Author: अनंत पांगारकर

बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई  निवडणूक आयोगाने आचारसंहिता समाप्तीची घोषणा करतात सरकारने पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची सोमवारी संध्याकाळी नियुक्ती केली. शुक्ला यांनीआपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुक्ला आता पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालक (डीजीपी) असतील. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांना पदावरून हटवत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांनी राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर झाल्यानंतर गृह विभागाने लगेचच शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपवत त्यांना पुन्हा काम करण्यास सांगितले.…

Read More

बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरूच असून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री पदावरील तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. निरीक्षक आज मुंबईत – दरम्यान भाजपाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपचे निरीक्षक आज मुंबईत येत असून मुख्यमंत्री पदा संदर्भातील रिपोर्ट ते दिल्लीला देणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहण्याची चिन्ह आहेत. अमित शहा मुंबईत – दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्माण…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा वाढू लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्याकडे सोपविला राजीनामा – राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. यावेळी या दोघांमधील दरी स्पष्ट दिसत होती. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादा भुसे उपस्थित होते. पण शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुराव्याचं दर्शन झालं. शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री – विधानसभेचा कार्यकाळ आज संपल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत…

Read More

मंगळवार २६ नोव्हेंबर – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र पशु गणनेचे काम २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेत पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची खरी माहिती देण्याचे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. यांची होणार गणना – या पशुगणनेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला मारलेल्या (टॅगिंग केलेल्या) जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची देखील गणना करण्यात येणार आहे. पशु गणनेसाठी यांची केली नियुक्ती – जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे. पशु गणना कशासाठी – पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट…

Read More

मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई  तुतारी आणि ट्रॅम्पेटच्या साधर्म्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दोन्ही चिन्हातील गोंधळामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार पराभूत झाले असून या चिन्हाचा फायदा विरोधी उमेदवारांना झाला आहे. ९ जागांवर फटका – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ८६ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ १० जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर ९ जागांवरील उमेदवार ‘ट्रम्पेट’मुळे पराभूत झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’चे भाषांतर पिपाणी करण्यात आले होते. त्याचा दोन…

Read More

मंगळवार २६ नोव्हेंबर – संगमनेर छपराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण संसारात जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील जांबुत बुद्रुक या गावात घडली आहे. आगीमध्ये झोळीत असलेले छोटे बाळ तात्काळ बाहेर काढल्याने बचावले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार – मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जांबुत बुद्रुकच्या वैतागवाडीमधील देवराम आप्पाजी मेंगाळ मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली त्यावेळी घरामध्ये केवळ एक महिला आणि छोटे बाळ होते. बाळ बचावले मात्र आगीत संसार जळून खाक – आग लागल्याचे दिसताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत…

Read More

मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडलं ते शिवसेनेच्या बाबतीत घडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेत आपल्या सर्व विजयी झालेल्या आमदारांना मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले होते. या नवनिर्वाचित आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या मतदारसंघात परतू शकणार आहेत. आमदारांबाबत खबरदारी – विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दष्टीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. ताज लँड या…

Read More

संगमनेर विधानसभा निवडणूक विश्लेषण – अनंत पांगारकर राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या आणि दिग्गज नेते, हायकमांडशी थेट संपर्कात असलेले म्हणून देशभरात परिचित असलेल्या बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर टाकलेला अति आत्मविश्वास आणि लाभार्थी, चमचे, ठेकेदार, तरुणाईचा न आलेला अंदाज, लाडक्या बहिणीचा फॅक्टर, संगमनेरमध्ये निर्माण केलेले धार्मिक ध्रुवीकरण, चिट्ठी संस्कृती यांच्यामुळेच थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला. मतदार संघातील लाभार्थ्यांचे घोटाळे, मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी निर्माण झालेली दहशत हे मुद्दे घेऊन प्रचारात उतरलेले आणि शिवसेनेकडून निवडून आलेले अमोल खताळ थोरात यांच्या पराभवासाठी केवळ निमित्तमात्र ठरले. परंपरागत विरोधी शिवसेना सोबत असूनही पराभव -…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह करणारे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि सिडकोचे चेअरमन संजय शिरसाठ यांनी आग्रह धरूनही भाजपने त्यांना धूप घातली नाही. अखेर मुख्यमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाला म्यान करावी लागली आहे. हे पद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. मात्र ते कोणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट झालं नसलं तरी त्या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं मानलं जातं. फडणवीस दिल्लीला – विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री…

Read More

सोमवार २५ नोव्हेंबर – मुंबई गेल्या विधानसभेच्या तुलनेत या विधानसभेमध्ये महिला आमदारांची संख्या घटली आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून पाठिंबा देताना स्पष्ट जनादेश दिला असताना दुसरीकडे मात्र सभागृहातील महिला आमदारांची संख्या कमी झाली आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आता केवळ २१ महिला आमदार दिसणार असून यात सर्वाधिक १४ महिला आमदार भारतीय जनता पक्षाच्या आहे. केवळ अडीचशे महिला उमेदवार – निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असताना दुसरीकडे मात्र महिला उमेदवारांना नाकारल्याचे समोर येत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २५० च्या आसपास लाडक्या बहिणी उमेदवार होत्या.…

Read More