Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रतिक राजेंद्र रातडीया याची जगप्रसिद्ध अमेरीकेतील नासा या संस्थेत संशोधक म्हणून निवड झाली आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (NASA) संशोधक म्हणून नुकतीचं प्रतिक रातडीया यांची निवड झाली असल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थानी दिली आहे. प्रतिक रातडीया पुढील तीन महिन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (artificial intelligence) वापर करून नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती शोधण्याच्या पद्धती विकसित करण्यावर संशोधन करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये विद्यार्थी संशोधक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमी संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेले ‘रामायण’ महानाट्य शिर्डीच्‍या महापशुधन एक्सपोमध्‍ये सर्वांचीच दाद मिळवून गेले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांच्‍या ‘जय श्रीराम’ या घोषणेच्‍या मिळालेल्‍या प्रतिसादामुळे सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे वातावरण पुर्णपणे राममय होऊन गेले. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने पशुसवंर्धन विभागाच्‍यावतीने ३ दिवसांचे भव्‍य महाप्रदर्शन शिर्डीमध्ये आयोजित करण्‍यात आले आहे. देशासह राज्‍यातील शेतकरी, पशुपालक आणि शेतीपुरक व्‍यवसाय करणारे तरुण शेतकरी या महाप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. राज्‍यातील विविध भागातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी येत आहेत. येणाऱ्या प्रत्‍येकासाठी श्रीक्षेत्र शिर्डी हे साईबाबांचे समाधी स्‍थळ मुख्‍य आकर्षण आहेच परंतू या प्रदर्शनातही सांस्‍कृतीक कार्यक्रमांची पर्वणी सहभागी शेतकऱ्यांना मिळावी म्‍हणून खासदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करत कार्यालयात कोंडून घेतले नंतर पुन्हा येत ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या केबिनचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अरुण गोविंद जेजुरकर (वय ५० वर्षे, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल संजय गायकवाड याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांच्याकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी प्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा…

Read More

शिर्डी: शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्‍थापन करण्‍यात आल्‍याने गोसंवर्धना बरोबरच दूग्‍ध व्‍यवसायाला संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी राज्‍य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतीपुरक व्‍यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्‍याचे सरकारचे उदिष्‍ठ असून, लम्पि संकटातही पशुधन वाचविण्‍यासाठी देशात पशुपालकांना मदत करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दिल्ली: देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना समोर आली आहे. सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. देशभरातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती.  त्यांना कोर्टाने जामीनही मंजूर केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. संसदेमध्ये अदानी प्रकरणावरून आरोप करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप अतिशय आक्रमक झाल्याचे दिसत आहे. परदेशातील एका वक्तव्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून भाजपचे खासदार आक्रमक झाल्याचे दिसून येत होते. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर पोलीस पथकाने मदिना नगर मधील एका वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सातशे किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा छापा पडत असताना आरोपी नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी ठरला. गुढीपाडव्याच्या दिवशीच कत्तलीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे यातून समोर आले. संगमनेरमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याला येथील कसायांनी केराची टोपली दाखविली असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून येथील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सणासुदीला देखील नियमांचे उल्लंघन करत गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याने या व्यवसायाला नेमके आशीर्वाद कोणाचे? येत्या काही दिवसात राम नवमी आणि हनुमान जयंती सारखे सण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: ऐतिहासिक महत्त्व आणि पार्श्वभूमी असलेल्या संगमनेरच्या हनुमान विजय रथाचे नूतनीकरण अखेरीस पूर्ण झाले आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिनी म्हणजेच गुढीपाडव्याला या रथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. मारुतीरायाच्या चरणी हा रथ उत्सव समितीने एका कार्यक्रमात अर्पण केला असून हनुमान जयंतीदिनी रथाची मिरवणूक निघणार आहे. संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिरापासून निघणाऱ्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. धार्मिक तणावाचे कारण पुढे करत तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९२७ ते १९२९ दरम्यान रथाच्या मिरवणुकीवर बंदी घातली होती. १९२९ मध्ये ब्रिटिशांचा हा बंदी आदेश मोडत महिला रणरागिनींनी रथाची मिरवणूक काढली होती. महिला शक्ती समोर ब्रिटिश अधिकाऱ्यांना देखील त्यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या विधानसभेत आज मोठा गोंधळ बघावयास मिळाला. आशिष शेलार यांनी तर थेट बाळासाहेब थोरात यांना आव्हान आव्हान दिल्याचे दिसून आले. खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी गुरुवारी सभागृहामध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) लावून धरली. या मागणीवरून सभागृहात बराच काळ गोंधळ देखील बघावयास मिळाला. भाजप आमदार आशिष शेलार आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा यात समावेश होता. आशिष शेलार म्हणाले, भारताबाहेर भारताचा अपमान केल्याबद्दल तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागायला हवी. काँग्रेस नेत्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुरत: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या खासदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. खासदार गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा करताना न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्यावेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यावर आज निकाल देताना गांधी यांना दोषी ठरवल आहे. गांधी यांना दोषी ठरविल्यानंतर अवघ्या वीस…

Read More