Author: अनंत पांगारकर
रविवार, ३० जून ब्रिटिश काळात बनवलेले कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन नवीन फौजदारी कायदे आणले होते. हे कायदे आता लागू होणार आहेत. या तिन्ही फौजदारी कायद्यांबाबत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवारपासून (१ जुलै) देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होत आहेत, हे तीनही नवीन कायदे सध्या लागू असलेल्या ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि १८७२ च्या भारतीय पुरावा कायद्याची जागा घेणार आहेत. या कायद्यांची नावे आहेत – भारतीय न्यायिक संहिता (BNS), भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) आणि भारतीय पुरावा कायदा (BSA). अशा परिस्थितीत या कायद्यांतून कोणते बदल होणार आहेत…
रविवार ३० जून बँकेच्या भरण्यामध्ये पाचशे रुपयांच्या तेरा बनावट मोठा आढळून आल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर (नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने या नोटा दिल्याची माहिती समोर येत असून पोलीस तपास करत आहेत. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्निल सुनील नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शाखेमध्ये सुबोध सुधीर रत्नपारखे (रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या भरण्यात ५०० रुपयांच्या १३ बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने…
रविवार, ३० जून दिवसरात्र राबूनही मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च झेपत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या अभागी पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगोला शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. हरिश्चंद्र सुभाष दौंडे (वय ५२) असे आत्महत्याग्रस्त पित्याचे नाव आहे. या संदर्भात त्यांचे नातेवाईक महेश दत्तात्रेय बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. मृत हरिश्चंद्र यांचा मुलगा ज्ञानमूर्ती हा बारामती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, तर मुलगी संज्योत पुण्यात विधी पदवीचे (एलएलबी) शिक्षण घेत आहे. हरिश्चंद्र हे एका बँकेत शिपाई पदावर सेवेत होते. दिवसा बँकेत आणि रात्री एका पेट्रोल पंपावर रखवालदाराची नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मुलांच्या…
काँग्रेस नेत्या आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणलेल्या २१ महिन्यांच्या आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव आणून भाजपने स्वत:ची खाज भागवून घेतलेली दिसते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या ३५२(१) या कलमाचा आधार घेत तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहंमद यांनी आणीबाणी लागू करायला संमती दिली आणि त्या दिवसापासून आणीबाणी लागू झाली. २५ जून १९७५ हा तो दिवस. मध्यरात्री रेडिओवरून या आदेशाची स्वत: इंदिरा गांधींनी घोषणा केली. या दिवशी लागू झालेल्या आणिबाणीला ४९ वर्षं पूर्ण झाल्याचं निमित्त करत सत्ताधार्यांनी निषेधाचा ठराव पारित करून स्वत:ची हौस भागवून घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याचं कारण भाजपच्या नेत्यांना आजही झोप लागू देत नाही. चारसौ पार…
शनिवार, २९ जून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार…
शनिवार, २९ जून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या संगमनेरमधील रवींद्र राधाकिसन डेंगळे याला अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून डेंगळे याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये हजर करण्यात आले आहे. रवींद्र राधाकिसन डेंगळे (वय ३५ वर्ष, रा. निमगावजाळी ता. संगमनेर जि. अहमदनगर हल्ली रा. सायखिंडीफाटा, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) याच्या विरोधात संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आश्वी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधे द्रव्य विषयक गुन्हेगार, व्हिडिओचाचे, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूच्या काळा बाजारात सामील असलेल्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबतच्या अधिनियम अन्वय धोकादायक व्यक्ती या मथळ्याखाली…
शनिवार, २९ जून गौण खनिज पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच अधिवेशन चालू असल्याने तातडीने काम बंद आंदोलन मागे घ्यावे अशा सूचना केल्यानंतर शनिवारपासून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती समजते. तर श्रीगोंदे प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री बैठक घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. श्रीगोंदे तालुक्यातील चवरसांगवी येथे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर झालेल्या आल्यानंतर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. जिल्हा तलाठी संघाच्यावतीने जिल्ह्यात…
शनिवार, २९ जून संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयाच्या गलथान आरोग्य सेवेची शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलखोल करत त्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर यासंबंधीचे वृत्त ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने शनिवारी सकाळी आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधितांची शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर व कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीची बैठक घेत संबंधितांचे चांगलेच कान उघडणी करत कामकाजाबाबत झाडाझडती घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांच्यासमोर सर्व कर्मचारी स्टाफ यांना भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होणार नाही…
बँक बचाव समितीचे ॲड. अच्युत पिंगळे यांच्या चिकाटी व अभ्यासपूर्ण प्रयत्नाला मोठे यश शनिवार, २९ जून नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी दोषी संचालकांवर आर्थिक नुकसानीचे जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्रीय निबंधकांचा हिरवा कंदील दाखविला असून बँकेच्या आवसायकांना या संदर्भात पुढील चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले आहे. बँक बचाव समितीचे ॲड. अच्युत पिंगळे यांच्या चिकाटी व अभ्यासपूर्ण प्रयत्नाला हे मोठे यश आल्याचे मानले जात आहे. भ्रष्टाचार करून बोगस व नियमबाह्य कर्ज पुरवठा करणे, रिझर्व बँकेचे आदेश धुडकावत बँक व ठेवीदारांच्या हिताविरुद्ध केलेले काम, कर्ज वसुली करिता प्रामाणिक प्रयत्न न झाल्याने नगर अर्बन बँक बंद पडली. बँकेचा मोठा आर्थिक…
मेडिकल ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा नाहीतर काळे फासू: अमर कतारी अनंत पांगारकर | शनिवार, २९ जून पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा होत असल्याची बाब शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समोर आणली असून यामुळे येथील आरोग्य सेवेची पोलखोल झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरसह काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. संगमनेरमधील कॉटेज रुग्णालयाची यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार ठरली आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळण सुरू असून यातून मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णांच्या नावानिशी तसेच झालेल्या प्रकारासंबंधी कतारी यांनी तक्रार केली असून…
