Author: अनंत पांगारकर
शाळा बंद करण्यापूर्वी स्थानिकांचा विचार घ्यावा शिक्षणाचा मूलभूत हक्काची पायमल्ली होऊ नये महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे गोरगरिबांची वाडी-वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मूलभूत शिक्षण हक्काची पायमल्ली होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विचार घेतला पाहिजे. सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. कमी पटसंख्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दिलेल्या प्रसिद्धी…
गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला : शिवाजीराव लहारे महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : स्वाभिमानी गणेश परिसरासाठी मंगळवारी (ता. २६ सप्टेंबर) घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सभा:…
न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते लक्ष महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या सहकारावर अविश्वासाचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सरकारी वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर फेटाळण्यात आला तर अन्य चौघांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी मंगळवारी मंजूर केला. तपास अधिकारी, ठेवीदारांच्या भूमिकेकडे लक्ष: गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुठे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर हरकत घेत युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे…
इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक रस्त्यावर लखलखाट होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवेचे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) सायंकाळी 5 वाजता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मार्गदर्शनातून इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा मॉडेल रस्ता तयार झाला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासह दुतर्फा पादचारी मार्ग आहेत. मध्यभागी डिव्हायडरसह विविध वृक्षांचे रोपण केले…
संगमनेर कारखाना देणार कार्यक्षेत्रातील ऊसाला 2835 रुपयांचा भाव महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सरकार गेलं आणि आपल्याला त्रास सुरू झाला. तालुक्यातील विकास काम बंद केले गेले. दहशत निर्माण करून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतीने येथील विकास थांबणार नाही. ते मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यांची उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्वास जपण्याचा संदेश देणार्या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय लोकशाहीचे चार खांब केव्हाच निखळले आहेत. अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेलच यावर जसा न्यायालयावर भरवसा राहिलेला नाही तसं प्रशासन मागणीप्रमाणे हलेल यावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही. सरकार मतलबी झाल्यावर शासनाकडूनही न्यायची अपेक्षा करण्यात अर्थ राहत नाही. एका स्तंभाकडून या अपेक्षा पूर्ण होतील, अशी धारणा होती त्या पत्रकारितेत घुसलेल्या अपप्रवृत्तीने लोकशाहीचे धिंडवडे उडवलेत. अखेरचं अस्त्र म्हणून लोकं माध्यमांकडे अपेक्षेने पाहत होती. पण काही अपवाद वगळता या माध्यमांची लेखणीही म्यान झालेली पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी आलंय. लोकशाहीची पावलोपावली टर उडवणार्या सत्तेच्या विरोधात तर माध्यमांनी अधिक जबाबदारीने आपली लेखणी चालवणं अपेक्षित असताना ज्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशनगर – प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला. त्या काळात संचालक मंडळांने आर्थिक व्यवहार करण्याकरता सह्यांचे अधिकार खासदार सुजय विखे पाटील यांना दिले. खासदार विखे पाटील हे गणेश कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का दिले गेले? गणेश कारखान्याचे जिल्हा बँक आणि सेंट्रल बँकेत नियमित अकाउंट असतानाही प्रवरा बँकेत नवीन खाते उघडून तिथूनच का व्यवहार करण्यात आला? गणेशच्या कारभारात जो सावळा गोंधळ झाला त्याची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटील घेणार का? असा सवाल गणेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली. येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक, पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते. दत्तगिरी महाराज म्हणाले, वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज ह्या फिरत्या नारळी म्हणजे महासप्ताचे आयोजन रविवारी (दि.१७ डिसेबर २०२३) केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे. यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथे शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) रात्री गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली आहे. गाईचा मृत्यू: गेल्या महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी तालुक्यात दमदार सुरुवात केली आहे. रात्री संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात गावातील आण्णासाहेब बाबुराव नेहे यांच्या गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली असून गोठ्यातील गव्हाच्या भुश्यानेही पेट घेतला होता. दुर्घटना टळली: या दुर्घटनेत सुदैवानं इतर फार मोठी जीवीत हानी झाली नसली तरी नेहे यांना यामुळे आपली गाय गमवावी लागले आहे. वरिष्ठांकडून पाहणी: ही माहिती आण्णासाहेब नेहे यांनी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळविली असता…
