Author: अनंत पांगारकर

संगमनेर –  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्यात एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समितीची ही संकल्पना संगमनेरमध्ये यशस्वीरित्या राबवली गेली, यामुळे ती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणि राज्यातही सर्वात पुढे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसची ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते बाजार समितीच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. या सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले आदी मान्यवर उपस्थित होते.  थोरात म्हणाले, बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी…

Read More

संगमनेर –  पैगंबर मोहम्मद यांच्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि ‘न्यूज एनएमपी मराठी’ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल ‘सन्मानचिन्ह’ आणि ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देऊन गौरवण्यात आले. यात एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन, एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्ट याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डी.पी.आय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जमीन विक्रीमध्ये २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनेवाडी येथील पोलिस पाटील दगू मोहन गुडघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे (वय ४२, रा. जोशीनगर, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे. पोलिस पाटलाने आधीच तीन वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेली ५० गुंठे जमीन पुन्हा डांगे यांना विकण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात त्याने डांगे यांच्याकडून १५ लाख रुपये धनादेशाद्वारे आणि ५ लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जमिनीचा ताबा न दिल्याने आणि खरेदीची कागदपत्रे न मिळाल्याने डांगे यांना संशय आला. त्यांनी…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढलेली असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. कामात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही शांत राहून त्या सोडवू शकता. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini) – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने तुम्हाला आनंद होईल. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. कर्क (Cancer) – आज तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकता. कामाच्या ठिकाणी काही समस्या…

Read More

दूध संघाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही संकेत  संगमनेर –  संगमनेर तालुक्याचा विकास शेतकरी व सहकाराच्या भक्कम पायावर उभा असून शेतकरी, उत्पादक हाच तालुक्याच्या विकासाचा पाया आहे. येथील सहकारामुळे आपली बाजारपेठ समृद्ध झाली असून, ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना थोरात यांनी, तालुक्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून तालुक्यात खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि लोकांना रोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, पण आता…

Read More

शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास, हार-फुले-फोटो विकण्यास लावणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल; अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच मोठी कारवाई शिर्डी-  शिर्डीत भीक मागणाऱ्या आणि विविध वस्तू विकणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये १२ मुलांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. शिर्डी मंदिर परिसरात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमध्ये, भीक मागणे, हार, फुले आणि फोटो विकणे अशा कामांमध्ये गुंतलेल्या १२ मुलांची सुटका करण्यात आली. या मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. काही मुले नशेच्या आहारी जाऊन भाविकांना…

Read More

नवी दिल्ली –  आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) फिजिओथेरपिस्टसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. डीजीएचएसने फिजिओथेरपिस्टना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही पदवी लावण्यास मनाई केली आहे, कारण ते वैद्यकीय डॉक्टर नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. डीजीएचएसच्या डॉ. सुनिता शर्मा यांनी एका पत्राद्वारे सांगितले की, फिजिओथेरपिस्टनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरणे हे इंडियन मेडिकल डिग्री ऍक्ट १९१६ चे उल्लंघन आहे. हे पत्र त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांना पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, फिजिओथेरपिस्ट हे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरू नये. यामुळे रुग्ण आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. डॉ. शर्मा…

Read More

दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी: पोलिसांनी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; ४३ जणांविरोधात गुन्हे दाखल अहिल्यानगर –  पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर एमआयडीसी, शेवगाव आणि जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली. एमआयडीसी परिसरात पोलिसांनी अभिषेक खाडे (वय २५, रा. लोहगाव, ता. नेवासा) याला अटक केली. त्याच्याकडून ‘बिंगो’ नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २३,०२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More

जाणून घ्या, आज शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ चे राशीभविष्य  मेष राशी – आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आजचा दिवस आनंद आणि लाभाचा आहे. वृषभ राशी – तुमच्या विचारांमुळे आणि बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता. मिथुन राशी – आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीत कामाचा भार वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी – आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादापासून दूर राहा. सिंह राशी – आज तुमचे मन आनंदी आणि…

Read More

संगमनेर – संगमनेरमध्ये बिबट्याचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसत आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे बिबट्याने एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला असून, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आई, आजी आणि मामासोबत शेतात गेलेल्या श्रीधर नावाच्या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, आई आणि आजीने मोठ्या हिमतीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्याला सोडून पळ काढला. सध्या मुलावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शेडगाव येथील…

Read More