Author: अनंत पांगारकर

मंगळवार, २ जुलै राज्यातील महिलांना दिलासा देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने “मुख्यमंत्री –  बहिण माझी लाडकी”योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सतराशे साठ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर ही योजना नाही ना? असा प्रश्न संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. राज्यभरातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी, तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार १८…

Read More

शनिवार २९ जून नगर जिल्ह्यातील पोलीस, पोलिसांची पथके यांच्या सततच्या हप्तेखोरीमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची राळ उठवत छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲपद्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर शनिवारपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या मटका किंगमध्ये पुन्हा जुळवाजुळव झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद…

Read More

मंगळवार, २ जुलै नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार यांचा पराभव केला. कोल्हे दुसऱ्या स्थानी राहिले. दराडे (शिवसेना) यांना तिसऱ्या फेरी अखेर २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून ३२ हजार…

Read More

हृदयविकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे मोफत शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्पदरात उपलब्ध सोमवार, ०१ जुलै राज्यात सर्वात मोठ्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच सर्वसामान्य दर्जेदार उपचार मिळावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य साधना शिबिरास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शुभारंभ करत आज एसएमबीटीमध्ये सुरुवात झाली. शिबिरात बाह्य रुग्ण तपासणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदय उपचार, खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णतः मोफत करण्यात आली. याशिवाय तीन दिवस औषधोपचारासह बाह्य रुग्ण तपासणी देखील मोफत केली जाणार असून राज्यातील सर्वात मोठ्या या आरोग्य शिबिरात सलग तीन महिने…

Read More

सोमवार, १ जुलै  विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही यात समावेश आहे. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कोणाला संधी द्यावयाची याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू होते. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक इच्छुकांची नावे देखील समोर आली होती. मात्र पक्षात वारंवार डावलले जात असल्याने नाराज असलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील यात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आग्रही मागणी केली जात होती.…

Read More

मागणी अयोग्य असेल, लॅबचे रिपोर्ट चुकीचे असतील तर माझ्यासह लॅबवर गुन्हा दाखल करा श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांना पाठीशी कोण घालतंय? सोमवार १ जुलै  संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध अनेकदा तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केले आहे. संगमनेरमध्ये खाद्य तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने हे तेल खाण्यास अयोग्य आहे. आर्थिक फायद्यासाठी स्वतःची संपत्ती वाढविण्यासाठी लोकांचे जीव गेले तरी चालतील अशा वृत्तीने येथील व्यापारी खाद्य तेलात भेसळ…

Read More

३० टेबलवर होणार मतमोजणी, अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण रविवार, ३० जून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. १ जुलैला केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणीच्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदामात ३० टेबलवर होणार आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. तसेच मतमोजणी संदर्भातील आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संबंधित…

Read More

रविवार ३० जून  वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी सहा जणांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात नुकतीच शिर्डी लोकसभा निवडणूक लढविलेल्या उत्कर्षा रुपवते यांचा समावेश करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात रूपवते यांच्यासह दिशा पिंकी शेख, अरुण जाधव, सिद्धार्थ मोकळे व तय्यब जाफर यांचा समावेश आहे.  रुपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत तब्बल ९० हजारावर मते मिळविली. सुरुवातीला काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या रूपवते यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून ही जागा सुटू शकली नाही. माजी खासदारांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रवेश देत त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रूपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश…

Read More

रविवार, ३० जून  राज्याचा इतिहासात मुख्य सचिवपदी प्रथमताच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून आयएएस असलेल्या सुजाता सौनिक पहिल्या मुख्य महिला सचिव झाल्या आहेत. त्यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेतील. करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक…

Read More

रविवार, ३० जून  शिधापत्रिकेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका धारकाला संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी करणे रविवारपर्यंत बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत आलेल्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना आणखी वेळ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. या अनुषंगाने आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार यांनी रविवारी तहसीलदार मांजरे यांची भेट घेत या प्रक्रियेतील अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी धान्य प्रक्रियेतून मुकण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तहसीलदारांनी या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांना दिली. रविवारपर्यंत लाभार्थी कुटुंबांनी ई-केवायसी केली नाही तर एक जुलैपासून त्यांना मिळणारे धान्य बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र ई-केवायसी…

Read More