Author: अनंत पांगारकर

संगमनेर – सीबीएसईच्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने आपला डंका वाजवताना दहा पदकांसह चार चषके पटकावली. शिर्डीच्या द्रोणा अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या एरोबिक्सपटूंनी सर्व गटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. वैयक्तिक सादरीकरणाच्या अकरा, चौदा आणि सतरा वर्षांखालील वयोगटात इशान उगले, राजवीर आवारी आणि स्पर्श घुले यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अनिका चांडक, लब्धी कटारिया, ऋद्धी दरडा, त्रिशा गांधी, आराध्या जोशी, गुंजल करवा व यशश्री लाहोटी यांच्या संघाने फिटनेस एरोबिक्समध्ये रौप्य पदकासह विजेतेपदही मिळवले. या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी विविध गटांमध्ये एकूण 10 पदकांसह चार चषकं पटकावले. कुलदीप कागडे यांनी मार्गदर्शन…

Read More

संगमनेर –  संगमनेर तालुक्यातील चिखली गावाच्या ग्रामपंचायतीने निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरून दडपशाहीने टाकण्यात येत असलेल्या 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत या संदर्भात केलेल्या ठरावानंतर ग्रामपंचायतीने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ या कंपनीने 7 मे 2024 रोजी चिखली सबस्टेशन ते वाडापूर आणि मेमाणे वस्तीपर्यंत वीज वाहिनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. मात्र, 30 मे 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत, ग्रामपंचायतीने ‘चिखली सबस्टेशन ते वाडापूर ते…

Read More

संगमनेर –  संगमनेर शहर पोलिसांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज आणि १३२ केव्ही सबस्टेशनजवळ घडला. हा अपघात एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला. व्हिडिओमध्ये, यश अनुप अरगडे (वय २०), रा. गुंजाळवाडी, संगमनेर, हा त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (क्रमांक एमएच ०४ एलए २५३१) दुचाकीला मुख्य रस्त्याऐवजी भरधाव वेगात फूटपाथवरून चालवत होता. २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले. हा…

Read More

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले. कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित…

Read More

मेष (Aries): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुमच्या मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कामात यश मिळवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करा. मिथुन (Gemini): आज काही निर्णय घेताना सावध राहा. अनावश्यक वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवसभर थोडा तणाव जाणवू शकतो. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक…

Read More

संगमनेर –  घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असताना, रुग्णालयातील मेडिकल सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी घुलेवाडी येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयातील प्रशासनाचे काम समाधानकारक नसल्याचे पानसरे यांनी सांगितले. रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात…

Read More

संगमनेर-  पुणे-नाशिक महामार्गावर खांडगावकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिनेश राजू लोखंडे (वय ३३, रा. संगमनेर खुर्द) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने संगमनेर परिसरात शोककळा पसरली आहे. दिनेश लोखंडे हा मालपाणी कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता. त्याचवेळी, अहमदाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या (MH 14 LS 7191) या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दिनेशच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचा डावा पाय पूर्णपणे तुटला होता. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर…

Read More

मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अधिक उत्पादनशील राहण्यासाठी चांगला असू शकतो. तुमच्यात उत्साहाची लाट येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकललेली कामे पूर्ण करू शकता. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा व्यावसायिक परिस्थितीत तुमचे मत मांडण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला स्थिरता आणि आरामाची गरज वाटू शकते. तुमच्या घरगुती जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बजेटचे पालन करण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini)- आज तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी, महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी किंवा काहीतरी…

Read More

संगमनेर –  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामध्ये मदत पोहोचवण्याचं श्रेय घेणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींवर असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी टीका केली आहे. मुंगसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, सन २०२२-२३ पासून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘यशोधन’ कार्यालयाने गावागावात जाऊन गरजू कामगारांना मदत केली. ज्यांना सरकारी योजनांची माहिती नव्हती, त्यांना घरी जाऊन माहिती दिली, फॉर्म भरण्यासाठी मदत केली आणि त्यांना शिष्यवृत्ती, आजारपणात मदत व इतर लाभ मिळवून दिले. यशोधन कार्यालयात दररोज सहा कर्मचारी या कामगारांच्या…

Read More