Author: अनंत पांगारकर

तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या समृद्ध सहकाराला अडचणीत आणणाऱ्या आणि पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय लवकरच समोर येण्याची चिन्हे आहे. न्यायालयाच्या निर्णयाची ठेवीदारांना प्रतीक्षा लागली आहे. यांच्यावर गुन्हा: गेल्या 30 वर्षांपासून संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचा चेअरमन व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब गायकवाड, छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दुष्काळात नागरिकांना पिण्याचे पाणी रोजगार हमीचे कामे आणि जनावरांना सारा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे त्यांनी ते केलेच पाहिजे, दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या, असे स्पष्ट करत दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा आणि राजकारण नको, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. उपस्थिती: आमदार थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे,…

Read More

सामान्यांचे सरकार भारीच… अधिकारी लोकप्रतिनिधीच नव्हे तर कोणालाही जुमानेना! प्रांताधिकारी, तहसीलदार आढावा बैठक सोडून पालकमंत्र्यांच्या बैठकीला… महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – राज्याचे माजी महसूल मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार या दोघा शासनाच्या प्रमुख प्रतिनिधींनीच दांडी मारण्याचा प्रकार समोर आला. टंचाई आढावा बैठक सोडून हे दोन्ही अधिकारी पालकमंत्र्यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने संगमनेरमधील दुष्काळाचे या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यामुळे थोरात देखील संतप्त झाल्याने त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. डझनभर टँकर सुरू: संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पठार भागामध्ये डझनभर टॅंकरने दुष्काळी जनतेला पाणीपुरवठा सुरू आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील दुरुस्तीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून त्यांनी सुचविलेल्या कामांसाठी सरकारच्या माध्यमातून निधी मिळवत संगमनेर तालुक्यातील वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या जात आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकास योजनांचा वेग सातत्याने मोठा राहिला आहे. रस्ते विकास व मजबुतीकरण: क्षेत्रफळाने मोठे असलेल्या संगमनेर तालुक्यातील 171 गावे व 250 च्या पुढे वाड्या-वस्त्या आहेत. यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामांसाठी हा निधी उपलब्ध झाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नाशिक चिट्स प्रायव्हेट लिमिटेड या सरकारमान्य भिशी कंपनीच्या थकलेल्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी व्यावसायिकाला दोषी ठरवत सहा महिन्याच्या कारावासाची व सत्तर हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ताहीर कादर बागवान असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून बागवान याने नाशिक चिट्स या कंपनीची 50 महिन्यांसाठी दरमहा दहा हजार रुपयांची मासिक भिशी सुरू केली होती. बागवान सक्सेसिव्ह बिडर ठरल्यानंतर त्याला प्राईज मनी म्हणून कंपनीने 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा धनादेश दिला होता. त्याबद्दल बागवान आणि कंपनीच्या लाभात प्रॉमिसरी नोट्स गॅरेंटी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहे. तामिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे क्रीडामंत्री तथा मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मविरोधी परिषदे’त ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांसारखा असून त्याचे उच्चाटन व्हायला हवे’, असे तारे तोडले. त्यानंतर द्रमुक पक्षाचे तामिळनाडूतील खासदार ए. के. राजा, काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी, अभिनेते कलम हसन, सिनेअभिनेता प्रकाशराज यांच्यासम महानुभवी मंडळींनी उदयनिधी यांची री ओढली. खरे तर हे ‘हेट स्पीच’ केल्याप्रीत्यर्थ उदयनिधी आणि तत्सम मंडळींना गजाआड करायला हवे होते; पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अर्थात सनातन धर्मात ‘कर्मसिद्धांत’…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो राज्यात सध्या निर्दोषांचं चांगभलं सुरू आहे. सरकारचं कोडकौतुक करा आणि आपल्या पापांपासून मुक्तता मिळवा, असा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. ज्यांना कोडकौतुक करायचे नसतील त्यांनी विरोधकांप्रती आपला राग व्यक्त केला तरी पुरेसं आहे. आपल्यावरचे दोष धुवून निघतील. आणि सत्तेत सहभाग घेतला तर उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्रीपदाचं बक्षिसही मिळेल. आजच्या सत्तेची हीच परिभाषा आहे. कायद्याचं न्यायालय अथवा लोकांचं न्यायालय काहीही बोलोत, त्यांनी कितीही शेरेबाजी करो त्यामुळे सत्ता काही सोडावी लागत नाही, हे सत्ताधार्‍यांना ठावूक आहे. लोक फारकाळ विचार करत नाहीत. अशावेळी त्यांची बुध्दीही क्षणिक काम करत असते. तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे आणि त्यांच्या मतांना तितकं…

Read More

खासदार शरद पवार व डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार वितरित महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यांनी पुरस्कार स्वीकारला: पुणे येथे झालेल्या को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने भारतात सहकारातून वीज निर्मितीसाठी काम करणाऱ्या कारखान्यांचा गौरव देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्यावतीने अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी स्वीकारला. उपपदार्थ निर्मिती: काँग्रेस पक्षाचे नेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तीन वर्षापूर्वी त्याने तिला पळवून आणत तिच्याशी म्हसोबा मंदीरात लग्न करून नोटरी करीत बायकोचा दर्जा दिला. आणि तिनेच साथीदाराच्या मदतीने नवऱ्याची गळा चिरून हत्या केल्याचा गुन्हा संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. संगमनेर शहरालगत संगमनेर खुर्द शिवारात प्रवरा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना समजली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना हा मृतदेह मारुती आबा डामसे (वय 41 वर्ष, रा. कोपरे ता. जुन्नर जि. पुणे हल्ली रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर) याचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी नदीपात्रालगत खडकावर मृत मारुती आबा डामसे याच्या चपलालगत रक्ताचे…

Read More

अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण; उत्तरेतील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर नगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे शुक्रवारी (15 सप्टेंबर) लोकार्पण झाले. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे, अशी‌ माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली. शिर्डी येथे उत्तर नगरमधील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते‌. कार्यक्रमाच्या…

Read More