Author: अनंत पांगारकर
मंगळवार, १८ जून २०२४ राज्यभरातून २८ विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये १५० पैकी १३६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या साई घुगे याचादेखील यात समावेश आहे. एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा (बीटीएस) २०२४ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय असणारी ही परीक्षा राज्यात सुमारे २५० पेक्षा अधिक केंद्रांवर घेण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवीचे २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. साई सध्या नामांकित अशा सातारा सैनिक स्कूल येथे शिक्षण घेत असून त्याने आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक, मंथन, नवोदय तसेच बऱ्याच स्पर्धा…
तरुणांच्या भवितव्याशी सरकारचा पुन्हा खेळ; पोलीस भरतीची शारिरीक परिक्षा पावसाळ्यात घेऊ नका, सरकारने फेरविचार करावा. बोगस बियाणे व खतांचा राज्यात सुळसुळात, शेतकऱ्यांची फसवणूक व लूट, पण सरकारकडून मात्र दुर्लक्ष. काँग्रेसच्या यशामुळे घाबरलेल्या विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न मंगळवार, दि. १८ जून राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ॲड. उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा…
मंगळवार, १८ जून २०२४ आपल्या १९ वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात वीसपेक्षा अधिक बदल्यांना सामोरे जाणाऱ्या व प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने पुन्हा एकदा बदली केली आहे. मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. या बदलीमुळे मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंढे यांच्या रिक्त जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे देखील या आदेशात म्हटले आहे. मुंढे यांच्याकडे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन या खात्याच्या सचिवपदाचा पदभार होता. या पदावरून त्यांची बदली आता कमी महत्त्वाच्या असलेल्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई या पदावर करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत धडाकेबाज…
मंगळवार, १८ जून २०२४ शुक्रवारी (१४ जून) रात्री संगमनेर शहरालगत असलेल्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेचा संशयस्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यापाठोपाठ खून प्रकरण समोर आणण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेचा काटा तिच्या प्रियकरानेच काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळासाहेब बिरू हळणर (रा. आंभोरे ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. रंजना शिवाजी खेमनर (वय ३५ वर्ष, रा. अंभोरे तालुका संगमनेर) ही विवाहिता आपल्या सासूसोबत शुक्रवारी संगमनेरमधील रुग्णालयात सासूच्या डोळ्याच्या उपचारासाठी आली होती. सायंकाळी डबा आणण्याच्या निमित्ताने…
सोमवार, १७ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहकारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सोमवारी (ता. १७) भाजपकडून महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेसाठी प्रभारी व सह प्रभारींच्या नियुक्ती केली आहे. संघटनात्मक पातळीवर देखील निवडणुकानंतर फेरबदलाचे संकेत मिळत होते. नव्या प्रभारींच्या नियुक्तीमुळे फेरबदलास प्रारंभ झाला असल्याचे बोलले जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
सोमवार, १७ जून २०२४ विविध कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करत शारीरिक मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढण्याचा प्रकार कनकुरी (ता. राहाता) येथे घडला. या संदर्भात घुलेवाडी संगमनेर येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती यशोदीप बाबासाहेब शेटे, सासरा बाबासाहेब बबनराव शेटे, सासू वृषाली बाबासाहेब शेटे व दीर श्रेयस बाबासाहेब शेटे (सर्व रा. कनकुरी ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विवाहिता कनकुरी येथे सासरी नांदत असताना आरोपींनी तिला तिच्या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला नाही, आमचा मानपान नीट केला नाही, तुला घरातील कामे नेट येत नाही या कारणावरून शिवीगाळ करत शारीरिक व…
सोमवार, १७ जून २०२४ संगमनेर शहर पोलिसांनी दागिने चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेले दागिने फिर्यादी महिलेस परत करण्यात आले आहे. चोरी गेलेले दागिने परत मिळाल्याने महिलेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. संगमनेर शहरात दागिने चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. दागिने चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. आशा स्थितीतही दिलासादायक घटना समोर आली आहे. संगमनेर पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून या गुन्ह्यातील सोने हस्तगत केले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत केलेला मुद्देमालातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने तक्रारदार महिलेचे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ते संबंधित महिलेला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते शहर पोलिसांनी परत केले आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली…
सोमवार दिनांक १७ जून २०२४ शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात अचानक करण्यात आलेल्या तपासणींमध्ये बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या तर तीन ठिकाणी थेट गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग बियाणे खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. बाजारपेठेत कपाशी सोयाबीन कडधान्य पिकाच्या बियाण्यांना मोठी मागणी असून बियाण्यांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत.…
रविवार, दि.१६ जून २०२४ प्रवरेच्या विद्यार्थिनींचा शेततळ्यात बुडून झालेला मृत्यू दुर्दैवी असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिले. तीन शालेय विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर रविवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. मृत मुलींपैकी अनुष्का बढे आणि सृष्टी ढापसे या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यालयाच्या विद्यार्थीनी असल्याने या दुर्दैवी घटनेचे प्रवरा परीवारालाही दुःख झाले. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील घटनेच्या दिवशी दुख व्यक्त करून कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या…
रविवार, दिनांक १६ जून २०२४ शनिवारी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे तीन विद्यार्थिनींचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी रविवारी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शनिवारी शालेय नवीन वर्षाला प्रारंभ झाला. सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय- १३ वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय १२ वर्ष) आणि अनुष्का सोमनाथ बडे (इयत्ता चौथी, वय १० वर्ष) या शालेय विद्यार्थिनींचा शाळेतून परतून येत असताना गावालगत असलेल्या शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत…
