Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनुदानित – विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी शिक्षण संस्थांकडून अवास्तव फी आकारणी केली जात आहे. या फी मध्ये कपात करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्यावतीने उपशहरप्रमुख फैसल सय्यद व युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळा महाविद्यालयांना निवेदन देत केली आहे. नॅशनल इंग्लिश मीडियमसह शहरातील अन्य शैक्षणिक संस्थांना हे निवेदन देण्यात आले असल्याचे सय्यद यांच्यासह युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना समन्वयक अक्षय बिल्लाडे यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यात शासनाचं अनुदान स्कॉलरशिप व कॅटेगिरी फार्म भरून देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, जवळे कडलग आणि पेमगिरी येथे पाण्यात पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी बराच काळ उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथील अनुकूल सत्यवान मेंढे (वय २१ वर्षे) या तरुणांचा निळवंडेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मेंढे याला उपचारासाठी रात्री संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर विविध शासकीय विभाग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, संतोष हासे,ॲड. मधुकर गुंजाळ, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी…
जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल, जनता सर्व पाहते आहे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी लावणारे आहे. घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेकरता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला…. राज ठाकरे झाले उद्विग्न उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवा धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत विरोधी पक्ष नेते अजित पवार आज राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर यावेळी त्यांनी भर दुपारी बंडाचा झेंडा फडकविला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आपली एकजूट कायम असल्याचे वारंवार सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा प्रयोग केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे वारंवार समोर येत होते. अखेर पहाटेच्या शपथविधीनंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी…
रविवार विशेष | प्रवीण पूरो राज्य भाजपचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेली मुलाखत पाहण्याची संधी मिळाली. एका होयब्याने दुसर्या सांगकाम्याची घेतलेली मुलाखत म्हणून या मुलाखतीकडे पहावं लागेल. विरोधकांना सातत्याने दोष देणार्या संपादकाच्या या मुलाखतीला कोणीही गंभीरपणे घ्यावं अशी परिस्थिती नसली तरी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनैतिकता आल्याचं मान्य केलं आणि या अनैतिकतेचा आपण वेळोवेळी आसरा घेतल्याचं कबुल केलं. आपण राजकारणात अनैतिक वागलो, हे इतर वेळा शुचिर्भूततेचा आव आणणार्या फडणवीसांनी स्वत:च कबुल केलं हे बरं झालं. अनैतिक राजकारणी असा ठपका त्यांच्यावर इतर कोणी लावला असता तर त्यांच्या हुजर्यांनी त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी आपल्याकडील कर्जफेडीची परंपरा कायम राखली असून अहमदनगर जिल्हा बँकेत 30 जून 2023 अखेर 99.70% इतकी उच्चांकी वसुली देत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक राखला असल्याची माहिती उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व मेंबर पातळीवर चांगली वसुली झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीच्या व आदर्श तत्त्वांवर संगमनेरचा सहकार कार्यरत असून कर्ज परतफेडची परंपरा कायम राखताना यावर्षी 99.70% इतकी उच्चांकी वसुली दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी, १२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. जालिंदर भोर, तहसीलदार सतिष थेटे, गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, अमृतसागर दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा – महत्त्वकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला. रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झालेल्या बसणे अचानक पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. चालक, वाहकासह ८ प्रवासी खिडक्या तोडून सुखरूप बाहेर पडले. उर्वरित २५ प्रवाशांचा मात्र होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.…
