Author: अनंत पांगारकर
संगमनेर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कात 20% वाढ केल्याच्या निषेधार्थ, ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने सोमवारी संगमनेरमध्ये आंदोलन केले आहे. ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले, पुणे विद्यापीठ खोटं बोलत आहे की त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही शुल्कवाढ केली नाही. पूर्वी 25,000 रुपये असलेले बीसीएचे शुल्क आता 40,000 रुपये झाले आहे. तसेच, 14,000 रुपये असलेली इतर अभ्यासक्रमांची फी 30,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारी आहे. घुले…
घोटी: महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेली २९ वर्षांपासून एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा जोपासत आहेत. १९९७ पासून, हे गिर्यारोहक दरवर्षी न चुकता नवरात्रीमध्ये शिखरावर घटस्थापना करतात आणि विजयादशमीपर्यंत दररोज कळसुबाई मातेची पूजा-अर्चा करण्यासाठी शिखर सर करतात. या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला. यावेळी त्यांनी गिर्यारोहकांच्या श्रद्धा आणि साहसाचे कौतुक केले आणि नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि…
संगमनेर – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी निळवंडे धरण आणि कालवे प्रकल्प पूर्णत्वास नेला यामुळे पर्जन्यछायेतील संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी आली आहे. त्यांनी पूर्ण केलेल्या निळवंडे धरण आणि त्याच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून पाणी आल्याने, एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेल्या अनेक गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित झाला आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या चांगल्या पावसामुळे, डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून सतत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील नदी-नाल्यांवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. थोरात यांच्या प्रयत्नातून आता दुष्काळी भागात देखील पाणी फिरू लागले आहे. निळवंडे धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा असून, तो…
मेष: तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: आर्थिक बाबतीत थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येतील. मिथुन: नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामामध्ये नवीन संधी मिळतील आणि उत्साह कायम राहील. कर्क: आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, पण शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. सिंह: सर्जनशीलता वाढेल आणि प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कन्या: कामाचा ताण वाढेल, पण तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुळ: वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. वृश्चिक: महत्त्वाचे निर्णय घेताना संयम पाळा.…
बेलापूर (अकोले): बिबट्याच्या हल्ल्यात बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची अकोले तालुक्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. पप्पू बाळू दुधवडे (रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, अकोले) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतमजुराचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ समोर आली. या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू दुधवडे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी ते कामावरून घरी परतत असताना, रात्री त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी…
नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसोबत झालेल्या बैठकीत आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटील यांचा सहभाग आढळल्यामुळे ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे खून…
प्रवीण पुरो – महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गलाबोट लावणार्या विकृत जमातीने भाजपची चांगलीच उतरवली आहे. राज्याचा सर्वांगीण चांगुलपणा खड्ड्यात काम त्या पक्षात अविरत सुरू आहे. पक्षातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी विराधकांवर चिखलफेक करतो, अशी स्पर्धा सुरू आहे. सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्यांची अवस्था काय करू आणि काय नको, अशी झाली आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने या सार्यांचं धाबं दणाणलं आहे. यामुळे संधी घेत विरोधकांना चेपण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा पध्दतशीर प्रयत्न होतो आहे. भाजपवर संकट आलं की हे चवताळखोर कामाला लागतात. प्रवक्ते तर चेकाळले आहेतच. पण प्रवक्ते नसलेल्यांची अवस्थाही विचित्र झाली आहे. आपल्या पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही,…
मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- आज तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. नवीन लोकांशी संपर्क साधल्याने फायदा होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने आनंद मिळेल. कर्क (Cancer)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल. शांत राहून काम करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला असून, कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तलवार, आणि इतर साहित्य असा एकूण ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई नगर-पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ रात्रीच्या वेळी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय…
संगमनेर – संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा निर्णय घेत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रशेखर चौकात उत्सव होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. यावर्षी पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, याच चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये…
