Author: अनंत पांगारकर

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) येत्या पंधरा दिवसात अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहरातील ज्योतिष व पौरोहित्य क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून योगदान देणाऱ्या प्रमोद बेल्हेकर (गुरु) यांना बेंगलोरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंट’च्यावतीने ज्योतिष व रत्नशास्त्रातील योगदानासाठी ‘नॅशनल ॲस्ट्रोरत्न अवार्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंटचे चेअरमन व भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य सनदी अधिकारी डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते तसेच हिंदी व दक्षिणात्य चित्रपट निर्माते भोलाराम मालवीय यांच्या उपस्थितीत ए. डी. ए. रंगमंदिर, बेंगलुरू येथे रविवारी (ता. ६ मे) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रतिवर्षी विविध क्षेत्रात योगदान, सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान ह्या संस्थेमार्फत केला जातो. बेल्हेकर गुरु म्हणून परिचित असणाऱ्या प्रमोद…

Read More

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचीदेखील बदली झाले आहे. त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळाले नसून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश हिंगे यांचे नियुक्ती झाली आहे. मंगरुळे गेल्या चार वर्षापासून संगमनेर मध्ये कार्यरत होते गत विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर मध्ये कार्यरत असलेल्या मंगरूळे यांचा येथील कार्यकाळ लौकिकास्पद ठरला आहे. विविध निवडणुकांसह कोरोना काळात त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले होते. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित थोरबोले यांना दापोलीचे उपविभागीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. श्रीमती ज्योती कावरे यांची…

Read More

पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुण्यातील वाघोली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भीषण आगीमध्ये तिघांचाही कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. वाघोलीच्या उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री लग्नाच्या सजावटीचे सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री पावणे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती…

Read More

पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलेसोबत अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेल्या निलेश अष्टेकर यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये नेमणुकीस होते. सध्या ते गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलातील वड्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मूळची धुळ्याची असलेली ही 31 वर्षीय महिला सध्या ठाण्यामध्ये कळवा येथे राहावयास आहे. विधवा असल्याने धुण्याभांड्याची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी या महिलेच्या फेसबुक अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2023 रोजी…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वखर्चाने ग्राहकांच्या इच्छित स्थळी वाळू पोहोच केली जाणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायरपर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले आहे. राज्य शासनाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे या धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात वाळू उत्खनन वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या निविदा मागविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता वाहतूकदारांना नोंदणी करावी लागणार आहे. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी यातील रॅकेट उघड करत चौघा जणांना ताब्यात घेतलं असून चार जणांची सुटका केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने लोकांना डांबून ठेवत, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून वेठबिगारी तसेच भीक मागून घेतली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिलाजी भोसले, अमोल भोसले, अशोक भोसले आणि गंजा काळे अशी बेलवंडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघा आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळसट लोकांना महाराष्ट्रामध्ये पाच-पाच हजार रुपयात विकले गेले असल्याचे समोर आले असून आरोपींनी मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी…

Read More

शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी केली. लोणी बु. येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब…

Read More