Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. या कार्डच्या माध्यमातून त्याचे वर्षभराचे दुधाचे प्रगती पुस्तक समोर असेल. याशिवाय अन्य माहिती त्याला उपलब्ध होणार आहे. देशमुख यांच्या हस्ते कार्ड वितरण: राजहंस दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे करण्यात आला असून येथील कृषीकन्या सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांचे हित जोपासले: देशमुख म्हणाले, कॉंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – योगासन, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला हजारों वर्षांची परंपरा आहे. ब्रिटीशांनी आपल्याला क्रिकेटचा खेळ दिला, त्याबदल्यात भारताने योगासनांच्या माध्यमातून जगाला रिटर्न गिफ्ट दिले आहे. राज्य शासनाने योगासनांचा समावेश आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये केल्याने भविष्यात या खेळातून पुढे येणार्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी प्राप्त होतील,असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. स्पर्धा शुभारंभ: संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीत झाला, याप्रसंगी ते बोलत होते. यांची होती उपस्थिती: शुभारंभावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडाधिकारी भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी दाखल असलेल्या तीन खटल्यांमध्ये डॉक्टरला पन्नास लाख रुपयांचा दंड आणि वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. डॉ. शितल स्वरूपचंद ओसवाल असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. यांची होती तक्रार: लॅब टेक्निशियन असलेल्या अनिल तोताराम शिरसाळे यांनी याप्रकरणी धनादेशाचा अनादर केल्याच्या कारणावरून ओसवाल यांच्या यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जळगावच्या प्रथमवर्ग न्यायाधीश जान्हवी केळकर यांच्यासमोर हा घटना सुरू होता. अधिक माहिती अशी: जळगावच्या गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शितल स्वरूपचंद ओसवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये 2002 पासून लॅब टेक्निशियन म्हणून अनिल तोताराम शिरसाळे आणि त्यांच्या पत्नी काम काम पाहत होते. या दोघांच्या पगारापोटी डॉ. ओसवाल यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज भंडारदरा – भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवाची बुधवारी आदिवासी बोहाडा नृत्याने शानदार सांगता झाली. या पाच दिवसांमध्ये पर्यटकांनी निसर्गरम्य परिसराच्या भेटी सोबतच आदिवासी पारंपारिक लोककलांचा आस्वाद घेतला. त्यामुळे हा पर्यटन महोत्सव यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केली. पाच दिवस सुरू होता महोत्सव: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि घाटघर या अतिशय निसर्गरम्य परिसरात गेल्या पाच दिवसांपासून राज्य पर्यटन विभागाच्यावतीने वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये स्थानिक कलावंतांच्या आदिवासी नृत्याबरोबरच बांबू पेंटिंग आणि आदिवासी वारली पेंटिंग या विषयांवरील कार्यशाळांना पर्यटकांनी उत्तम…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुरुवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2500 ते 2965 रुपयांचा बाजारभाव मिळाला. याशिवाय बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक देखील झाली असल्याची माहिती देण्यात आली. कांद्याला मिळाला हा बाजार भाव: बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2500 ते 2965 रुपयांचा, तर दोन नंबर कांद्याला 2000 ते 2400 रुपयांचा, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपयांचा व गोल्टी कांद्याला 175 ते 900 रुपये भाव मिळाला आहे. डाळिंबाची मोठी आवक: डाळिंबाचे देखील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून एक नंबर डाळिंबास प्रति किलो 145 ते 200 रुपयांचा, दोन…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – शासनाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तब्बल 43 लाख रुपयांच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आणण्यास अहमदनगरच्या गुन्हे शाखेला यश आले. गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन या टोळीचा छडा लावला. तसेच चोरी गेलेल्या पाइपापैकी सुमारे 35 लाख रुपये किमतीचे पाईप हस्तगत करण्यात यश मिळाले. काय होती घटना: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व वीस गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. या कामावरील 43,05,523/- रुपये किमतीचे लोखंडी पाईप कोणीतरी चोरून नेले. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्यामार्फत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे साईट इंजिनिअर…
अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख लाभार्थी, राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ: शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. यांची उपस्थिती: यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशोत्सवात कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखाच आहे. त्याच पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. एक दिवस तुमचा तर उरलेले 364 दिवस आमचेच आहेत, असा सज्जड इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी साऊंड ऑपरेटर चालक-मालकांना दिला आहे. बैठक: गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील गणेश मंडळ तयारीला लागले असून त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील साऊंड मालक-चालक, ऑपरेटर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पंडित बोलत होते. सहकार्याचे आश्वासन: यावेळी कोल्हापूर जिल्हा साऊंड ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल असे सांगण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपण राष्ट्राविषयी अभिमान बाळगून या भारतमातेची सेवा केली पाहिजे. राजमाता जिजाऊ या उत्कृष्ट प्रशासक, न्यायाधिश, शूरवीर, प्रखर राष्ट्रभक्त, संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या. त्यांचा आदर्श आजच्या तरूण मुली आणि महिलांनी अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रखर वक्ते सुनील देवधर यांनी केले. यांची होती उपस्थिती: ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये देवधर यांनी ‘राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानासाठी संगमनेरमधील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, सुदीप हासे, शिवबच्चन गौड, अतुल अभंग, महेश लाहोटी, राजेश लाहोटी, अजित माळी, सौरभ कश्यप,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुरुवारी शिर्डी मध्ये होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या संगमनेर डेपोतील तब्बल 62 एसटी बसेस या सरकारी कार्यक्रमाच्या दिमतीला देण्यात आल्या आहे. त्यामुळे या बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याने गुरुवारी विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 16, 17 ऑगस्टला होणार गैरसोय: दरम्यान संगमनेर डेपोतून 16 ऑगस्टला अन्य ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आले असून 17 ऑगस्टला देखील या बसेसच्या फेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयात जायचे नाही का: शासन आपल्या दारी या…
