Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – क्षणाक्षणाला पडणार्या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोशपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला. विजेता: मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जीकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा: राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात विनापरवाना गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. वास्तविक या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी गणेश मंडळांनी अशा प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या भेटीत समोर आले आहे. पोलीस ठाण्यात करा अर्ज: सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असून वेळोवेळी सूचना देऊन देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांनी अद्याप पावतो पोलीस ठाण्यातून गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधी अर्ज केलेला नाही. परवानगी घ्या: या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दुचाकी, शेती औजारांच्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी एकाच वेळी चौदा भंगार दुकान, गोडाऊनची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तक्रारी: संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, राजुर आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती औजारे, शेती पंप, केबल, बॅटरी चोरीचे गुन्हे सातत्याने वाढत असून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. 14 छापे: गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्याबाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे. चोरट्यांकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मनामनात दरवळणारी गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. गणेश आरतीचा यांना मिळाला मान: राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. प्रेक्षकांना…
दराडे कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषाचा मृत्यू महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी – संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अझमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली. १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (२१ सप्टेंबर) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काकस्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) याचादेखील ह्रदय विकाराने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधीतच घडली घटना: पिप्रींलौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी त्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य या कंपनीच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे होते. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा कविता संपत भोसले, सदस्या प्रमिला भोसले, प्रमोद शिंदे, रेवणनाथ वर्पे, मच्छिंद्र वर्पे, प्रवरेचे प्राचार्य जगदीश मुंतोडे, रोहिदास वाडेकर, ऋषीकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सावली सर्विसेसचे अधिकृत विक्रेते सत्यजित वाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. हिंदुस्तान फिड्स पशुखाद्य कंपनीतर्फे रविंद्र पवार, नितीन ननवरे, डॉ. केतन पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. रविंद्र पवार यांनी दुधाचे अन्नातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बहुजन उद्धारक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ३७० गड किल्ल्यांपैकी २९६ गड किल्यांवर केरळ येथील शिवप्रेमी पर्यटकाने सायकल परिक्रमा केल्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहक आणि पर्यटन प्रेमीमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. केरळ येथील एस. के. हमराज तथा शिवराज गायकवाड हे १ मे २०२२ रोजी केरळ येथुन सायकलवर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. उद्देश एकच फक्त शिव विचारांची प्रेरणा त्यांनी आतापर्यंत २९६ गड किल्ले सर केले आहेत. घनदाट जंगल-झाडी, कडे-कपारीतून वाट काढत ते किल्ल्यांवर पोहोचतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव यावेळी त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रवासात अनेक जण आस्थेवाईकपणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह सर्वच आरोपी अद्यापही बाहेरच असल्याने या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे. यांनी दिले निवेदन: महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी दूधगंगा खातेदार-ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने मोहन लांडगे, पोपट आगलावे, कैलास देशमुख, प्रभाकर रहाणे, सुनील सातपुते, मोरेश्वर जगताप, अनिल जोंधळे, चंद्रभान लांडगे, विकास सहाने, पुंजाहरी जोर्वेकर, शिवाजी कोल्हे, भारत सातपुते आदींनी त्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले.…
संगमनेर फेस्टिव्हलचा दिमाखदार शुभारंभ! उपक्रमातील सातत्य खूप मोठे: माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एखादा उपक्रम सातत्याने पंधरा वर्ष राबवणं आणि त्याद्वारे एकाहून एक सरस कार्यक्रमांचे आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने याही पुढे जावून समाजासाठी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी ‘संगमनेरचा राजा’ म्हणून संबोधल्या गेलेल्या श्रींच्या देखण्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करुन वेगळा पायंडाही घातला आहे. याशिवाय संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर शहर व तालुक्यात देदीप्यमान यश मिळवणार्या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा गौरव होणं ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या पंधराव्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज कौटुंबिक वादातून पत्नीने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून पतीने सासुरवाडीला जात पत्नीसह मेव्हणा आणि आजी सासूची निर्घून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सासू सासरा आणि मेहुणी यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीला नाशिक मधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. शिर्डीत घडले हत्याकांड: शिर्डीच्या सावळीविहीर गावात विलासनगरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजता हे हत्याकांड घडले. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला असून वर्षा सुरेश निकम (वय 24 वर्ष), रोहित चांगदेव गायकवाड (वय 25 वर्ष) व हिराबाई धृपद गायकवाड (वय…
