पाच जणांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांचा समावेश आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांचे निलंबन राज्य सरकारने…

Read More

नाशिक : केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. अमित शहा शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर ते हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील अजंग येथे व्यंकटेश्वरा सहकारी वीज आणि कृषी प्रक्रिया लिमिटेडतर्फे आयोजित सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शनिवारी असून आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. पीर-बीर बाबांना विचारू नका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारे मुस्लीमच पीर-बाबा वगैरे मोजत नाही. मैं इस बाप का हू की उस बाप का यातच यांचा गोंधळ सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना बुधवारी (दि. 22) नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. नितेश राणे म्हणाले की, हिंदूंच्या धर्म स्थळावर वक्फ बोर्ड दावा करत आहे. कुंभ मेळ्यातही वक्फ…

Read More

मुंबई, दि. २३  महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या (७.११ % महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. २८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर…

Read More