Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं. संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल…
संगमनेर, प्रतिनिधी स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यात यंदाच्या वटसावित्री पौर्णिमेला तालुक्यातील १७१ गावे, २५८ वाड्या आणि विविध वस्त्यांवरील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात २५२५ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन केले. या उपक्रमातून त्यांनी केवळ वटपौर्णिमा साजरी केली नाही, तर वृक्षसंवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, दंडकारण्य अभियान समिती आणि अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने हे अभियान एका लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे. प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली, यावर्षी महिलांनी लावलेल्या या वटवृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयातील मान्यवर न्यायाधीश, सरकारी वकील आणि वकील संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव घुमरे आणि जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे महत्त्व विषद केले. त्यांनी महाराजांचे न्याय आणि सुशासनाचे आदर्श अधोरेखित केले. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष जगन्नाथ वामन, ज्येष्ठ वकील…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे. या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू…
मुंबई: रविवारी सकाळी एका ६० वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजमनोहर नम्पेली (६०) आणि त्यांची पत्नी लता नम्पेली (५५) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना हे वृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमनोहर यांनी पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नी लता यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून घेतली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेवेळी…
मुंबई, दि. ९: गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अजूनही रुसला असून, किमान १५ जूनपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता नाही. त्यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीचा अपवाद वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची लाट! – या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये तो ४० अंशांवरच राहील. मराठवाडा आणि खानदेशातही अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तुरळक पावसाची शक्यता, पण मान्सून नाही- १४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक मान्सूनचा…
पुणे – पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देऊन सातत्याने छळ केल्याच्या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी (भाजप) कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांचे सहकारी अक्षय कांबळे यांना पुणे महापालिकेत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. यामध्ये जबरदस्तीने तिच्या दालनात प्रवेश करून छायाचित्रण करणे, दरवाजा बंद करून दमदाटी करणे, आणि अपमानास्पद भाषा वापरणे अशा घटनांचा समावेश आहे. विशेष…
महाराष्ट्र संवाद न्यूज – एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना बोपदेव घाटात ६ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की, पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव यांनी त्यांना थांबवले. या दोघांनी विद्यार्थ्यांची बँग तपासली आणि हुक्क्याचे साहित्य त्यांच्याजवळ आढळल्याचे सांगितले. या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वडतीले आणि जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर, मध्यस्थीनंतर, केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोवंश कत्तलखाने सुरु असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धडक कारवाई करत ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सणाचे औचित्य साधून अवैध गोमांसाची खरेदी-विक्री व कत्तलीच्या घटना वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…
मोठा गाजावाजा करत नागपूर ते इगतपुरी दरम्यानच्या समृध्दी महामार्गाचं तिसरं उद्घाटन पार पडलं. महामार्गाचा हा अंतिम टप्पा असल्याने या उद्घाटनाला महत्व प्राप्त होणं स्वाभाविक होतं. हा महामार्ग हाती का घेण्यात आला याविषयी आजही कुतुहल आहे. महामार्ग झाला की असंख्य उद्योग विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागास भागात येतील, परिणामी शेतकर्यांच्या मुलांना उद्योग आणि नोकर्या उपलब्ध होतील, असा गुळाचा खडा सरकारने तिथल्या जनतेच्या हाताला चिकटवला होता. महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत सुरू करण्यात येऊन दीड वर्षांचा अवधी पुढे गेला. ज्या कारणासाठी महामार्गाची उभारणी करण्यात आली त्या विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग वाढीला चालना मिळालीच नाही. मागास भागाचा विकास होत असेल तर अशा महामार्गाला विरोध…
