Author: अनंत पांगारकर

संगमनेर – पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये नैपूण्य दाखवणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले. जम्मु-काश्मिरमध्ये झालेल्या ९ व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करताना ३५ सुवर्णसह तब्बल ४५ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे. स्पोर्ट्स डान्सच्या वैयक्तिक प्रकारात ९ वर्षांखालील गटात तेजस्विनी क्षितीज मोहापात्रा हिने हर हर गंगे नृत्य सादर करीत सुवर्ण पदक मिळवले. १३ वर्षांखालील गटात रित चेतन राजपालने राधाराणी नृत्यावर तर, १७ वर्षांखालील गटात सौम्या सचिन जोशीने सुवर्ण पदक मिळवताना शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावला. युगल प्रकारातही हाच…

Read More

रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका… काँग्रेसने अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप काही दिले मात्र आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की ज्यामुळे चव्हाण यांना काँग्रेसच सोडावी लागली? चव्हाण यांच्यावर काही दबाव होता का? असा सवाल उपस्थित करत ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असावेत, अशी थेट सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार…

Read More

संगमनेर – राज्याचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला-युवतींचे सबलीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून ८ ते १० मार्च दरम्यान युवती व महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती एकविराच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. थोरात म्हणाल्या, ८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त संगमनेर तालुक्यात महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. सर्व क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. गतवर्षी महिला क्रिकेटमध्ये आयपीएल सुरू झाला. त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महिला दिनाच्या…

Read More

अहमदनगर – नेवासा येथील संशयित आपल्या साथीदारांसह नगरमध्ये गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दबा धरून बसलेल्या नगर एलसीबीच्या पथकाने तिघा जणांना गावठी कट्यासह पकडले असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लखन भाऊसाहेब आल्हाट, लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे व अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (तिघे रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हवाई दरीत्या शास्त्रीय बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.…

Read More

मुंबई -माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली. चव्हाण यांच्या निर्णयामुळे पक्षातील अनेक जण व्यथित झाले असून चव्हाण यांच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चव्हाण यांच्यासोबत अनेक नेते काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षात अंतर्गत हालचाली वेगात सुरू झाल्या असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहे. तेथे ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील तत्पूर्वी ते छत्तीसगड मध्ये खासदार राहुल गांधी यांना भेटून या संदर्भात माहिती देतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत काँग्रेस एक संघ…

Read More

संगमनेर – काँग्रेसला मोठा धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. आपल्या राजीनाम्यासंदर्भात चव्हाण यांनी ‘एक्स’वर माहिती दिली असून येत्या १५ फेब्रुवारीला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालट सुरू असून चव्हाण यांच्यासोबत आणखी कोण आमदार भाजपच्या वाटेवर आहे याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्या संदर्भात उपमुख्यमंत्री…

Read More

संगमनेर – अहोरात्र काबाडकष्ट करणारी आई, जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपल्या जीवनातील आदर्श असावे. त्यांना आदर्शस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय व स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग यांनी केले. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात कडलग बोलत होते. स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव खुळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य श्रीकांत माघाडे, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन, बबन दिघे, विजय वामन, रंगनाथ खुळे, राम दिघे, चांगदेव वामन, खुळे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कडलग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके…

Read More

पुणे – भाजपाच्या विचारांच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. यापूर्वी लोकांना फारसा माहिती नसलेला ईडी हा शब्द आता भाजप सरकारच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली चौकशीअंती यात सत्यावर आधारित केवळ २५ खटले निघाले. त्यापैकी अवघ्या दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय जे आज पक्ष सोडून विकासासाठी भाजपसोबत गेले असे सांगत आहेत, त्यात तथ्य नसून काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक असल्याचं सांगत…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होतं ते झालं. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या ताब्यात गेली. पवारांसमोरची राजकीय स्पर्धा संपली, असं भाजपच्या नेत्यांना वाटलं असेल. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्या पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची तयारी आहे. महाराष्ट्र त्यासाठी सुपिक क्षेत्र. ईडी आणि सीबीआयच्या धाकाने कोणालाही वाकवता येतं हे अमित शहांना ठावूक आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांसारखा नेता असेल तर ते अधिक जलद घडवता येऊ शकतं, याची खात्री असल्याने अशा काळ्या राजकीय खेळासाठी भाजपने महाराष्ट्राची निवड केली. दिली जबाबदारी फडणवीसांनी यथोचित पार पाडली. शिवसेनेची दोन शकलं झाली. बापाची मालकी गेली. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. काकांच्या मालकीचा पक्ष पुतण्याने…

Read More

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारण्यांमध्ये गोळीबाराच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील घटनाबाह्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यानंतर आता हीच मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आली आहे. ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले,…

Read More