Author: अनंत पांगारकर

बुधवार, ११ डिसेंबर तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले. यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद,…

Read More

बुधवार, ११ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमधील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या गोल्डन सिटीतील शिक्षकाचा शिवपुष्प बंगला अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या फोडत ५० ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दागिने चोरीच्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घरे लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून मोठी गुप्तता राखली जात आहे. ७ डिसेंबरला घडलेल्या चोरीच्या दोन घटनादेखील तब्बल तीन दिवसानंतर समोर आल्या आहे. शिक्षक असलेल्या विलास कारभारी काळे यांनी…

Read More

मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर  अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही…

Read More

बुधवार, १० डिसेंबर – मुंबई  लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे…

Read More

मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सकाळ हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यांचा सहभाग – सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते. यांना दिले निवेदन – मंगळवारी सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभव पंथाचे विजय…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई   महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात याही वर्षी महाअधिवेशनाचे आयोजन केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने त्यावर बंदी घातली असून एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर ताशेरेही ओढले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं की, बेळगावला केंद्रशासित करण्यासाठी आजच्या अधिवेशनात ठराव आणा आणि तो केंद्राकडे पाठवा. हा ठराव आज आला असता तर आम्ही तो एकमताने मंजूर करण्यासाठी मदत…

Read More

सोमवार ९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही, ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान…

Read More

सोमवार ०९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. रविवारी नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. पण त्यानंतर विरोधकांकडून कोणीही अर्ज न भरल्याने नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली. ज्याची औपचारिक घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेल्या नार्वेकरांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांना महत्त्वाचे आश्वासन दिले. तसेच यापुढे आता कोणीही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, अशी विनंती नार्वेकरांकडून करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव…

Read More

सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशामधील हिंदू बांधवांना दिलासा देण्याची मागणी संगमनेर काँग्रेसने प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला आहे. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहे. मालमत्तेची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या…

Read More

सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहे. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार तांबे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशमधील आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना तेथील सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली…

Read More