Author: अनंत पांगारकर

गुरुवार ११ जुलै   पश्चिमी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे नगर जिल्ह्यात वळवून या माध्यमातून जिरायती भागातील पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. प्रवरा खोऱ्यात आणखी साडेनऊ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, यासाठी शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांची भेट घेतली हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. बुधवारी वाकचौरे यांनी मिसाळ यांची भेट घेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत अधिक माहिती घेतली. यावेळी रोहित वाकचौरे उपस्थित होते. पश्चिम भागाकडे जाणारे पाणी पूर्व भागात आणल्यास पिण्याचे पाणी, सिंचन व उद्योगाचे विषय मार्गी लागणार आहेत. यावेळी त्यांनी नद्यांचे रेखांकन, धरणातील गाळ, सिंचन…

Read More

गुरुवार ११ जुलै | संगमनेर  ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावात, तालुक्यातील तीन घाटांमध्ये व ११ विविध डोंगरांवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन केले जात असल्याची माहिती अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. कारखान्याच्या वृक्षारोपणावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक…

Read More

गुरुवार, ११ जुलै, अहमदनगर  राज्यात कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी शासनाने शेतकऱ्यांसह संस्था आणि गटाकडून प्रस्ताव मागविले आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांचा समावेश आहे. २०२३ या वर्षासाठी हे अर्ज (प्रस्ताव) मागविण्यात आले असून शेतकरी, गट आणि संस्थेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जुलै पर्यंत आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या…

Read More

गुरुवार,११ जुलै गांजा तस्करी प्रकरणात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपजिल्हाप्रमुख राहिलेल्या महिला पदाधिकाऱ्यास तेलंगणा पोलिसांनी नाशिकच्या पंचवटी परिसरातून अटक केली आहे. नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मी ताठे असे या माजी महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तेलंगणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गेल्या महिन्यात ०८ जूनला १९० किलो गांजा पकडला होता, याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातच बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जून २०२३ मध्ये शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. पक्षातील काही पदांवरील नियुक्तीवरून लक्ष्मी ताठे आणि शोभा…

Read More

गुरुवार, ११ जुलै  संगमनेरच्या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक अल्कॉन कंपनीची अमेरिकन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी मशिनरी बसविण्यात आली असून या मशीनवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व्हावी यासाठी बाहेरगावी जावे लागत असे. आता मात्र या शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. प्रसिद्ध उद्योजक व मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या हस्ते या मशिनरीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी दर्शन रोटरीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. संगमनेर-अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी दर्शन रुग्णालयाने आतापर्यंत अतिशय उच्च दर्जाची सेवा दिली आहे. रुग्णालयामार्फत आतापर्यंत सुमारे २७ हजार मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून याचा लाभ समाजातील गोरगरीब वर्ग, तसेच दुर्गम भागातील रुग्णांनी…

Read More

बुधवार, १० जुलै | संगमनेर दीड वर्षाच्या चिमुकलीला शेताच्या बांधावर ठेवत चारा कापणीचे काम करणाऱ्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने चिमुकलीवर हल्ला चढवत तिला ठार करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा गावात बुधवारी संध्याकाळी घडली. ओवी सचिन गडाख (रा. हिवरगाव पावसा, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बिबट्याने चिमुकलीची मान आपल्या जबड्यात पकडत जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतली. चिमुकलीचा प्रतिकार अयशस्वी ठरला. जखमी अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष…

Read More

बुधवार, १० जुलै  फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (वय ५६ वर्ष) लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. लाच लुचपतच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या परिचित महिलेने क्रेडिट सोसायटीत पैसे दुप्पट करून देण्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी १७ लाख ५० हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले होते. उर्वरित दहा लाख रुपयांची रक्कम देण्यास संबंधित महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने सदर महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशाचे विचारणा केले तेव्हा महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक…

Read More

बुधवार, १० जुलै न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिपण्णी करत दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. कदम यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलाबा पोलीस पुढील तपास करत आहे. माजी आमदार रमेश नागनाथ कदम यांच्या तक्रारी नुसार २०१४ ते २०१९ यादरम्यान दहिसर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह लाच लुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात कदम यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस बंदोबस्तात न्यायालयीन सुनावणीसाठी कदम यांना सत्र न्यायालयात आणण्यात येत असताना २१ जानेवारी २०१६ रोजी…

Read More

अनंत पांगारकर  बुधवार, १० जुलै | संगमनेर  महावितरण कंपनीकडून सध्या वीज ग्राहकांची विज बिल आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या महावितरणच्या अंतर्गत चाळीस गावांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महावितरणच्या आशीर्वादाने कर्जुलेपठार अंतर्गत येणाऱ्या वीज उपकेंद्रात मोडणारी गावे दोन दिवसांपासून अंधारात आहे. या संदर्भात या भागातील नागरिक आणि संगमनेरमधील पत्रकार बाबासाहेब कडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिल्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम या भागातील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी दाखवत आपल्या बेजबाबदारीचे दर्शन घडविले आहे. वीज उपकेंद्र अंतर्गत मोडणारी गावे अंधारात असताना थोरात यांनी आपले दोन्ही मोबाईल स्विच ऑफ ठेवत जबाबदारी…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती तात्काळ भरण्यासाठी निवडणूक घेण्याच्या मागणी करिता राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी भेट घेतली. विधान परिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारीची दाखल घेत विधान परिषदेसाठी सभापतींची निवड घेण्यात यावी, या मागणीसाठी ही भेट घेण्यात आली, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना दिली. राज्यपालांची भेट घेताना दानवे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, सतेज (बंटी) पाटील, रमेश कोरगांवर, जयंत पाटील हे उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर मविआच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधान…

Read More