Author: अनंत पांगारकर

गुरुवार, दि. २ मे देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बिअर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजाराची लाच घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाच लुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला. खलील खुर्शीद शेख (वय ४० वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर, कोपरगाव, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) असे लाचखोर भरारी पथकाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शेख याच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कोपरगावमध्ये ही कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या सापळा पथकात…

Read More

गुरुवार, दि. २ मे  लोकसभा निवडणुकीचे वातावरण राज्यात चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर राज्यात प्रचार सभांनी आता मोठा वेग घेतला आहे. पंतप्रधानांपासून राज्यातील बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते, भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांना देखील राज्यातून मोठी मागणी असून काँग्रेससह महाविकास आघाडीचा किल्ला राज्यात ठीक-ठिकाणी लढवितांना थोरात दिसत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील निवडणुका पार पडल्या. या मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली येथे थोरात यांच्या प्रचार सभा झाल्या. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस…

Read More

बुधवार दि.१ मे – संगमनेर आता मनातील किंतु-परंतु नको, मी पालकमंत्री आहे माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. उगीच लाईटली घेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका, शंभर टक्के काम करून संगमनेरमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजेत. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. गटातून मताधिक्य मिळणार नसेल तर उमेदवारी मागू नका असा थेट इशाराच राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभासाठी मंत्री विखे बुधवारी आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, निवडणूक थोड्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे.…

Read More

शिर्डी, बुधवार – दि. १ मे  शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.‌ निवडणूक पोलीस निरीक्षक यांचा पत्ता शिर्डी शासकीय विश्रामगृहातील कृष्णा कक्ष आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९०२२०१४२०३ व ई-मेल आयडी shirdipoliceobserver@gmail.com असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून प्रियांका आठरे (महिला पोलीस उपनिरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय विश्रामगृहात सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील. असे निवडणूक निर्णय…

Read More

बुधवार, दि.१ मे – पाथर्डी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे या भाजपमधील आमच्या सारख्या जुन्या निष्ठावंतांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सोमवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर म्हणाले, विखे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून त्यांच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावले नाही. त्यांचे साडेतीन कार्यकर्तेच त्यांचा कारभार पाहतात. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी भाजपचे काम करतो मात्र माझ्यासह जे पंकजा मुंडे यांचे काम करतात त्यांना भाजपमध्ये नंतर आलेले राजळे व विखे हे सातत्याने डावलण्याचे काम करतात. ह्या दोघांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शेवगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी…

Read More

बुधवार, दि.१ मे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या भरारी पथकाच्या हाती निवडणुकीआधीच मंगळवारी मोठ घबाड लागलं आहे. मुंबईत भरारी पथकाने केलेल्या दोन मोठ्या कारवाया केल्या आहे. सायनमध्ये केलेल्या कारवाईत एका कारमधून कोट्यावधी रुपये जप्त केले. तर आदल्या दिवशी सोमवारी दुपारी दादरपूर्व भागात शिंदेवाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३० एप्रिल) निवडणूक भरारी पथकाला सायन परिसरातील एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई करत कारमधून तब्बल १ कोटी ८७…

Read More

अहमदनगर – बुधवार, दि.१ मे निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी अहमदनगरमधील एका हॉटेलमधून साठ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकासह अन्य दोघांचा समावेश असल्याचे बोलले जाते. निवडणूक शाखेचे भरारी पथक अधिकारी शहानवाज तडवी यांना काही लोक निवडणुकीच्या संबंधाने हॉटेल यश ग्रँड मध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जात रूम क्रमांक ४०२ मध्ये ही कारवाई केली. दरम्यान भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत प्रत्येकी २० हजार रुपयांची तीन पाकिटे आणि दोन मोकळी पाकीट जप्त केली. या पैशाचा हिशोब देता…

Read More

मंगळवार, दि.३० एप्रिल  अवघ्या तेरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक पदाधिकारी मिळेल तिथे बोलण्याची संधी सोडत नाहीत, याच पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना यात्रेत बोलण्यास विरोध झाल्याने त्यांना तेथून निघून जावे लागले. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार प्रचारात दंग असले तरी कार्यकर्त्यांची मात्र त्यांना अद्यापही म्हणावी अशी फारशी साथ मिळत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उमेदवाराकडून पूर्ण होत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवाराबाबत हे चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या तेरा दिवसात सर्वप्रमुख उमेदवारांची…

Read More

वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत… मंगळवार, दि.३० एप्रिल देशभरात सुरू असलेला ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्याय व्यवस्थेमधील दबाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, राज्या-राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, देशभरात निर्माण झालेली अस्थिरता यामुळे देशात भाजप विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळू शकणार नाही. याचबरोबर राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी ४० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते.…

Read More

मंगळवार, दि.३० एप्रिल तब्बल गेली १५ वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर, सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे… योगिता आणि तीचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच…

Read More