Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर दि. ६, संगमनेर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते अमोल खताळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी खताळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी खताळ यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या समितीत सदस्य म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तर सचिव म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार काम बघतात. शासनाच्या विशेष सहाय्य योजना अंतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई, दि. ५ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून देण्यात आली. जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा); शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख – सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख – राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा), दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह सतीश देशमुख, सदाशिव साबळे, ज्योतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वदक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे या प्रमुख नेत्यांसह शेकडो दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने दूध…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑगस्टमध्ये समोर आलेल्या संगमनेरच्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या देवळाली प्रवरा येथील कृष्णराव कदम आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. आत्तापर्यंत न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या पाठोपाठ आता कदम दाम्पत्याचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अद्यापही या आरोपींपर्यंत पोहोचू शकले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. न्यायालयात मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले जात असताना आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी या व्हाईट कॉलर गुन्हेगारांना हात न…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर उपविभागातील संगमनेर-अकोले तालुक्यातील रिक्त असलेल्या १५१ गावांमधील पोलीस पाटीलपदाच्या समांतर आरक्षणासाठी येत्या ७ डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील रिक्त पदांवर पोलीस पाटील नेमण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त असलेल्या जागांवर प्रचलित शासन तरतुदीनुसार प्रवर्गनिहाय आरक्षण निर्धारित करावयाचे असून त्या अंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढण्यासाठी प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकार्यांनी केले आहे. रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या गावांची नावे प्रांताधिकारी कार्यालयात उपलब्ध…
मुंबई @ प्रवीण पुरो (9869991868) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बॅकफुटवर गेलेल्या भाजपने दोन समाजात तेढ निर्माण करून स्वत: मात्र पध्दतशीर नामेनिराळं राहण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा मोर्चांची राळ सुरू होती तेव्हाही भाजपने मराठा समाजाला इतरांच्या अंगावर सोडून स्वत:ला वेगळं ठेवलं. तेव्हा मराठा समाजातील भाजपला मानणारे याला कारणीभूत होते. आता महायुतीच्या सरकारमध्ये बसलेले मंत्री छगन भुजबळ जबाबदार ठरत आहेत. आपल्यावरचं संकट इतरांवर टाकण्यासाठीची ही खेळी भाजपने पध्दतशीरपणे खेळली आहे. यासाठी त्याने आता छगन भुजबळ यांचा उपयोग करून घेतल्याचं दिसतं. भुजबळ यांच्या या खेळीमागे ओबीसींवरचं प्रेम वैगेरे काहीही नाही. सत्तेत राहूनही अटकेचं संकट टाळणं हेच यामागचं कारण होय. मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देण्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणी प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत शनिवारी (२ डिसेंबर) मालेगाव न्यायालयात उपस्थित झाले. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला. आता या खटल्याची सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी बदनामी केल्याच्या कारणावरून मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. भुसे यांनी दाखल केलेल्या या दहाव्याच्या सुनावणीत खासदार राऊत आत्तापर्यंत दोनदा न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वॉरंट काढले होते. राऊत शनिवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांच्या…
अमृतवाहिनी सहकारी बँकेची ऑनलाइन प्रणाली कौतुकास्पद महाराष्ट्र संवाद न्यूज बँकिंग हा विषय आज प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा झाला आहे. ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसाला मोठा आर्थिक आधार दिला. आता बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य ठरला असून या क्षेत्रात अमृतवाहिनी सहकारी बँकेने केलेले काम कौतुकास्पद ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने संगमनेरमध्ये ‘असोसिएशन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. प्रशिक्षक लेखापरीक्षक अक्षय भाटे, उद्योजक राजेश मालपाणी, असोसिएशनचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र संवाद न्यूज गावठी कट्टा आणि दोन राऊंड सोबत बाळगत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या श्रीरामपूरमधील व्यक्तीला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा आरोपीने जवळ बाळगण्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अज्जू उर्फ अजीम अन्वर पठाण (वय 26 वर्ष, रा. वार्ड नंबर 1, मिल्लतनगर, श्रीरामपूर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी वडगाव पान ते समनापुर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज गुरुवारी शनिशिंगणापूर दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या संगमनेर पोलिसांनी परिसरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी व नाकाबंदी सुरू केली असताना त्यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली…
