Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी तीन सहकारी नगरसेविकांसह बिनशर्त शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. अशा आशयाचे पत्र नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करतय असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्राद्वारे लक्ष करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मागील दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. नुकताच सन २०२१ -२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे. ज्येष्ठ मुक्त पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षक, वेगवेगळ्या आस्थापनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना हा पदविका अभ्यासक्रम उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम लेखन कौशल्य, दूरचित्रवाणीवरील विविध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच ट्विटरद्वारे केली आहे. जितेंद्र आव्हाड या घोषणेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४… मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे… लोकशाहीची हत्या… उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. आव्हाड यांनी नुकतच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे. नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. महा विकास आघाडी सरकारच्या काळातील चुकांमुळे राज्यात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उद्योजकांशी काहीही देणे-घेणे नव्हते. शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळणारे ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांचे आमदार देखील त्यांना सोडून गेले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील उद्योग बाहेर का जाणार नाही असा प्रश्न उपस्थित केला. राज्यात गुंतवणूक व्हायचे असेल तर उद्योजकांचे चर्चा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळविले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता ठाकरेंची करोडची संपत्ती कशी असा सवाल करत महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ते अस्वस्थ झाल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत शनिवारी झालेल्या कांदिवलीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सावंत उपस्थित होते. भातखळकर म्हणाले, स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरु केले आहे. त्यांनी मुंबईच्या…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क युवा सेनेच्या कामाला गती येण्यासाठी जेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक आहे तेथे, निश्चित बदल केला जाईल. मात्र ज्याचे काम चांगले आहे त्याचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी केले. साटम यांच्या उपस्थितीत शनिवारी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये युवा सेनेची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, कोपरगाव येथील युवा नेते भैय्या तिवारी, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, माजी शहर प्रमुख संजय…
रविवार विशेष | प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) ईडीच्या नाचऱ्या मोराला न्यायालयाने अद्दल घडवली हे बरंच झालं. आपल्या मर्जीला येईल तसा सरकारी यंत्रणांचा वापर करू शकतो, असा अहंगड भाजप नेत्यांच्या डोक्यात गेला होता. 2014 पासून हे नेते सुटल्यासारखे वागत होते. ईडी आणि सीबीआयचा कसाही वापर करायचा आणि विरोधकांचा आवाज दाबायचा ही विकृती भाजप नेत्यांनी जोपासली होती. यातून सत्ता आणि मत्ताही हाती लागते. हे त्यांना ठावूक होतं. 2014 ची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फोडून भाजपने अशीच ताब्यात घेतली होती. पुढे हा मार्ग एकहाती अनुसरला गेला आणि फोडाफोडीचं घृण कृत्य भाजपने अवसरलं. लाचार झालेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याव नोंद करण्याचे आदेश देण्यासाठी मॅडमनी एका मध्यस्थाच्या मार्फत तब्बल ५ लाखाची लाच मागितली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम ३ लाखावर आली आणि २ लाख रुपयांची रोकड स्विकारतांना मध्यस्थ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. मध्यस्थ जाळ्यात अडकताच तहसिलदार मॅडमच्या घरी लाच लुचपतने छापा टाकला आणि मॅडमलाही ताब्यात घेतले. नंतर मॅडमच्या घराची झडती घेतली असता तेथे ७५ हजाराची तर मुंबईतील विक्रोळी येथील घरात एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली. संपत्तीची मोजदाद सुरु केल्यानंतर मॅडमकडे तब्बल ६० तोळे सोने असल्याचे आढळून आले. एखाद्या सामान्य अधिकाऱ्याची ही कथा नाही तर ती आहे अलिबागच्या महिला तहसिलदारांची. मिनल कृष्णा दळवी…
