Author: अनंत पांगारकर
शनिवार दिनांक ६ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी मी इच्छुक होतो. मात्र माझ्या उमेदवारीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध केल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला. शिर्डीच्या जागे संदर्भात आठवले म्हणाले, मी शिर्डीतून लढण्यास तयार होतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा दाखला देत भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) अनेक नेत्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने त्यांना केल्या. निवडणूक जिंकू शकणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी हा प्रमुख…
शनिवार दि. ६ एप्रिल, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र बदल्या होऊन देखील वर्षभराचा कालावधी उलटूनही या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अद्यापही कार्यमुक्त न केल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेली तक्रार गंभीर स्वरूपाचे असल्याने यासंदर्भात नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. बदली होऊन देखील या सतरा कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे…
शुक्रवार दि. ५ एप्रिल, अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून पकडलेला ७३ लाख २४ हजार ५०० रुपयांपैकी ६९ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या रकमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे ही रक्कम सोपविण्यात आली तर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपयांसंदर्भात योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने हे रक्कम बोल्हेगाव (नगर) येथील संबंधित व्यक्ती विजय कृष्णा भगत यांना सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. यादरम्यान नगरच्या स्थानिक…
शुक्रवार दि. ५ एप्रिल लोकसभा निवडणुक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश दिले आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजेच ११ ते १३ मे या कालावधीत व मतमोजणीच्या दिवशी ४ जूनला पूर्ण दिवस कोरडा पाळण्याचा आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्याच्या सीमेसह लगतच्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहे.…
शुक्रवार दि. ५ एप्रिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मनसे भाजप युती होऊ शकते ही चर्चा अद्यापही कायम आहे. मात्र अद्यापही त्यासंदर्भात निर्णय होताना दिसत नाही. ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर नेमकं “काय घडलंय आणि काय घडतय” याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या व मनसेच्या एक्स (X) हँडलवरून मनसैनिकांना साद घातली आहे. येत्या नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी दादर मधील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या…
शुक्रवार दि. ५ एप्रिल आदिवासी कुटुंबातील १ वर्षाच्या चिमुरडीचे झोपेत झोळीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अहमदनगरच्या अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी सुनील मेंगाळ असे अपहरण झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. आदिवासी समाजातील शेतमजूर असलेले सुनील मेंगाळ हे आपल्या कुटुंबीयांसह बेलापूर (ता. अकोले) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण उरकल्यानंतर त्यांच्या पत्नीने चिमुरड्या वैष्णवीस दूध पाजल्यानंतर घरात बांधलेल्या झोळीत तिला झोपविले होते. त्यानंतर मेंगाळ दांपत्यही झोपी गेले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या सुनील मेंगाळ यांना झोळीमध्ये वैष्णवी झोपलेली असल्याचे दिसून आले. तर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वैष्णवीला…
गुरुवार दि. ४ एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आले यात आणखी दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून मेटे यांच्या ऐवजी बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेटे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र पवार यांच्या भेटीनंतर लगेचच…
गुरुवार दि. ४ एप्रिल दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व…
गुरूवार दि. ४ एप्रिल भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत असतात. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा बंद पडतात. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप करण्यात आलेल्या २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील तिघांना तर पूर्णतः क्लीन चिट मिळाली तर २० जणांच्या चौकशा थांबल्या आहेत. पार्टी विथ डिफरन्स, न खाऊंगा न खाणे दूंगा! या भाजपाच्या भूमिकेचा बुरखा यामुळे फाटला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने भाजप प्रवेशानंतर स्वच्छ झालेल्या नेत्यांसंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात देखील गेले. यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या विरोधी…
मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे. अंबादास शांताराम शिंदे, (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून…
