Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज दीपावलीची धामधूम सुरू असतानाच भाऊबीजेच्या दिवशी पोलीस शिपायाने स्वतःवर रायफलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल शिरसट (वय 35 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून आत्महत्येचे निश्चित कारण लगेच समजू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील केशवनगर पोलीस वसाहतीत ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले राहुल शिरसाट हे पोलीस आयुक्त बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सुरक्षेसाठी शिरसट यांच्याकडे एसआरएल रायफल होती. ड्युटी संपल्यावर ते आपल्याकडील रायफल जमा करत असत. बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी आपल्याकडील रायफल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या कुरकुटवाडी येथे २७ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री तरुणाच्या झालेल्या मृत्यूची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा तर्क अखेर खोटा ठरला. पोलीस तपासात मित्रानेच त्याच्या मैत्रिणीला पाठविलेल्या समाज माध्यमातील फ्रेंड रिक्वेस्टच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून गणेश बबन कुरकुटे (वय २१ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने या खुनाची कबुली दिली असल्याचे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आयोजित व गुरुमाऊली सदिच्छा महिला आघाडीतर्फे सुरेल सुमधुर भावगीताने सोमवारची (दि. १४ नोव्हेंबर) दिवाळी पाडवा पहाट ऑनलाइन झूमव्दारे सुमधुर गीतांनी रंगली. शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या संकल्पनेतून महिला शिक्षक भगिनींसाठी दीपावली पहाट पाडवा या कार्यक्रमाचे झूम मीटिंगद्वारे आयोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव व जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुषमा वाळुंज यांच्या सुमधुर गणेश स्तवनाने या दिवाळी पाडवा पहाटेची सुरुवात करण्यात आली. या पहाट गाण्यांसाठी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, गुरुमाऊली…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुणा -अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणण्याचा आरोप करत मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार निवडून दिल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दिले. केंद्रीय मंत्री अमित शहा सोमवारी मध्यप्रदेशच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. ते गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. शहा म्हणाले, तीन डिसेंबरला भाजपचे सरकार आणा. तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा सर्व खर्च भाजप सरकार करेल. साडेपाचशे वर्षांपासून रामलल्ला अपमानित अवस्थेत होते. काँग्रेस सत्तर वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत आणि विलंब करत होते. काँग्रेसने राम मंदिराचे बांधकामही रोखण्याचा आरोप केला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले -उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अकोलेचे भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा कार्यकारणी घोषित केली. यात जिल्हाध्यक्ष पदानंतरच्या महत्त्वाच्या पदावर भांगरे यांची निवड करण्यात आली. भांगरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असून अकोले तालुक्यात भारतीय जनता पार्टीची स्थापना त्यांनी केली आहे. भाजपा तालुका अध्यक्ष, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप प्रदेश परिषद सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले असून गेली नऊ वर्षापासून ते पुन्हा भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात स्थानिक स्वराज्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बँक ऑफ बडोदाच्या खातेदाराला ऑनलाईन 32,897/- रुपयांना गंडा गंडा घातल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथील किरण दगडू सोनवणे यांचे संगमनेर मधील बँक ऑफ बडोदामध्ये 2011 पासून खाते असून या खात्यावर त्यांचे शेतीचे पैसे येत असतात. 23 सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यावर 32,897/- रुपये बॅलन्स होता. 24 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर बँकेच्या मेसेज आला. या मेसेज द्वारे त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 32,897/- रुपये दुसऱ्याच्या यूपीआय नंबरवर ट्रान्सफर केल्याचे व खात्यावर 70 पैसे एवढा बॅलन्स शिल्लक राहिल्याचे दिसून आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – भारतीय जनता पक्षाने पैसे देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल केला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जातीचा दाखला समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या जातीच्या प्रमाणपत्रात ओबीसी प्रमाणपत्र पवारांनी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचं समोर आलं. यावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं. हा जातीचा दाखल खोटा असल्याचं त्या म्हणाल्या. आता रोहित पवारांनीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -संगमनेर शहर पोलीस ठाणे लागत असलेल्या दुय्यम कारागृहातील गज कापून पलायन करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आता त्यांचे साथीदार रडारवर आले आहे. आरोपींना पलायन करण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी आणखी तिघा जणांना शनिवारी रात्री अटक केली आहे. पळून जाणाऱ्या चार आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या दोघांना अहमदनगर एलसीबीने जळगावमध्ये पकडले होते. हे सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असतानाच आता त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींविरोधात आयपीसी 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात नव्याने भारतीय दंड विधान कलम 307, 120 ब तसेच शस्त्र अधिनियम 3/25 ही कलमे वाढविण्यात आली आहे.…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज मानवी हक्काचं उल्लंघन करून तपास यंत्रणा एखाद्या व्यक्तीला कसं हैराण करून सोडतात याचे असंख्य दाखले आपल्याकडील तपास यंत्रणांच्या कारभाराने जनतेला दिले आहेत. यंत्रणेतील अधिकार्याच्या मनाला वाटेल तशी तो आपली अक्कल वापरतो आणि कारवाई करताना संबंधित व्यक्तीकडील यंत्रणांचा ताबा घेतो. घटनेच्या कोणत्याही कलमात अशी तरतूद नसताना तपास यंत्रणा बेदिक्कतपणे मस्तवालपणा करतात. याला अनेकदा विरोध झाला. पण तो करताना संबंधिताला इतक्या याचना सोसाव्या लागल्या की विचारता सोय नाही. देशात लोकशाही आहे, यावर जणू यंत्रणांचा आणि तिथे वावरणार्यांचा विश्वासच नसावा. न्यायालयात त्यांची रेवडी उडवली जाते. पण तरीही अक्कल त्यांना साथ देत नाही. येरे माझ्या..…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये कुणबी नोंदींची तपासणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ४६ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ८५ हजार नोंदी सापडल्या. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनानंतर कुणबी जातीच्या शोधासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या नियंत्रणाखाली विविध विभागांच्या प्रमुखांचा समावेश असलेला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी ही माहिती दिली. तपासणी करण्यात आलेल्या कागदपत्रात १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहे. सर्वात जुनी…
