Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. सशक्त तरुण पिढी घडविण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने काम केले असून मेधा सांस्कृतिक महोत्सवांमधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवातील अमृत कला मंच या ठिकाणी झालेल्या युवा संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विश्वस्त शरयू देशमुख होत्या. व्यासपीठावर, कार्पोरेट ट्रेनर डॉ. रत्नाकर आहिरे, रेडिओ जॉकी अक्षय, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ.…
रविवार विशेष लेख ● प्रवीण पुरो राजकारणात काही व्यक्तींची निर्मिती ही केवळ वादळ निर्माण करण्यासाठीच असते, असं म्हणतात. त्यात ती व्यक्ती प्रशासनाचा भाग असेल तर वादळांची काही कमी नाही. जेव्हा तेव्हा वादळं येतातच. नुकतेच राजीनामा देऊन घरी गेलेले एकेकाळचे संघ प्रचारक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची झिंग अजूनही उतरलेली दिसत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री अशी पदं भूषवून निवृत्त झालेल्या जबाबदार व्यक्तीने त्या काळातील सामान्य गोष्टींची फार वाच्यता करू नये. त्या पदाच्या गरीमेला ते शोभा देत नाही. तसं नसतं तर निवृत्त झालेल्या राष्ट्रपतीने आपल्या जीवनातील अनेक किस्से ऐकवले असते. राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही मागे राहिले नसते. संकेत आणि संस्कृतीचा तो…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबईचे डॉक्टर संगमनेरमध्ये येत असून मी त्यांच्याकडे जाऊन येतो, असे सांगून गेलेला तरुण बराच वेळ झाला तरी देखील तो घरी न परतल्याने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील महेश किसन येवले हा २९ वर्षीय तरुण २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची नोंद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोळवाडे आश्रम शाळेत नोकरी करणारे महेश येवले याचे काका संपत मालुंजकर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. मालुंजकर यांनी म्हटले आहे की, त्यांचे साडू किसन मारुती येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांचा मुलगा महेश येवले हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून त्याच्यावर उपचार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नगर सीए शंकर अंदानी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालय ही जगातील सर्वोच्च संस्था आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे या संस्थेचे प्रमुख आहेत. जगातील सर्व स्तरातील उत्कृष्ट कार्य व सेवा करणाऱ्या अत्यंत मोजक्या व ठराविक व्यक्तींनाच हे कार्यालय मानाचा पुरस्कार देवून सन्मानित करत असते. यासाठी पुरस्कारार्थीचे कार्य व कामकाजाची पूर्ण छाननी व तपासणी करते. सीए शंकर अंदानी यांनी जगातील २५१ सामाजिक संस्था, मंदिर, चर्च व दर्गा यांचे कर सल्लागार व लेखा परीक्षक म्हणून योग्य पद्धतीने काम केले आहे. सेवा जात व धर्मा पलीकडे जावून ही जागतिक…
प्रयोगशील जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार : मुजीब शेख महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेली खरी शिवसेना नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी करणार असल्याचा आशावाद सातव्यांदा झालेले शहर प्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी शहरप्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकारी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील दिवेकर, प्रकाश क्षत्रिय, दीपक साळुंके, जगूभाऊ निकम यांच्यासह रावसाहेब गुंजाळ यांच्यासोबत काम केलेले अनेक ज्येष्ठ शिवसैनिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वृत्तपत्रे संपादक पत्रकारांच्या अन्यायाविरोधात आता 20 मार्च 2023 पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली. महाराष्ट्रातील छोटी वृत्तपत्रे, संपादक व पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड देऊन खडतर वाटचाल करावी लागत आहे. कागद व मुद्रण साहित्याचे भडकलेले दर व प्रचंड महागाईने त्रस्त असतांना महाराष्ट्र सरकारचे छोटी वृत्तपत्रे व त्यांच्या संपादक पत्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था हजारो संपादक पत्रकारांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यांतर्गत असणार्या मुदत संपलेल्या विविध समित्यांची पुर्नरचना करावी. अनावश्यक व जाचक अटी काढून टाकाव्यात. कृतीशील…
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांची धमाल
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरलेल्या सांस्कृतिक मेधा २०२३ महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा कलाकार श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या समवेत अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल केली. संगमनेरमधील अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या मेधा मैदानावर सुरू असलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधा समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, शितल गायकवाड,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नैराश्याचा रंग हा काळा असून हे नैराश्य दूर करण्यासाठी स्वतः प्रकाशमान व्हा. स्वतःमधील गुण ओळखून प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार केल्यास नवनिर्मिती होईल आणि हाच सकारात्मक विचार तुमच्या जीवनात यश मिळवून देईल, असा मौलिक विचार आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी दिला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सवात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, आध्यात्मिक व कार्पोरेट प्रबोधनकार डॉ. पंकज गावडे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले: काँग्रेस पक्षात आता परत नको, झाला अन्याय आता ठीक आहे, पक्षापेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगारासाठी कामं करू, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी करीत काँग्रेसमध्ये परत जाण्याचा मार्गाला पूर्णविराम दिला. कळस बुद्रुक येथे आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अर्थ, बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाईचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे, वीज कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम वाकचौरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेरमधून विविध कंपन्यांचे बिस्किटांचे बॉक्स घेऊन आळेफाटाच्या दिशेने जाणारा टेम्पो नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारामध्ये आडव्या जाणाऱ्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने टेम्पोसह बिस्किटांचे नुकसान झाले आहे. नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक माहुली गावच्या शिवारात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी देखील टेम्पो चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चालक या अपघातातून बचावला. विलास श्रीपती मांजरे (रा. मांजरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये संगमनेरमधून विविध कंपन्यांची बिस्किटे घेऊन गुरुवारी रात्रीच्या वेळी आळेफाटाच्या दिशेने जात असताना रात्री नऊ…
