Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते महाराष्ट्रात ३८,८०० कोटींपेक्षा जास्त विकासकामाकांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोसुद्धा करणार आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या मुंबई दौऱ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत येतील. तर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मेट्रो मार्ग २ ए आणि ७ चं उद्घाटन करतील. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये जवळपास एक लाख लोक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : साकुर-शिबलापुर रस्त्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा बछड्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला नसून तरसाच्या हल्ल्यात झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी साकुर शिबलापुर रस्त्यावर जिजाबा नागरे यांच्या शेतजमिनीलगत बिबट्याचे एक पिल्लू झोपलेल्या आवश्यक दिसले. त्यामुळे नागरिकांनी थोडे जवळ जात त्याचे निरीक्षण केले असता त्याच्या तोंडातून रक्तस्राव झाला असल्याचे आणि तो मृत असल्याची शंका आल्याने याची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे बछडे चार महिने वयाचे असल्याचा आणि त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. मृत बछड्याला ताब्यात घेत त्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे तपासणी केली असता या बछड्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात वेग घेतला असतानाच एकापाठोपाठ एक शिक्षक संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस नेते आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. यापूर्वी तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना संगमनेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. अपघातामध्ये दोघाही मजुरांचा मृत्यू झाला. संगमनेर शहराबाहेरून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावून काही मजूर हे काम करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालपाणी इस्टेट जवळ या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने डिव्हायडरला लावलेले बॅरिकेट तोडून रस्त्यावर काम करणाऱ्या गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) यांना गंभीर जखमी केले. अपघातात दोघेही मजुरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / संगमनेर : नगर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांनी आपल्या जागेवर परस्पर डमी बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचे, तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली. सीईओ येरेकर यांनी यासंबंधीचे आदेश मंगळवारी काढले आहेत. या शिक्षकांच्या धक्कादायक करामती यामुळे समोर आल्या आहेत. यांच्यावर झाली कारवाई उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई – नासिक पदवीधर मतदार संघामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण फारसे समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाली आहे. नासिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे यांनी उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करणे, उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत असलेल्या दोन गटातील मतप्रवाहांचे जाहीरपणे प्रदर्शन होणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगणे यासह कारणा निमित्ताने काँग्रेसमधील वादही चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचे कुटुंबीय व काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशा अन्वये २९ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / अहमदनगर : ३० जानेवारीला होणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसले तरी देखील अपक्ष म्हणून दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पक्षीय उमेदवारीची सस्पेन्स मुव्ही अद्यापही सुरू असली तरी त्यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने आपला पाठिंबा दर्शविला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांना निवडणुकीत पहिली पसंती दर्शविण्याचे आवाहन शिक्षकांच्या मस्ट या संघटनेने केले. महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शहरानजीकच्या वडगाव पान येथील एका लॉजवरील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकांनी सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. कारवाई पोलिसांना येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे संगमनेरमध्ये सर्रासपणे लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांवर अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. शहरालगतच्या वडगाव पान शिवारामध्ये वडगाव पान फाटा ते कोपरगाव रोडलगत असलेल्या हॉटेल विशाल गार्डनच्या मागे साईमाया लॉजमधील खोलीत हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना…

Read More