Author: अनंत पांगारकर
बुधवार दि. २७ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सातवी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकच नाव जाहीर करण्यात आले असून अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आले आहे. राणा यांच्या उमेदवारीला मित्रपक्ष शिवसेना, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्यासह स्वपक्षियांचा देखील मोठा विरोध होता. हा सर्व विरोध धावून रामा यांना संधी देण्यात आली आहे. नवनीत राणा या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या.
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर चेअरमन भाऊसाहेब कुटेसह त्याच्या नातेवाईकांनी तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलेल्या बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेची मोठी अपडेट समोर आली आहे. मोठ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा सिलसिला कायम राहिला आहे. या घोटाळ्यातील चेअरमन भाऊसाहेब कुटे याचे नातेवाईक असलेले कर्जदार आरोपी अजित कृष्णराव कदम व सुजित कृष्णराव कदम या दोघांचा अटकपूर्व जामीन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी नाकारला आहे. ऑगस्ट २०२३ पासून पोलिसांना गुंगारा देणारे आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या, समाजात व्हाईट कॉलर म्हणून मिरविणाऱ्या या गुन्हेगारांना न्यायालयाने बेल नाकारल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा त्यांना पकडून जेलमध्ये टाकणार का? असा…
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरापासून सातत्याने संगमनेरमध्ये घडत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडताना दिसते. यामागील कारणांचा शोध घेत प्रशासनाने आता कारवायांचा धडाका लावला आहे. पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौज फाट्यासह पोलिसी कारवाईचा मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. आरटीओला मदतीला घेत शहरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली. दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बस स्थानक अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार ६४ वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या. सकाळपासून विविध कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आल्या. आरटीओ विभागाच्यावतीने देखील अवैध वाहनांवर कारवाया…
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडलेल्या घटनांमुळे संगमनेर पुन्हा एकदा दंगलीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. स्थानिक प्रशासनाला ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यानेच की काय, थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांना संगमनेरमध्ये येऊन पोलीस दलासोबत रूटमार्च काढत प्रशासन सतर्क असल्याचे त्यांना संगमनेरकरांना सांगावे लागते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रूटमार्च काढला असला तरी देखील यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा रूट मार्च काढला नव्हता. एकूण परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणुका, रमजान, शिवजयंती उत्सव अशा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दंगलींमुळे होळपळलेल्या सुज्ञ संगमनेरकरांना शांतता हवी आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, व्यापारी, उद्योजक, संगमनेरकर नागरिक आणि विविध पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी…
बुधवार दि. २७ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील उमेदवारांसह राज्यातील उमेदवार जाहीर करण्यात आल्याने या जागा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीतून शिवसेनेने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरे यांनी शिवसेनेचे गद्दारी करत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. वाकचौरे यांच्या गद्दारीचे पडसाद त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमटले होते परिणामी अवघ्या १७ दिवसात या मतदारसंघाचे खासदार होण्याची संधी शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मिळाली होती. मधल्या काळात वाकचौरे यांनी भाजपचे कमळदेखील…
मंगळवार दि. २६ मार्च संशयित व्यक्ती स्वतःच्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त होताच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात विक्रीच्या उद्देशाने कुलरमध्ये एका गोणीत दडवून ठेवलेला ३ किलो ९८० ग्रॅम वजन असलेला सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या अवैध यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई सत्र सुरू आहे. शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयित व्यक्ती सादिक शेख राहणार नवीन बाजारतळ तालुका शेवगाव हा कब्जात…
मंगळवार दि. २६ मार्च, अहमदनगर नगर अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळा प्रकरणी समाज माध्यमामध्ये यातील आरोपी दिलीप गांधी आणि संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित यांच्या बद्दल वक्तव्य करणारी बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे या पोस्टमध्ये… एक अमृतवाहीनी बँकेचा चेअरमन तर दुसरा नगर अर्बन बँकेचा चेअरमन, बँकींग कायदे नियम सगळे चांगलेच माहीत असलेल्या. परंतु त्या नियमांचा गैरफायदा कसा घ्यायचा याकडे लक्ष… अमित पंडीतने कॉसमॉस बँकेचे ९ कोटीचे कर्ज काढले व थकविले. कर्ज जाणीवपुर्क थकवायचे व नंतर बँकांना ब्लँक मेल करायचे मला एकरकमी सवलत द्या तरच मी पैसे भरतो अशी भाषा…
मंगळवार दि. २६ मार्च, संगमनेर संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनांच्या आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. संगमनेर-अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश असून अनिकेत गजानन मंडलिक (माळीवाडा, संगमनेर), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (कोळवाडे ता. संगमनेर), संजय अदालतनाथ शुक्ला (राजुर ता. अकोले), वरद लक्ष्मण लोहकरे (जनतानगर, संगमनेर), लाल्या उर्फ अल्ताफ शेख (कुरण ता. संगमनेर), सचिन मस्कुले व अतुल कोल्हे (दोघे रा. धांदरफळ…
मंगळवार दि. २६ मार्च, संगमनेर संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. संगमनेर-अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश असून अनिकेत गजानन मंडलिक (माळीवाडा, संगमनेर), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (कोळवाडे ता. संगमनेर), संजय अदालतनाथ शुक्ला (राजुर ता. अकोले), वरद लक्ष्मण लोहकरे (जनतानगर, संगमनेर), लाल्या उर्फ अल्ताफ शेख (कुरण ता. संगमनेर), सचिन मस्कुले व अतुल कोल्हे (दोघे रा. धांदरफळ ता. संगमनेर) अशी…
सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गुरुवारी (२८ मार्च) संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणातून शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापासून संगमनेरात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे येथील शांततेला गालबोट लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी संगमनेरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने योग्य ती सतर्कता बाळगत मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला…
