Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई: सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी झालेल्या गुढीपाडव्याला आपला ८ महिने २२ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. हा कालावधी पूर्ण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जुन्या सहकारी मित्राचा विक्रम मोडला असून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे शिवसेनेचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी मागे टाकले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फुट पाडत चाळीस आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करत नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळविले. मुख्यमंत्रीपद मिळविणारे शिवसेनेचे ते चौथे मुख्यमंत्री ठरले. यापूर्वी मनोहर जोशी, नारायण राणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, शिर्डी येथील फुलविक्रीबाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील दहा दिवसांत संस्थांनमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. विखे-पाटील म्हणाले, संस्थान दर्शन रांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अज्ञात चोरट्याने हिवरगाव पावसा येथील खंडोबा मंदिरातील लोखंडी दानपेटी फोडत त्यातील सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात मोठ्याभाऊ भाऊराव बढे (वय ५७ वर्ष, धंदा शेती, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्याने खंडोबा देवस्थानच्या मंदिरातील लोखंडी कायमस्वरूपी दानपेटी फोडून त्यातून सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक: दोन दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरात झालेल्या ध्रुवांशी भूषण रोकडे या तीन महिन्याच्या मुलीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मातेनेच या चिमुकलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी चोवीस तासाच्या आतच या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. सासरच्या होणाऱ्या जाताला कंटाळून मातेनेच तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून तिची हत्या केली. या थरकाप उडविणाऱ्या घटनेमुळे नाशिक शहर हादरले आहे. युक्ता रोकडे असे निर्दयी आरोपी मातेचे नाव आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली होती. सातपूर मधील एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी पोस्टर लावल्याच्या कारणावरून पोलिसांनी शंभर एफआयआर नोंदविले आहेत तर सहा जणांना आतापर्यंत अटक केली. पंतप्रधानांविरोधातील पोस्टरवरून राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि फॉरेस्टेशन ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत सर्व गुन्हे दाखल करण्यात आले असून या आशयाचे पोस्टरही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या काही भागात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे आशय लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये छापखान्याचा तपशील नव्हता. पण आयपी स्टेट पोलीस स्टेशनच्या एका कॉन्स्टेबलने पप्पू मेहता…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत एकाच दिवशी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी, ७५ नाट्य प्रयोग सादर करीत आहेत. यातील एक नाट्यप्रयोग संगमनेर महाविद्यालयात गुरुवारी (२३ मार्च) होत आहे. या अनोख्या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय, सांस्कृतिक विभाग आणि आर्टिस्टिक हयूमन्स संयुक्त विद्यमाने गुरुवारी एकाच वेळी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नाटकात अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर महाविद्यालयाची (स्वायत्त) निवड झाली आहे. संगमनेर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी सदर नाटकात सहभाग घेतला आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्याचा एक दिवस, भारताच्या प्रवासाची कहाणी आणि अमृत महोत्सवाची भावना…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आता ट्रेलर नाही तर गुढीपाडव्याला थेट चित्रपटच दाखविणार, असे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यात दिले होते. त्यामुळे आज, बुधवारी होणाऱ्या गुढीपाढव्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणावर तोफ डागणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर राज ठाकरे यांचा गुढी पाडवा मेळावा होत असतो. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच या मेळ्याव्याचीही जय्यत तयारी केली जाते. मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक पदाधिकारी या मेळाव्याला हजेरी लावत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मेळावा महत्त्वाचा असतो. बुधवारी संध्याकाळी होत असलेल्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणावर टीका करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवरील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन 2022- 23 या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. कारखान्यातील चालू हंगामातील ऊस गाळपाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, मागील वर्षी व यावर्षी कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेर पाऊस चांगला झाल्याने कारखान्याने मागील वर्षाच्या हंगामात 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप केले होते. तर यावर्षी सन 2022- 23 या हंगामात आतापर्यंत 10 लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप केले आहे. कारखान्याने कार्यक्षमता व अचूकता…
संगमनेर महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ आता दि नाशिक मर्चटस् को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संगमनेर शाखेतील ४ कोटी २० लाखाचा सोनेतारण घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे याही घोटाळ्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील गोल्ड व्हॅल्यूअरसह बँकेचा व्यवस्थापकच सामील असल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या तक्रारीवरुन समोर आले आहे. आणखीही काही बँकांमधील सोनेतारण घोटाळे समोर येण्याची चिन्हे असल्याने नागरिकांचा बँकावरील विश्वास उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नामको बँकेतील सोनेतारण घोटाळ्यामध्ये तब्बल १३६ खातेदारांनी बनावट सोने बँकेत ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. बँकेच्या व्यवस्थापनाला अंधारात ठेवत हा प्रकार घडल्याने बँकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यात काही कर्जदार आणि गोल्ड व्हॅल्युअरला जामिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: शे-दोनशे, हजार-दोन हजार नव्हे तर तब्बल एक लाखाची लाच घेताना नगरच्या सहकारी संस्थेच्या विशेष लेखापरीक्षकासह खाजगी लेखापरीक्षक अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याच्या सहकार विभागातील मोठी लाचखोरी समोर आली आहे. किसन दिंगबर सागर, वय ५५, विशेष लेखापरीक्षकाचे व तय्यब वजीर पठाण वय ४८, असे लाखाच्या पटीत लाचखोरी करणाऱ्या खाजगी लेखा परीक्षकाचे नाव आहे. अँटी करप्शनच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक तथा सापळा अधिकारी हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक…
