Author: अनंत पांगारकर

रविवार दिनांक १६ जून २०२४ शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची रिचा सेठी नावाच्या महिलेने ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे. या संदर्भात शुक्रवारी अहमदनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंगबाबत मेसेज आला होता. या मेसेजच्या अनुषंगाने फिर्यादीने संबंधित महिलेकडून शेअर ट्रेडिंग बाबत अधिक माहिती घेतली. त्याच दरम्यान महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करत शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. जास्तीचे पैसे मिळण्याच्या आमिषाने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेठी नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात…

Read More

रविवार दिनांक 16 जून 2024  केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले होते. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण इंडिया आघाडीचा पाठिंबा देण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा केली जाईल, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमत:च संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. या अधिवेशनात लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची…

Read More

रविवार, दिनांक १६ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम पुन्हा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झाले आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा ते सांगलीतील खटल्यासह राज्यातील महत्त्वाच्या खटल्यामध्ये कामकाज पाहणार आहे. ॲड. उज्वल निकम हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (महायुती) उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा राज्य विधी व न्याय विभागाकडे दिला होता. हा राजीनामा स्विकारण्यात आला होता. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे निकम पुन्हा त्यांच्याकडून खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणार का याची उत्सुकता होती.राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थकी नेण्यासाठी पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरं जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षानी घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी मुंबईत सयुक्त पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही निश्चितच परिवर्तन होईल असा दावा घटक पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. पत्रकार परिषदेत काय म्हणाले नेते … उद्धव ठाकरे म्हणाले – राज्यातील जनतेचे आभार मानले. देशातील जनता आता जागी झाली आहे. त्यांना खरेपणा, खोटेपणा यातला फरक कळतो.…

Read More

शनिवार, दिनांक १५ जून २०२४ पीडब्ल्यूडीचे अधिकारी, चार जेसीबी, चार ट्रॅक्टर, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर त्यांचा सर्व स्टाफ संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचा पुरुष व महिला पोलीस स्टाफ, पोलीस व्हॅन हा सर्व लवाजमा अकोले नाका येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्व नियोजन करून आला. म्हाळुंगी नदीच्या गाळपेर क्षेत्रात १९७५ पासून अनेक घरे, वस्ती करून राहतात. कोणी वेल्डिंग काम करतात, महिला धुण्या-भांड्याचे, कोणी गवंडीकाम तर कोणी भंगार गोळा करण्याचे काम करतात. सर्व सामान्य हातावरची माणसं. सरकारी यंत्रणा आल्यावर त्यांनी घरे पाडण्यास सुरुवात केली. आडवे आलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सरकारी यंत्रणेपुढे भयभीत होऊन शांत बसलेले लोक, चेहऱ्यावर…

Read More

एखाद्याला अहंकार जडला की तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अशा व्यक्तीला ‘ग’ची बाधा झाली असं म्हणतात. सत्ताधारी भाजपच्या अनेकांना या बाधेने पछाडल्याने त्यांचे कान उपटून काहीही साध्य होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बसलं खरं. पण त्याने मोदी आणि त्यांच्या पिळावलीशिवाय कोणीही समाधानी नाही, हेच आता सिध्द होतय. संघाचं मुखपत्र म्हणून ज्याची पूर्वांपार ओळख आहे त्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाने मोदी आणि त्यांच्या वाचाळ नेत्यांचे ओढलेले कान हेच सांगताहेत. त्याआधी संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी मोदी आणि त्यांच्या सत्ता परिवाराला असाच कानमंत्र दिला आणि असं वागणं नियतीला मान्य नाही, असं सांगून टाकलं. संघात सुरू असलेल्या खदखदीवरून मोदी आणि शहा…

Read More

शनिवार दिनांक १५ जून २०२४ संगमनेर शहरालगच्या कासारवाडी गावच्या शिवारात एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. दरम्यान मृत महिलेची ओळख पटली असून तिचा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. रंजना भिकाजी खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे या मृतावस्थेत आढळलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळून आलेली रंजना खेमनर ही महिला आपल्या सासूच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी तिच्या समवेत संगमनेरमध्ये आली होती. सासूसाठी जेवणाचा डबा आणण्याकरिता ती शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर पडली होती. रात्री उशिरा तिचा मृतदेह शहरालगतच्या कासारवाडी शिवारात आढळून आला. रुग्णालयात सासू जवळ विवाहिता नसल्याने…

Read More

शनिवार दिनांक १५ जून २०२४ शनिवारी दुपारी शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज पुन्हा दुसरी घटना तालुक्यात मेंढवन या गावात घडली आहे. अनुष्का सोमनाथ बडे (वय ११ वर्ष), सृष्टी उत्तम ठापसे (वय १३ वर्ष) आणि वैष्णवी अरुण जाधव (वय १२ वर्षे) अशी मृत झालेल्या तिन्ही मुलींची नावे आहेत. तिघीजणी शनिवारी दुपारी शाळेतून सुटल्यानंतर घरी आल्या होत्या. दुपारी जेवण करून त्या सोमनाथ बडे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेल्या होत्या. अर्धवट काम सुरू असलेल्या या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी साचले…

Read More

शनिवार, दिनांक १५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले असताना शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडला. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले जयप्रकाश मुंदडा हे काही काळ माजी सहकार राज्यमंत्री होते. मात्र गेल्या काही वर्षापासून पक्षात डावलले जात असल्याने ते नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपलं ऐकून घेतलं नाही.…

Read More

शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून गुरुवार पासून (२७ जून) अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. ते पुढील महिन्याच्या शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) चालणार आहे. तेरा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प देखील लगेचच २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. शुक्रवारी विधान भवनात विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More