Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी राम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागामुळे शोभा यात्रेची रंगत आणखी वाढली होती. श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेला अभिनव नगर मधील श्रीराम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान चालीसा व आरतीने सुरुवात करण्यात आली. गीता परिवाराच्यावतीने यावेळी हनुमान चालीसांचे वाटप करण्यात आले. बस स्थानक परिसरात रामराज्य प्रतिष्ठानने केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी संगमनेरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नाशिकच्या नवरचना माध्यमिक विद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख आणि संगमनेर स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी शकुंतला मुदलियार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केले आहे. त्यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ. रुपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी प्राप्त केली. याबद्दल शकुंतला मुदलियार यांचे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तासिलदार, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भावे, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. प्रोफेसर गायकवाड म्हणाले, शकुंतला मुदलियार यांनी विद्यार्थी दशक संगमनेर महाविद्यालयात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: मीटरमध्ये छेडछाड केल्याने तपासणीसाठी नेलेले मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी वरिष्ठ उप अभियंता कोपनर यांच्याकरिता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता विरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कमलेश युवराज पवार वय २९ वर्ष, मुळ रा. प्लॉट नं. १२०, सी २ भवनच्या पाठीमागे, खुटवडनगर, नाशिक हल्ली रा. शुभ रेसीडेंसी, नवले नगर, पारिजात चौक, सावेडी, अहमदनगर असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे (वर्ग दोन) नाव आहे. लाचखोर कमलेश युवराज पवार हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या चिचोंडी पाटील येथील सब स्टेशनमध्ये कार्यरत असून तक्रारदाराचे अंभोरा, ता.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आजचं वास्तव हे दुभंगलेलं नसून भंगलेलं आहे. त्याचे अनेक तुकडे झालेले असून विस्कळीत आणि भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न करणं हे या कादंबरीचं विधान आहे. आपल्या भोवतालच्या वर्तमानाचा अर्थ न लागणं, नीट न समजणं, यातून अतिरेकी संताप होऊन त्या संतापातून वाट काढत आपण स्वतःशी बोलणं. आपल्या मनातील प्रश्नांचे खांब घेऊन त्यावर वास्तू तयार करणे आणि त्या वास्तुत आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे वास्तुशिल्प तयार करणे होय. अशा प्रकारचे वास्तुशिल्प “कोलाज” या कादंबरीतून डॉ. लिंबेकर यांनी तयार केल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. डॉ. अशोक लिंबेकर लिखित “कोलाज : संभ्रमाचे वर्तमान” या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजी नगर : बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत घोषणाबाजी झाल्याने खासदार बैठकीतून निघून गेले. दोन गटांमध्ये भांडणात जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली. तसेच दगडफेकीचा देखील प्रकार घडला. संतप्त जमावाने पोलिसांचे देखील वाहन जाळले. रात्री झालेल्या या दंगलीनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, शांतता निर्माण व्हावी, यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील या बैठकीसाठी आले असता, बैठकीत उपस्थित असलेल्या काहींनी ‘जय श्रीराम’ नावाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील बैठकीतून निघून गेले. दरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजीनगर: “छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझी विनंती आणि आवाहन आहे की, इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करतो. आत्ताही शांतता राखा आणि उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे.” असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. श्रीराम नवमीच्या आदल्या रात्री बुधवारी (ता. २९ मार्च) छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. यामध्ये १३ वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तर काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली. याप्रकरणी आता ४०० ते ५००…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑक्टोंबर 2022 मध्ये निळवंडे चे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कालव्यांची कामे दिवस-रात्र सुरू ठेवली. मात्र सरकार बदलले आणि ही कामे थंडावली आहे. मात्र या कामांमध्ये कोणी कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी धरणाचे पाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारच आहे, असा दृढ विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची गुरुवारी रामनवमीच्या दिवशी सांगता झाली. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, दूध संघाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागपूरमध्ये फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून Tv-9 वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या बनावट ट्वीटर अकाऊंटवरुन देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांनाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट बनवले. त्यानंतर या बनावट खात्यावरून त्याने एक पैशांची मदत मागणारी पोस्ट टाकली. एका मुलीला लिव्हर ट्रान्सप्लांटवरील उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा बनाव रचला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याच्या विश्वासाने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मोक्षदा पाटील यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अवकाळी पावसासह गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकाचे संगमनेर-अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने संगमनेर-अकोले तालुक्यामध्ये विविध भागात हजेरी लावली. शनिवारी दुपारी अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाठोपाठ गाराही पडू लागल्या. गारांमुळे बहुतांशी ठिकाणी स्नो फॉल जाणवत होता. गारांचा सडा नाशिक-पुणे महामार्गावर पडला होता. प्रचंड गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या…

Read More