Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / संगमनेर : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये बावीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकोणतीस उमेदवारांनी चौरेचाळीस अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडीबा गायकवाड, सुनील शिवाजी उदमले, इंजि. शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे या सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त रमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा ‘राष्ट्रीय युवा दिन’ यंदा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी गाजवला. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविणार्या महाराष्ट्र संघाने योगासनांचे रोमहर्षक सादरीकरण करीत पंतप्रधानांसह उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली. या सोबत ध्रुवच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ओडिसी नृत्यप्रकाराने या कार्यक्रमाची रंगत वाढली. यावर्षीच्या युवा दिवस कार्यक्रमात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमानही पटकाविला. भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस सोबत दगा फाटका केला आहे, त्यामुळे सत्यजित तांबेना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा करत भाजप दुसऱ्याचे घर फोडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामुळे सत्यजित तांबे आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला दिली होती. काँग्रेसने या जागेवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी स्वतः उमेदवारी दाखल न करता मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. या सततच्या विकास कामातून विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा, रस्ते, सिमेंट बंधारे, शाळा, दवाखाने यांसह विविध वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. याचबरोबर उत्तर नगरच्या जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण करून कालव्यांच्या कामाला गती…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी गुरुवारी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. गुरुवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे, संजय एकनाथ माळी, राजेंद्र दौलत निकम यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षाकडून, भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. रतन कचरु बनसोडे यांनी वंचित बहुजन…
नाशिक पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार असलेले आ. डॉ. तांबेंची माघार; सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे याच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित तांबे आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतील. विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. तर सत्यजित तांबे यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढावे यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार सातत्याने प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्या आदर्श विचारावर सहकाराच्या माध्यमातून संगमनेर समृद्ध झाले आहे. येथील सहकार देशासाठी दिशादर्शकाचे काम करत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाऊसाहेब थोरात या नावाने तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तांबे म्हणाले, सहकारात अलौकिक…
जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी नेते, सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील. आम्ही सर्वजण त्यांना ‘दादा’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत असलेल्या रतनगडावरुन उगम पावणार्या ‘अमृतवाहिनी’ प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे आमचे गाव. या गावात नदीच्या घाटावर एकमुखी दत्ताचे सुंदर पुरातन मंदिर आहे. जोर्वे गावाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. चालुक्य आणि यादव यांच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेजांत जोर्वे गावाचा ‘जयुरेव ग्राम’ असा उल्लेख आढळता.…
नाशिक पदवीधरसाठी आत्तापर्यंत दहा उमेदवारी अर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी अर्ज भरणार
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : विधान परिषदेच्या नासिक पदवीधर मतदार संघासाठी बुधवार पर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची उमेदवारी अर्ज यांची संख्या तेरा झाली. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर त्यांच्या विरोधातील भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पदवीधर मतदार संघासाठी नाशिक वगळता उर्वरित मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र नाशिकमध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल असे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी शुभांगी भास्कर पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास तर सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व डॉ. राजीव शिंदे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त पुरस्काराविषयी माहिती देतांना आ. डॉ. तांबे व राजीव शिंदे म्हणाले, दरवर्षी कृषी , शिक्षण, साहित्य, संशोधन,…
