Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको असं असताना देखील संगमनेर येथील पुनम तुषार ओहरा यांनी आपले केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले. कर्तव्यम फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करण्यात आला आहे. ओहरा या कर्तव्यम फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष तुषार ओहरा यांच्या पत्नी आहेत. त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देत आहे. त्यांना सामजिक कार्याची आवड आहे. त्या सोशल मिडीयावर सोशल ॲक्टीव्हीटीचे व्हिडीओ बघत असताना त्यांना एक व्हिडीओ दिसला की, ज्यात एक मुलगी आपले संपुर्ण केस हे कॅन्सर पिडीतासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यामध्ये जमिनीचा नकाशा आणि अहवाल सादर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राहाता भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपालास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. विकास सूर्यभान दुशिंग (वय ५१ वर्ष, रा. शारदानगर, कोपरगाव) असे या लाचखोर अभिलेखपालाचे नाव आहे. एसीबीच्या अहमदनगर युनिटने सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई केली. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर येथील तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी लाचखोर अधिकाऱ्यास पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. यात २५ हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेखचा वर्ग ३ चा अधिकारी विकास दुशिंग अलगत जाळ्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत मंत्रीपदी आरुढ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचे कारण स्पष्ट करताना “आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात ‘शिंदे-फडणवीस-पवार’ सरकार सत्तेत आल्यानंतर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आज मुंबईत बैठका पार पडल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थकांच्या मेळाव्यामध्ये मंत्री भुजबळ बोलत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य पाठोपाठ आता मुंबईत आणखी एका तरुणीची निर्घून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुंबई महिलांसाठी असुरक्षित बनल्याचे समोर येत आहे. मुंबईच्या वरळी सी फेसवर एका गोणीमध्ये हातपाय-तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अशा पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या तरुणीचे वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान वरळी पोलिसांनी अज्ञाता विरोधात या युवतीच्या हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या आधी श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू गार्डन जवळील औषध दुकानामध्ये औषध घेण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने औषध विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत जोडीदारासह पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत या दोघा भामट्यांना पाठलाग करत पकडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या संदर्भात औषध विक्रेत्या महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा दागिने चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतदेहांची ओळख न पटल्याने सामूहिक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे राजभवनात शपथविधीचे नाट्य सुरू होते. महाराष्ट्र अपघाताच्या घटनेने हळहळत असताना राज्याच्या राजकारणात सत्तेच्या सारीपाटाचा आनंदी सोहळा रंगला होता. या पार्श्वभूमीवर अकोला येथील ॲड. अनंत खेळकर यांची यावर भाष्य करणारी कविता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी सोशल मीडियाच्या सौजन्याने आम्ही ती आपणासाठी देत आहोत. ——————– तिकडे समृध्दी महामार्गावर झाले देहाचे कोळसे ईकडे मात्र राजकारण घेत होते ‘वळसे’ ओळख पटली नाही म्हणून सामुहिक अंत्यविधी तिकडे त्यांची चिता जळाली ईकडे ह्यांचा ‘शपथविधी’ …

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचे स्वागत भाजपा मराठा समाजाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केले.  मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड २०० च्या आता मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.  ही योजना २०२३-२४…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवार यांच्यासह आठ नव्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाल मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागांचे प्रधान सचिव वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजित पवारांसह नव्या आठ मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय संक्षिप्त स्वरूपात :- * राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन (ऊर्जा विभाग) * मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रांताधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी ३० ऑक्टोंबर २०२२ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या एक वर्षाच्या कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. गडाख हा हद्दपारीच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्येच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावर निमोण गावच्या शिवारात निमोण –  पारेगाव गडाख फाट्यावर पोलिसांना आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख हा आढळून आला. प्रांत अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत आढळून आल्याने पोलिसांनी त्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्गावरील आणि नो टाईम झोन मधील ‘पंचवटी’ बंगल्यावर सोमवारी सकाळी ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ खळबळ माजली होती. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी पंतप्रधानांचे निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान या ड्रोनबाबत अद्याप पोलिसांना तपास लागू शकला नाही. ड्रोन नेमकं कोणाचं होतं, याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहे. तसेच ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न देखील अद्याप…

Read More