Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरविल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वॅार रूममधून हे कामकाज होणार: राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेली गावे, तालुके, जिल्हा, विभाग या सर्वांवर या दुष्काळ नियंत्रण वॅार रुमच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच या सर्वांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. या वॅार रुममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील. पाणीसाठ्याचे आरक्षण…
जनतेला दिलासा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यांच्या उपस्थितीत झाली बैठक: सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – साखर कारखानदारीत सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने स्वच्छ व गुणवत्तेच्या पेट्रोलबरोबर आता नव्याने गरजेचा असलेल्या पर्यावरण पूरक सीएनजी पंप कार्यान्वित केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या सीएनजी पंपाचा शुभारंभ करण्यात आला. यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे हा सीएनजी पंप सुरू करण्यात आला असून यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, बीपीसीचे गोविंद जागीर, संचालक गणपतराव सांगळे, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, विनोद हासे, माणिकराव यादव, ॲड. दादासाहेब हजारे, तानाजी आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरातील बहुचर्चित ठरलेल्या आणि सहकारी चळवळीवर आधारित असलेल्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या 81 कोटीच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग: दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा प्राथमिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला होता. मात्र गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता अपहाराची रक्कम मोठी असल्याने, गुन्हा गुंतागुंतीचा क्लिष्ट व किचकट स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची संख्या देखील मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा शहर पोलिसांकडून काढून अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास आता आर्थिक गुन्हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पहारीने मारहाण करीत तिचा खून करणाऱ्या आणि तिला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या व्यक्तीला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीला झाली शिक्षा: बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा. लक्ष्मी नगर, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी खून आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्य वधाच्या तसेच घातक हत्याराने दुखापत करण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.…
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली. “नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले. अरे भाऊ, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन इंदोरी फाटा (अकोले) येथे लिकेज झाली आहे. लिकेज झालेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सोमवारी सकाळी संगमनेर शहर व उपनगरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. कधी होणार नियमित पाणीपुरवठा: पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवाहन: तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निळवंडे धरणात पाण्याची नवीन आवक होत असून पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून, गाळून थंड करून…
शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत हल्लाबोल “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं महाराष्ट्र संवाद न्यूज हिंगोली – भाजपमध्ये सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते आता फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले असून शासन आपल्या दारी थापा मारते लय भारी अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढविला. हिंगोलीत निर्धार सभा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभा झाली. सभेत ठाकरेंनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी…
आम्ही एक झटका दिला आणि त्यांना ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणलं… काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले महाराष्ट्र संवाद न्यूज परभणी – “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो.” ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगत रविवारी विरोधकांवर निशाणा साधला. शासन आपल्या दारी: रविवारी परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज उन्हं उतरायला लागली होती. मी आणि माझी मैत्रीण घरी परतत होते. मी रोज तिला वाटेत तिच्या बस स्टाॅपवर सोडते. आणि मग पुढे जाते. बसस्टाॅपच्या आधी गाडी थांबवून आम्ही जरा वेळ शिळोप्याच्या गप्पा मारतो, आणि मग आपापल्या दिशेने जातो. गेले काही दिवस त्या स्टाॅपच्या आधाराने एक कुटूंब रहायला आलंय. भिकारीच असावेत. तिथेच फुटपाथवर चूल मांडलीय. नवरा, बायको, दोन तीन लहान मुलं. एक कुत्र्याचं पिल्लू. कधीच कसली भांडाभांडी न करता अगदी मजेत रहाताना दिसतात ते. रोज बघून बघून मी आता त्यांना ओळखायला लागले. त्यातलं सगळ्यात छोटं मूल एकदमच गोड हालचाली करत फिरत असतं. असेल जेमतेम दोन अडीच वर्षाचं. बसस्टाॅपच्या…
