Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या तीन दिवसापासून शहर व परिसरात सातत्याने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळत आहेत. शुक्रवारी सकाळीही शहरानजीकच्या संगमनेर-सुकेवाडी रस्त्यावरील नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय वर्तविला जात असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. सुकेवाडीकडे जाणार्या पुनर्वसन वसाहतीच्या काही अंतरावरील नाटकीनाल्यात एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी संगमनेर पालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणला आहे. अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने सर्वप्रथम त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान नाल्यात आढळलेल्या शरीरावर मारहाणी सदृश्य जखमा आढळून आल्याने या…
महाराष्ट्र संवाद न्यूज एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी बस तीन चार वाहनांवर आदळल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नासिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे येथील टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आजाराची ही एसटी बस असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने मदत पथके पोहोचले असून मदत कार्य सुरू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळील शिंदे पळसे टोल नाक्यावर कारचालक…
महाराष्ट्र संवाद न्यूज मोठ्या शहरातील वेश्याव्यवसायाचे लोन संगमनेरच्या ग्रामीण भागात पोहोचले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन पीडित मुलींची सुटका केली. ग्रामीण भागात पोलिसांनी केलेल्या कारवांमुळे खळबळ उडाली आहे. लॉजेससह अन्य काही ठिकाणी चालणारे अनैतिक धंदे सर्वश्रुत असले तरी ग्रामीण भागातही आता अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले. नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीराम पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानंतर मिटके यांनी आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले होते. गुरुवारी पहाटेच्या वेळी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी बनावट ग्राहकाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज उज्वल यशाची परंपरा असलेल्या बाल शिक्षण मंडळाच्या दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचा बायोडिग्रेडेबल पॉट हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून निवडला गेलेला हा एकमेव प्रकल्प असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य कारभारी वाकचौरे यांनी दिली. राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे सादरीकरण अहमदाबादच्या सायन्स सेंटरमध्ये 27 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या हस्ते केले जाते. देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. याशिवाय भारतातील प्रत्येक राज्यातून विद्यार्थ्यांचा देखील यात सहभाग असतो. रोपवाटिकेमधील रोपांसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला त्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचते, यावर उपाययोजना म्हणून दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नववी इयत्तेमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सभागृहात ही बिनविरोध निवड झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्यासह नूतन संचालक, राज्यातील सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम…
महाराष्ट्र संवाद न्यूज अवैध गौण खनीज उत्खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्यात कारवाई सुरु आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्यक्ति आणि पक्षाविरोधात नाही. सरकारने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. अवैध गौण खनिज आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात सरकारने भूमिका घेतली आहे. त्यामुळे अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्खननावर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा देत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्हावी ही सामान्य माणसाचीच इच्छा होती. अवैध गौण…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२१ चे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात संगमनेर येथील नाट्य लेखक डॉ. सोमनाथ मुटकूळे यांना बाल वाड्मय नाटक व एकांकिका क्षेत्रासाठीचा भा. रा. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाने २०२१ चे साहित्य व वाडंमयीन प्रकारातले वेगवेगळ्या विषयासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत. डॉ. मुटकुळे यांनी संत तुकारामांच्या जीवन चरित्र व तत्त्वज्ञानाची आधुनिक परिभाषित केलेली मांडणी खेळ मांडलेला या नाटकाच्या द्वारे रसिकांसमोर आणली आहे. सनय प्रकाशन नारायणगाव यांच्या वतीने या पुस्तकाचे मागील वर्षी प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाला ५० हजार रुपये रोख सन्मानचिन्ह देऊन राज्य सरकारच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. मात्र नगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याही पुढे जात अकरावीमध्ये शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण, स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. एक वर्षाआधी, ते पण एका दिवसातच हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का बसला. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती त्यांच्या लोकाभिमुख व जलद कामकाजामुळे राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. सेवा पंधरवड्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करून समिती राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन भाषणात जिल्हा समितीच्या कामकाजाचे कौतूक केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ची राज्यात प्रथम…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या तपासणी नाक्यावर पालघरच्या तलासरी पोलिसांनी मेड इन युएसए असा शिक्का असलेले परदेशी मार्क असलेले पिस्टल आणि काडतुसे घेऊन फिरणाऱ्या संगमनेर मधील तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी पिकअप जीप, पिस्टल आणि काडतुसे असा आठ लाख वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इरफान युनुस शेख (वय- २५ वर्षे, धंदा-व्यापार, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), मुसा हारुण शेख (वय- २८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), समित लाजरस खरात (वय ३० वर्षे, व्यवसाय चालक, रा. कुरण रोड, महादेव वस्ती ता. संगमनेर जि. अहमदनगर) अशी पकडलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज, अकोले अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील रहिवासी रोहिदास गवराम पांडे यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना पांडे यांनी काढलेल्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकेकर यांच्या हस्ते पांडे यांच्या पत्नी निर्मला पांडे यांना प्रदान करण्यात आला. रोहिदास पांडे यांनी कुंभेफळ (ता. अकोले) येथील पोस्टमध्ये ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाची विमा पॉलिसी घेतली होती. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. या विमा पॉलिसीचा लाभ मिळण्यासाठी पांडे यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे टपाल विभागाकडे दाखल केली होती. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांचा दावा मंजूर करण्यात आला. नुकताच पांडे यांच्या…
