Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर | सोमवार, दि.२९ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिर्डी आणि अहमदनगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे या मतदारसंघातील लढती चर्चेत आल्या आहे. शिर्डीमध्ये दोघांनी तर अहमदनगरमध्ये तब्बल अकरा जणांनी माघार घेतल्याने शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उतरले आहे. दोन्ही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. दोघात तिसरा आल्याने या मतदार संघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या…
शिर्डी, सोमवार, दि.२९ एप्रिल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी…
सोमवार, दि.२९ एप्रिल राज्यात दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पुढच्या टप्प्यातील प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सभांचा धडाका लावला असताना सोमवारची पुण्यातील त्यांची सभा एका सुशिक्षित बेरोजगार तरुणामुळे चर्चेत आली आहे. पुणे शिरूर बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महा विजय संकल्प सभेचे पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर आज (सोमवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी जवळपास दोन लाखावर लोकांची उपस्थिती राहील, या दृष्टीने सभेची जय्यत तयारी आठवडाभरापासून सुरू होती. यातच आता एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने या परिसरात लावलेले फ्लेक्स चर्चेत आले…
भाग – ४ | प्रवीण पुरो एखाद्या व्यक्तीने किती खोटं बोलावं याला काही मर्यादा असतात. महत्वाच्या पदावर असणार्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द ताऊन सुलाखून व्यक्त झाला पाहिजे. वाह्यात बोलणं संकटात टाकू शकतं. बेरक्या माणसाला त्याचं काही वाटत नसलं तरी अशा व्यक्तीमुळे पदाची आणि देशाचीही गरीमा खालावते. देशाच्या प्रधान मंत्र्याने वा राष्ट्राध्यक्षाने तर अशावेळी कमालीची सजगता राखली पाहिजे. सरकारचा प्रमुख म्हणून तर त्याच्या सहकार्यांचंही माप अशा जबाबदार व्यक्तीकडे असतं. दुर्देवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानाने या सार्या गोष्टीला फाटा देत देशाचं नाव जगभरात काळवंडलं आहे. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेणार्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या थापेबाजीची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात आपल्या या चौकीदाराची…
शनिवार, दि.२७ एप्रिल सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. एकीकडे उन्हाचा पारा उच्चांकाकडे सरकत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुक प्रचार देखील तापू लागला आहे. अशा स्थितीत संगमनेर करांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून संगमनेरची अमृतवाहिनी असलेली प्रवरा नदी महिनाभर वाहती राहणार आहे. त्यामुळे उन्हाच्या आणि निवडणुकीच्या गर्मीमध्ये पाण्याचा थंडावा मिळणार आहे. उन्हाळी हंगामातील पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी प्रवरा नदीपात्रात १३५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे शेती पिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. महिनाभरासाठी हे आवर्तन असल्याने प्रवरा नदी वाहती राहणार आहे. ऐन उन्हाची लाही-लाही त्यातच लोकसभा निवडणुकीचा चढलेला ज्वर यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वातावरण…
शनिवार, दि.२७ एप्रिल अनेक दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या पुनम महाजन यांच्या तिकीट कापत भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत निकम यांची लढत होईल. भाजपने शनिवारी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुनम महाजन इच्छुक होत्या. मात्र भाजपकडून महाजन यांना शेवटपर्यंत वेटिंगवर ठेवत अनपेक्षितरित्या उज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाजन यांना मतदारसंघात असलेला मोठ्या प्रमाणातील विरोध हे त्यांचे तिकीट कापण्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. भारतीय जनता पक्षासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात असल्याने…
शनिवार, दि.२७ एप्रिल काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे…
शनिवार दि. २७ एप्रिल सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक…
शनिवार दि.२७ एप्रिल देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं, त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार? असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्षच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे,…
अहमदनगर, शुक्रवार दि.२६ एप्रिल शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी नंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननीमध्ये हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), विश्वनाथ श्रीरंग शेळके (अपक्ष), छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर छाननी नंतर निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे… उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन…
