Author: अनंत पांगारकर
प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी- राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावामध्ये आगळावेगळ्या पद्धतीने झालेल्या ध्वजारोहणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गावचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब भांड यांच्या पुढाकारातून ७६ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गावातील आत्तापर्यंतच्या माजी सरपंचांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी आत्तापर्यंतचे माजी सरपंच उपस्थित होते. गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आतापर्यंतच्या या माजी सर्व माजी सरपंचांचा ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब भांड, राजापूरच्या सरपंच कुसुमताई पानसरे, उपसरपंच सोमनाथ हासे यांनी फेटे बांधून सत्कार केला. माजी सरपंचांमध्ये संपत हासे, शोभा गोसावी, माधव हासे, सुरेखा हासे, रोहिणी खतोडे, संजय हासे, बादशहा हासे, शैला हासे आदींचा समावेश…
संगमनेर दि. २६- तुझ्या मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, प्रेम संबंध बद्दल नवऱ्याला माहिती देईल असे वारंवार धमकावत विवाहित महिलेचे शारीरिक संबंध निर्माण करत तिला आर्थिक ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहरालगतच्या राहणे मळा येथील ओमकार नामदेव सोनवणे या आरोपीविरुद्ध शनिवारी संध्याकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेशी ओळख निर्माण करत आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. पीडित महिला आणि आरोपीची २०२२ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून २६ मे २०२२ रोजी आरोपी सोनवणे याने…
दि. २६ जानेवारी- तीर्थक्षेत्र माहूर शहरात असलेल्या ठाकूर बुवा यात्रेसाठी आलेल्या दिंडीतील भाविकांनी शनिवारी रात्री (२५ जानेवारी) भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या भाविकांना मळमळ उलट्या झाल्याने विषबाधेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रविवारी पहाटे ही घटना घडली असून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीर्थक्षेत्र माहूर शहरात दरवर्षी षट्तिला एकादशीला ठाकूर बुवा यांची यात्रा भरते. यात्रेसाठी राज्यभरातून अनेक ठिकाणच्या पायी दिंड्या माहूरमध्ये येत असतात. दिंड्यांसाठी मोकळ्या जागेत, विविध…
अहिल्यानगर दि. २६ जानेवारी- आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथोस्तवासारखे उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “ग्रंथालय ऑन व्हील” हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचे आश्वासन अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे. शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे,…
संगमनेर दि. २६ जानेवारी – भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानतेसह स्वातंत्र्य व विविध मूलभूत अधिकार दिले आहेत. ही राज्यघटना जपणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून जगातील सर्वात आदर्श अशी आपल्या भारताची राज्यघटना असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात थोरात बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे, रोहिदास पवार, ॲड. अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, रामदास तांबडे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींसह अनेकांनी या…
पुणे – पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा गौरव करण्यात आला असून कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकारी संचालकांचा पुरस्कार देत सन्मान करण्यात आला आहे. पुण्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये २०२३-२४ यावर्षीचे विविध पुरस्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते देत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, खासदार विशाल पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, विवेक कोल्हे, नरेंद्र घुले, जयप्रकाश दांडेगावकर आदींसह राज्यभरातून…
वाचकहो, मथळा पाहून तुम्हाला कळलं असेल आम्हाला काय म्हणायचेय ते. हा महाराष्ट्र आहे इथे कोणीही कसाई होऊ शकतो. राजकारणात कोणाचीही कत्तल करायला इथे फार मेहनत घ्यावी लागत नाही. जिथे शरद पवारांची जागा अजित पवार आणि उध्दव ठाकरेंची जागा एकनाथ शिंदे घेऊ शकतात, त्या राज्यात काहीही घडू शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विमान दाहोसला उतरता उतरता महाराष्ट्रभर सामंतांच्या उदयाची जोरदार चर्चा सुरू झाली. सामंत यांच्याविषयी राजकीय गणिताच्या पायर्या रचल्या जाऊ लागल्या. त्या अगदीच वायफळ होत्या असं कोणी म्हणेल तर त्याची राजकारणातल्या वेड्यात गणती होईल. ही ती वेळ नाही, असंच कोणी सांगेल. अपेक्षित नसताना ५७ जागा मिळवणं, अपेक्षित नसताना महत्वाची मंत्रिपदं मिळणं, पुढे…
नवी दिल्ली दि. २५- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर ११ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ मान्यवरांना पद्मश्री- कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले…
नवी दिल्ली, दि. २५ : राज्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ तर ४४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली असून यात राज्यातील एकूण ४८ पोलिसांचा समावेश आहे. ४४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर झाले असून यातील ३९ पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून…
संगमनेर दि. २५ – राज्य नव्हे तर देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आणि कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस, जिल्हा सायबर विभागाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात कारखान्याचे एन्व्हायरमेंट केमिस्ट भास्करराव पानसरे यांनी या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही अहिल्यानगर सायबर सेल पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून विशेषतः काही ठराविक विचाराने प्रेरित व्हाट्सअप ग्रुप वरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक थोरात कारखान्याचे कार्यकारी…
