Author: अनंत पांगारकर
भाजप आणि आमदार खताळ समर्थकांमधील वादाने दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर संगमनेर, ०३ डिसेंबर समाज माध्यमातील पोस्ट आणि एकमेकांना टाँट मारण्यावरून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावरण थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीची चर्चा शहरात आणि समाज माध्यमात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांसमोर हाणामारी करणारे हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना अचानकपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये…
बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद शिर्डी, दि.३ – शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक…
विशेष प्रतिनिधी | मुंबई बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराड याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ही मागणी केवळ विरोधातील नेतेमंडळी किंवा आमदारांकडून होत आहे असे नाही तर महायुतीतील काही त्यांच्या सहकाऱ्यांकडून देखील होत आहे. या मागणी संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट प्रश्न केला आहे. मुंडे गुरुवारी (०२ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसार…
मुंबई, ०२ जानेवारी : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनाही (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील बदल्या करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दोन…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – माजी नगराध्यक्ष दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांच्या तीन मुलांसह त्यांच्या मित्राला नाशिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर गुंडागर्दी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. संगमनेरकरांच्या संतापानंतर आणि मोर्चानंतर सुस्तावलेली तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा अखेर जागी झाली. वाहनाला धडक देणाऱ्या या घटनेतील पाच आरोपींना नाशिकमधून गुरुवारी पकडल्याची माहिती पत्रकाराऐवजी समाज माध्यमात प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या या प्रकारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व प्राणघातक हल्ल्याचे कलम पोलिसांनी या गुन्ह्यात वाढवावे. टोल नाका कायमस्वरूपी बंद…
गुरुवार, ०२ डिसेंबर मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल आणि वित्त विभागाशी संबंधित दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्त्यासाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक… महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४…
मनमोहन सिंग यांना शोकसभेतून अभिवादन स्वच्छ चारित्र्य असलेल्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण – डॉ. तांबे गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. मालपाणी लॉन्स येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, रणजीतसिंह देशमुख, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात,…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र दुधासाठीचे अनुदान ऑक्टोंबर महिन्यापासून मिळाले नसून सरकारने हे अनुदान तातडीने वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची तसेच डिसेंबर नंतरही अनुदान योजना पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केली आहे. देशमुख म्हणाले, माहे जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासनाने प्रति लिटर पाच रुपये तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी प्रति लिटर सात रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले असून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे अनुदान दूध उत्पादकांना…
गुरुवार, २ जानेवारी संगमनेर – विविध योजनांसाठी दिले जाणारे अनुदान रखरविण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात २३ डिसेंबरला हे अनुदान तातडीने देत प्रलंबित प्रकरणे मार्गे लावण्याच्या केलेल्या मागणीनंतर बुधवारी नववर्षाच्या प्रारंभी विविध योजनांचे सुमारे सहा कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातूlन संगमनेर तालुक्यातील विविध गाव वस्त्यांवरील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. थोरात यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या. मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना यामधील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – संगमनेर मधील कवी अनंत फांदी नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून नव्या वर्षात हे नाट्यगृह शहराच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. नाट्यगृह बंदिस्त करण्याचे काम सुरू असून या संदर्भात रंगभूमीशी निगडित नाट्यकर्मीं व संगमनेरकरांच्या सूचना विचारात घेता याव्या, यासाठी संगमनेर नाट्य परिषदेच्यावतीने कोकरे यांना निवेदन देण्यात आले होते. नाट्यकर्मींच्या या निवेदनाला प्रतिसाद देत मुख्याधिकारी कोकरे यांनी मंगळवारी सकाळी नाट्यगृहामध्ये अधिकारी, वास्तु विशारद आणि उपस्थित कलाकार यांच्याशी संवाद साधला. वास्तुविशारद अरविंद वैद्य यांनी उपस्थित रंगकर्मींना नियोजित नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.…
