Author: अनंत पांगारकर
सोमवार दि. १० जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी स्थानापन्न झालेल्या तिसऱ्या ‘रालोआ’ सरकारमध्ये महाराष्ट्राला उत्तरप्रदेश, बिहार पाठोपाठ संधी मिळाली आहे. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळाता सर्वाधिक नऊ मंत्री उत्तरप्रदेशमधील असून त्यापाठोपाठ बिहारमधूून आठ व महाराष्ट्रातून सहा जणांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपचे चौघे तर मित्रपक्षाच्या दोघांचा समावेश आहे. मोंदींच्या नव्या मंत्रीमंडळात शपथ घेणाऱ्यात भाजपकडून पीयुष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव व आरपीआय (आठवले) कडून रामदास आठवले यांचा समावेश आहे. भाजपाचे जेष्ठ नेते नागपुरचे खासदारर नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून निवडून आलेले खासदार पीयुष गोयल या दोघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर…
रविवार दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहे. देश विदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. असे आहे मोदींचे नवे मंत्रिमंडळ… नरेंद्र मोदी – पंतप्रधान यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ… राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी जगत प्रकाश नड्डा शिवराज सिंग चौहान निर्मला सीतारमन डॉ. सुब्रमण्यम जयशंकर मनोहर लाल खट्टर एच. डी. कुमारस्वामी पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान जितनराम मांझी राजीव रंजन सिंग सर्वानंद सोनोवाल डॉ. वीरेंद्र कुमार किंजरापू राम मोहन नायडू…
https://www.youtube.com/live/Uz4rSjiXUI0?si=U-DsVsqMVmOcoQgb
रविवार, दिनांक ९ जून २०२४ केंद्रात सत्ता स्थापन करण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत केंद्रात एनडीएचे (NDA) सरकार स्थापन करत आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू पंतप्रधान आणि नव्या मंत्र्यांना राजभवनात शपथ देतील. पंतप्रधान मोदींनी बहुमताचा आकडा गाठत आपले संख्याबळ २९३ वर नेले आहे. यात एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या २४० एवढी असून त्या खालोखाल भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयु खासदारांची संख्या आहे. एक नजर भाजपाच्या मित्र पक्षांच्या खासदार संख्येवर… यांच्या बळावर मोदी पंतप्रधान भाजपा – २४० टीडीपी – १६ जेडीयु – १२ शिवसेना (शिंदे) – ०७ एलजेपी (आर) – ०५…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाला आज सुरुवात होत आहे. आज सायंकाळी मोदी रालोआ सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेत असून त्यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यातील सहा जणांना संधी मिळण्याची चिन्हे असून दोघा मंत्र्यांना डच्चू दिल्याचे बोलले जात आहे. यांचा पत्ता कट … मोदी सरकार – २ मध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योग खाते असलेले मंत्री नारायण राणे यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार नसल्याचे समोर येत असल्याने त्यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता मावळली आहे. राणे यांच्यासोबतच अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ बारावी पास झाल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी केजच्या रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. बीडच्या लाचलुचपत शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. धनराज सखाराम सोनवणे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदाराने बारावी पास शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. या अर्जावरून शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत शाखेचे बीडचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ तक्रारदाराच्या शेताच्या पांदण रस्त्याचे काम करून घेण्यासाठी, काम झाल्यावर बिल मंजूर करण्याकरिता मदत करण्यासाठी व रस्त्याच्या कामात कोणतेही अडचण न येण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये लाचेची मागणी करत त्यापैकी ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका दुकानदाराला ताब्यात घेतले. सरपंच, उपसरपंचासह याप्रकरणी यवतमाळमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरुडखेड पिंपळगाव (यवतमाळ) ग्रामपंचायतचे सरपंच निलेश प्रकाश राऊत, उपसरपंच गजानन तुळशीराम मनवर यांच्यासह खासगी इसम रमेश आनंदराव कुटे पाटील, मुकुल घनश्याम राऊत व घनश्याम बाबाराव राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लाचेची रक्कम सरपंच निलेश राऊत यांना देण्यासाठी तक्रारदार…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बडा थकबाकीदार कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित यांनी जामिनावर मुक्तता होताच १५ दिवसांच्या आत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात जमा केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात संगमनेरमधील कर्जदार आरोपी म्हणून उद्योजक अमित पंडित यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक देखील केली. तब्बल दोन महिन्यानंतर पंडित यांना न्यायालयाने काही अटींवर एक लाख रुपयांचे वैयक्तिक जात नसेल त्यावर तीन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामिनावर मुक्तता होताच पंडित यांनी पंधरा दिवसाच्या आत दोन कोटी रुपये व…
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ, शपथविधी सोहळ्याला हे परदेशी पाहुणे उपस्थित राहणार!
रविवार, दिनांक ९ जून २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे. मोदी यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा देखील शपथविधी होत असून या खास सोहळ्याला सुमारे आठ हजार पावणे उपस्थित राहणार आहे यात परदेशी पाहुण्यांचा देखील समावेश आहे. भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशाच्या सन्माननीय प्रमुखांना या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे अध्यक्ष रानी विक्रम सिंगे मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा, भुतानच्या पंतप्रधानांस अन्य काही राष्ट्राच्या प्रमुखांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे या…
मतदारांना गृहित धरणं किती घातक असतं हे भाजपच्या नेत्यांना कळलं असेल तर चांगलंच होय. कोणत्याही कर्तुत्वाशिवाय ‘अबकी बार चारसो पार..’चा नारा देताना आपण मतदारांनाही गृहित धरतो आहोत, याची जाण या पक्षाच्या नेत्यांनी ठेवली नाही. डोक्यात गेलेल्या हवेने ते बेफाम झाले होते. मागचा पुढचा विचार करण्याची त्यांची तयारीच नव्हती. सत्ता हे त्यांचं एकमेव साधन आहे. यासाठी संपत्तीचा आणि यंत्रणांचा वापर करत आपण कोणालाही विकत घेऊ शकतो, या मस्तीने त्यांच्या डोक्यात घर केलं होतं. याच मस्तीत भाजपच्या नेत्यांनी देशात नंगानाच सुरू केला होता. त्यांच्या पक्षाचा सामान्य कार्यकर्ताही नेत्यांच्या अशा वागण्याने हैराण झाला होता. जमीन सोडून वागणार्या नेत्यांना रस्त्यावर उतरवणं आवश्यक होतं, असं…
