Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज एका विशेष कारवाईमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोंगाट करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत तब्बल 16 लाख 9 हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करून दंड वसूल करत असताना संगमनेरात मात्र अशा पद्धतीने वेगवेगळे आवाज काढत सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या बुलेटस्वारांना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत आहे. असे निघतात आवाज: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 1 जानेवारी ते 15 ऑगस्टदरम्यान ही कारवाई केली. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांसह काही टवाळखोरांमध्ये बुलेट, अथवा अशा आवाज करणाऱ्या दुचाकींची क्रेझ पाहायला मिळत आहे. दुचाकी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर टाकून दुचाकीचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवारांवर चढवला आहे. स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री: वळसे पाटील मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही. भाजप सोबत का:…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेनेने खासदारकीची संधी दिल्यानंतर शिवसेनेसोबत गद्दारी करत अपक्ष-भाजप असा प्रवास करीत पुन्हा उमेदवारीसाठी शिवसेनेत येण्याच्या तयारीत असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाला उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्धव साहेब! “आम्हाला गद्दार नको, निष्ठावंत हवा” असा आवाज देतानाच नगर दक्षिणेतील त्या नाराज पदाधिकाऱ्याने उत्तरेत वाद लावण्याचे काम करू नये, असा सल्लादेखील देण्यात आला. जागा गमावण्यासाठी नाराजांची खेळी: राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्याने माजी खासदार 2024 च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा शिवसेना प्रवेशाच्या तयारीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातील पंतप्रधानांचं भाषण कसं नसावं, याचं उत्तम उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी यांच 15 ऑगस्टच्या मंगळवारी पार पडलेलं लाल किल्ल्यावरचं भाषण म्हणता येईल. या पीठावरून द्यायच्या भाषणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे कोणाची उणीदुणी काढायची नसतात. माझा देश पुढे कसा गेलाय आणि त्याच्या आगामी वाटचालीचा आलेख पंतप्रधानाने द्यायचा असतो. देश विदेशातील पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावतात. यामुळे तर प्रमुखाची जबाबदारी आणखी वाढत असते. पाहुण्यांच्या समोर आपलं आणि आपल्या देशाचं हसं होऊ नये, इतकी समज राष्ट्रप्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी दाखवली पाहिजे. पण स्वत:वरचा विश्वास उडाला की माणूस बेफिकीर होतो, तोल सुटलेल्या माणसासारखं भाषण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन पुरस्कार – 2023 जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी दिली आहे. वाटचाल: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर मधील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक, चीफ अकाउंटंटसह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली. अटक केलेल्या चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने सहा दिवसांची (24 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. छापा सत्रात कागदपत्रांची पडताळणी सुरू: बँकेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह अन्य आरोपी पसार झाले असून पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान सकाळपासून पोलिसांच्या चार पथकांनी अध्यक्ष कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्या घरी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. आक्षपार्ह आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एका अल्पवयीन मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्या मुलीबरोबर बोलायचे आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर मिळवला. नंतर त्या अल्पवयीन मुलीशी फोनवरून संपर्क साधत तिची फसवणूक करत लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. सदर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. असा प्रताप करणाऱ्या तरुणाविरुद्ध जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. ओतूर पोलिसांकडून गुन्हा वर्ग: प्रवीण जाधव (अंबेगव्हाण, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा दिनांक ९ जून रोजी २०२३ रोजी घडला असून ओतूर पोलीस…
बहुचर्चित अपहारप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चौघे अटकेत, अनेक जण गायब, पोलिसांकडून शोधमोहीम सुरु संगमनेरच्या दिशादर्शक सहकारावर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारातील बहुचर्चित ठरलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अखेरीस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील नावाजलेली आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरच्या सहकारावर प्रश्नचिन्ह: या प्रकरणात नाशिकच्या सनदी लेखापालानेही सहकार्य केल्याने त्याच्यासह चार जणांना अटक…
महाराष्ट्र संवाद न्यूज कोपरगाव – तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौणखनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा एक जेसीबी तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने जप्त केले आहेत. साठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात: कोपरगांव तालुक्यातील मुर्शतपुर शिवारात अवैधरित्या गौनखनिज (वाळू ) वाहतूक करणारा अंदाजे २० लक्ष प्रती हायवा प्रमाणे दोन हायवा ४० लक्ष रुपये आणि जेसीबी अंदाजे २० लक्ष रुपये असे एकूण ६० लक्ष रुपयांची वाहने जप्त केली आहे. पथकात यांचा समावेश: तहसीलदार संदिपकुमार भोसले यांचे पथकात तलाठी गटकळ, शिपाई रामदास माळवदे, भाऊसाहेब माळी, कोतवाल साहेबराव रणशूर यांचा समावेश होता. चौकशी करणार: अवैधरित्या गौनखनिज उपसून नेमका कोणत्या बांधकामावर जातो आहे. याची चौकशी केली…
महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा – आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र खरे जुने गिऱ्हाईक दिसेना. भारतीय जनता पक्ष बाबतचा केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी यांचे हे विधान चांगलंच चर्चेत आल आहे. बदलत्या परिस्थितीवर भाष्य: गडकरी शुक्रवारी बुलढाणा येथे बोलत होते. त्यांनी भाजपच्या आजच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, दुकान चालायला लागत तेव्हा दुकानात गिऱ्हाईकांची कमी नसते. मात्र या गदारोळात खरं जुन गिऱ्हाईक दिसत नाही. माझ्यासारख्या लोकांनी कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की, “आज आम्ही जरी शिखरावर असलो, तरी सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतल नसतं, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला…
