Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे येथील आठ तरुणांवर झालेला प्राणघातक हल्ला, त्यानंतर त्याचे जोर्वे गावात उमटलेले पडसाद, शहरातील भगवा मोर्चा नंतर समनापुर गावात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर झालेली दगडफेक प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक ढुमणे यांची नगर कंट्रोलला तडकाफडकी महिनाभराच्या आतच बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तीन महिन्यांसाठी सोपविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वमने यांनी तालुका पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली. जोर्वे येथील तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्ढावलेल्या दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आव्हान देतानाच सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली. संगमनेरमध्ये दागिने आणि दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उपविभागाचा पदभार घेतलेल्या उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी देखील चोरांचा अद्याप शोध लावू शकलेले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात निश्चितच पाणी कुठेतरी मुरतंय असे दिसते. या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा विशेषतः कर्मचाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हेगारीचे माहेरघर झालेल्या संगमनेरमध्ये दागिने चोरीचा सिलसिला सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रात्री जेवणानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत धूम स्टाईलने पोबारा केला. या प्रकारामुळे दागिने चोरीच्या घटनेत आणखी एका गुन्ह्याची वाढ झाली. बस स्थानकापासून जवळच असलेल्या पावबाकी रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात जानकीनगरमध्ये दूधगंगा पतसंस्थेजवळ राहणाऱ्या सविता शशिकांत मुळे वय 65 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध विक्रेते असलेले शशिकांत मुळे हे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर पत्नी सविता यांच्यासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. पावबाकी रस्त्याने फिरत असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त १२ ते २६ जूनपर्यंत ‘नशामुक्ती भारत पंधरवडा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत जिल्हाभर व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे. भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अंमली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -रविवारी आळंदी येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याविरोधात सोमवारी सकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेने (ठाकरे) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निषेध आंदोलन केले. शिवसेना वारकरी भजनी मंडळाच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ व राजीनामाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानकासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते. रविवारी आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज “तुझा लवकरच नरेंद्र दाभोळकर होणार”, अशी धमकी शरद पवारांना देणाऱ्या सागर बर्वेच्या मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुसक्या आवळल्या आहे. बर्वे ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने फेसबुक पेज चालवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून ही धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. “शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार”, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम शंभर टक्के बँकेची वसुली दिली आहे. शून्य टक्के व्याज देण्याच्या जिल्हा बँकेच्या निर्णयातून संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज फेड करणाऱ्या 45019 सभासदांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रू व्याज सवलत मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श परंपरा लाभलेल्या संगमनेर तालुक्याने जिल्हा बँकेची कायम शंभर टक्के वसुली दिली आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर…

Read More