Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा प्रकार अकोले तालुक्यात समोर आला आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या गायब झालेल्या मुलींचा शोध घेत आहेत. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कापड दुकानात काम करणारी अल्पवयीन मुलगी अनपेक्षितरित्या गायब झाली आहे. तर राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातील मंदिरामध्ये हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसात तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने व त्यांना अज्ञात व्यक्तीने पळविले असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केल्यामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेरच्या श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. इयत्ता पाचवीमधील चौदा तर इयत्ता आठवीमधील चार विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश असल्याची माहिती विद्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्य व जिल्हा पात्र विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून सर्वच्या सर्व अठरा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नील अमोल गायकवाड यांने ११ वा क्रमांक, नमिता मंगेश सांगळे हिने २६ वा क्रमांक, श्रद्धा योगेश दुर्गुडे हिने ३८ वा क्रमांक, दीपज्योत प्रदीप शेळके याने जिल्ह्यात ४७ वा क्रमांक, संस्कृती संदीप भोर हिने ५८…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संस्कार सचिन कडाळे (इयत्ता पाचवी), अनिष कैलास नेहे, प्रतीक्षा दत्तात्रेय गुंजाळ, निकिता रावसाहेब नेहे व साहिल राजेंद्र साळुंके (इयत्ता आठवी) अशी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. हे पाचही विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेचा (२०२२) निकाल नुकताच जाहीर झाला असून यात चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे २०२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारार्थीमध्ये संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांच्या इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकाचा देखील समावेश आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात संगमनेरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारात समावेश आहे. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची घोषणा शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली. पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने लेखक, कवी यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारीला साजरी होत आहे. या दिवशी नगरमध्ये अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध दैनिकांमध्ये कार्यरत असणार्‍या पत्रकारांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकारीता क्षेत्रात मोलाची कामगीरी बजावणार्‍या पत्रकारांना पत्रकारितेतील मान्यवरांच्या नावाने यावर्षीपासून स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार असल्याची माहिती अहमदनगर प्रेस क्बचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली. अहमदनगर प्रेस क्लबच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणार्‍या प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांबद्दल चर्चा करण्यात आली व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपसातील जागेचे वाद आणि सलूनचे दुकान तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार वाद झाले. पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या या वादामध्ये दोन्ही कुटुंबीयातील बावीस जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. राजेंद्र यादव सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गावी गेलेले असताना जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शासनाने गौण खनिजा संदर्भात केलेल्या जाचक नियम आणि कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय कोलमडून पडला असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पुरवठादार मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ७ डिसेंबर) या व्यवसायाशी निगडित पुरवठादार मजूर आणि कामगारांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे संपर्क कार्यालय असलेल्या यशोधन इमारतीपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून या क्षेत्राशी निगडित असलेले कामगार, मजूर, पुरवठादार यांची गेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छात्र भारती संघटना, परमपूज्य गगनगिरी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून रॅली देखील काढण्यात आली होती. गावातील शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह महिला, गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी गावातून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कामामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वाहतुकीस बंद आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्याने जवळच कमी उंचीचा कॉजवे पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेत गणपुले यांनी ही मागणी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेला हा पूल तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून मिळविलेल्या निधीतून या पुलाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दोघा वाळू तस्करांना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा. धांदरफळ खुर्द ता. संगमनेर) आणि अरबाज करीम शेख (रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी या दोघा वाळूतस्करांची नावे आहेत. सातत्याने वाळू तस्करी करताना आढळल्याने संगमनेर शहर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षकांमार्फत हे प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते. प्रांत अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भातील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही वाळू तस्करांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. राज्याचे महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर जिल्ह्यात वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले…

Read More