Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध इतिहासातून प्रेरणा घेऊन निरोगी व प्रगल्भ समाज घडवण्यासाठी तरुणांनी राज्यघटना, लोकशाही आणि संत परंपरेचा विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘युवा संगम’ हा कार्यक्रम भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श मार्गदर्शक ‘पॅटर्न’ ठरेल, असा विश्वास राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय युवा संगम कार्यकर्ता शिबिर व संवाद कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या शिबिरामध्ये संगमनेर तालुक्यातील ५६० युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती संगमनेर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात श्री. व सौ. तोरकडी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण आरतीने झाली. कार्यक्रमाचे पौरोहित्य चैतन्य लोणकर स्वामी यांनी केले. त्यांनी विधिवत पूजा संपन्न केल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी मृणाल बागडे हिने महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारे प्रभावी भाषण केले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात दिलेला समता, सामाजिक न्याय आणि शुद्ध मानवतेचा संदेश आजही कसा प्रस्तुत आहे, हे तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांना पटवून दिले. त्यांच्या ‘कायकावे कैलास’…

Read More

अहिल्यानगर: नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर मुख्याधिकारी प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी शनिवारी उशिरा फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्याधिकारी फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय सुखदान यांनी यापूर्वीही अनेकदा नियमबाह्य कामांसाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. १३ एप्रिल रोजी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या वादाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला भव्य जीर्णोद्धार आणि वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित असलेला बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान आगामी काळात संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे यांच्यासह मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी आणि मुलांच्या पोटगीची रक्कम न भरणाऱ्या पतीला संगमनेर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ‘देवा ग्रुप फाउंडेशन’ने पुढाकार घेतला होता. आरोपी सरफराज कादर खान पठाण (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याने न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी व दोन मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा १० हजार रुपये देणे बंधनकारक होते. मात्र, त्याने जाणीवपूर्वक या आदेशाचे उल्लंघन केले असून, त्याच्याकडे आतापर्यंत एकूण ३,९७,५०० रुपयांची थकबाकी जमा झाली होती. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला, तिचे वडील आणि दोन लहान मुलींसह देवा ग्रुपचे पदाधिकारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथे पोलीस निरीक्षक समीर…

Read More

देशाच्या संसदीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या लोकसभेत एनडीए (NDA) सरकारने १६ तारखेला १३१ वी घटना दुरुस्ती विधेयक मांडले. त्या विधेयकात “नारी शक्ती वंदन कायदा” व “मतदारसंघ पुनर्रचना” ह्या दोन गोष्टींचा अंतर्भाव होता. आजपर्यंत कुठलीही घटनादुरुस्ती होत असताना भारताच्या संवैधानिक व संसदीय परंपरेला साजेसे वर्तन हे कुठल्याही सरकारचे राहिले आहे. यावेळी मात्र असे घडले नाही. अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय महिला आरक्षणाच्या विधेयकात घुसवून सरकारने विरोधी पक्षांना तोंडावर पाडण्याचा कुटील डाव रचला होता. यावरील चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या नेत्या व वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांनी भर संसदेत संपूर्ण सभागृहासमोर अन विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष सरकारची पोलखोल…

Read More

लोकांचे प्रश्‍न आपणच सोडवतो, अशा सबबीखाली सत्ता राबवणार्‍या केंद्रातल्या मोदी सरकारला नव्याने आणू पाहत असलेल्या महिला विधेयकाने चांगलाच झटका दिलाय. देशातील प्रत्येक गटाचे त्यात महिलांचे आपणच तारणहार आहोत, अशा मस्तीतील सरकारला असा झटका मिळणं गरजेचंच होतं. कसंही वागलं तरी आपलं कोणी वाकडं करणार नाही, अशा घमेंडीत सरकारचा वारू उधळत होता. चुकीचे असंख्य निर्णय घेऊन ते जनतेवर लादण्याची मस्ती डोक्यात होती. त्यात चंद्राबाबू नायडू, पासवान, आठवलेंसारख्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने सरकारचं काही बिघडत नव्हतं. पश्चिम बंगाल आणि केरळ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महिलांना आपलंसं करण्यासाठीचे सगळे प्रयत्न फसल्यावर मोदी सरकारने अनपेक्षितपणे महिला आरक्षणाच्या विधेयकाचं लचांड पुढे केलं. अवाजवी बहुमताच्या जोरावर या विधेयकावरही स्वत:ला स्वार…

Read More

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा महाराष्ट्र संवाद न्यूज, अहिल्यानगर:  अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयोमर्यादेचे उल्लंघन करून विवाह लावून दिल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, नेवासा:  राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असून, शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे मराठी शिक्षणाचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.  नेवासा तालुक्यातील विविध शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विदारक स्थितीवर बोट ठेवत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात डॉ. तांबे यांनी अनेक शाळांमधील शिक्षक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला. शिक्षक भरती प्रक्रिया प्रदीर्घ काळापासून रखडलेली असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षकांचे मुख्य…

Read More