Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अजितदादांचे मंत्री आणि शरद पवारांच्या भेटीत आज नेमकी काय चर्चा झाली? याबाबत जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, हे सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. ते अनपेक्षितपणे आले. पवार साहेबांनी त्यांचे सर्व म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले आहे. अजित दादांचा नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या या गटाचे म्हणणे आहे की, आपण एकसंध राहू. चूक झाली आहे. आपणच यातून काय तो मार्ग काढावा. यावर पवार साहेबांनी त्यांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे पाटील म्हणाले. राज्य विधीमंडळ अधिवेशन उद्यापासून सुरू होत असतानाच राज्यात काही महत्त्वाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोल्हार घोटी राज्यमार्गावर निर्जन ठिकाणी वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची पाच जणांची टोळी उघडकीस आणण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना पकडले असून टोळीचा मोहरक्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तृतीय पंथीयांचा वेश परिधान करत राज्य मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी तीन दिवसांपूर्वीच पकडण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पोलिसांना लागोपाठ दुसरे यश मिळाले आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता असं वाटतंय की, राष्ट्रवादीमुळेच हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एकच पक्ष आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये येणं बाकी आहे तोही आला तर काय हरकत आहे असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित करत अजित दादा मुख्यमंत्री होतील याला मी होही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही, सध्या अंदाजाच्या पलीकडे राज्याच राजकारण गेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी देखील भाजप शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन काही बोलले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्या महाराष्ट्रात त्यांचा निषेध केला. राज्याच्या भल्याची ज्यांना अक्कल नाही ते ही यानिमित्त बाहेर आले. स्पष्ट बोललं की माणसाला झोंबतं. जे स्पष्ट बोलतात तेच दिसतात. महाराष्ट्रात असं उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नसते. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत थेट नागपूरमध्ये जाऊन दाखवली आणि कोण गजहब झाला. आपल्या नेत्याची कोणी निंदा नालस्ती केली तर त्याचा निषेध करायचा अधिकार त्याच्या समर्थकांना असायलाच हवा. पण ज्याच्या समर्थनार्थ आपण हे करतो, तो त्या समर्थनाच्या पात्रतेचा आहे काय, याची जाणीव समर्थकांनी ठेवली पाहिजे. जो कलंकित शब्द उध्दव…
महाराष्ट्र संवाद न्यूज उस्मानाबाद – पाझर तलाव आणि साठवण तलावाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे 26,56,017/- व 4,31,798/- रुपयांचे दोन धनादेश उस्मानाबादच्या प्रांताधिकारी कार्यालयातून काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा खाजगी उस्मानाबाद एसीबीने रंगेहात पकडले. पकडलेल्या लाचखोरात एका संपादकाचा समावेश आहे. अनिरुद्ध अंबऋषी कावळे (वय 52 वर्ष, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) व बाबासाहेब हरिश्चंद्र अंधारे (वय 42 वर्ष, संपादक दैनिक मराठवाडा योद्धा, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी, तक्रारदादाच्या पत्नीच्या नावे असलेले शेत जमीन शासनाने पाझर तलाव आणि साठवण तलावासाठी संपादित केली आहे. संपादित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला न्यायालयाने दिलेल्या…
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिलांचे सबलीकरण व त्यांचे आरोग्य याचबरोबर समृद्ध कुटुंब व्यवस्थेकरता जयहिंद महिला मंचच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून संगमनेर-शिर्डी या पायी वृक्षदिंडीत मार्गातील 9 गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. संगमनेर ते शिर्डी या पायी दिंडीत समनापुर, वडगाव पान, निळवंडे, कवठे कमलेश्वर, कासारे, काकडी, कोऱ्हाळे, नांदुरखी, शिर्डी, या गावांमध्ये दंडकारण्य अभियानांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. या अभियानाचे हे 17 वे वर्षे आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्य सरकारने शुक्रवारी गेल्या तीन वर्षांपासूनचे क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान या पुरस्काराद्वारे राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेरची कन्या सायकलपटू प्रणिता सोमण हिच्यासह राज्यातील 116 जणांचा समावेश आहे. सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षातील एकत्रित पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केली. प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला सायकलिंग साठी सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रणिता ही संगमनेर मधील वैद्यकीय व्यावसायिक प्रफुल्ल सोमण यांची कन्या आहे. महाजन म्हणाले, राज्यात क्रीडा…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – आंबी (ता. मावळ) येथे एका बंद खोलीत शुक्रवारी (ता.१४) रात्रीच्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महाजनी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शपथविधीच्या तब्बल बारा दिवसानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अखेर राज्याच्या अर्थ खात्याच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या आहे. शिवाय त्यांच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहे. अजित पवार 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर खाते वाटपाचा घोळ सुरूच होता. त्यातच मुख्यमंत्री शिंदे गटाकडून पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध दर्शविला जात होता. परिणामी पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खाते सोपविले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेरीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली दरबारात झालेल्या…
शहर पोलिसांच्या नव्या टीमची लक्षवेधी कामगिरी परजिल्ह्यातील टोळीकडून दरोड्याच्या साहित्यासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केलेल्या खांदेपालटानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांची टोळी पकडण्यास शहर पोलिसांना यश आले. शहर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर…
