Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना फी साठी वेठीस धरले जात असल्याचा तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मधील शिक्षण सम्राटांनी विद्यार्थी पालकांना फी साठी वेठीस धरू नये, अन्यथा अशा शिक्षण संस्थांमधील भानगडी बाहेर काढण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे. कानकाटे यांनी म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू आहे. यादरम्यान संगमनेर मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणारे काही शिक्षण सम्राट, संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य नागरिकांना मुलांच्या फी करिता वेठीस धरत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून दादागिरीच्या पद्धतीने बोलत जर फी भरली नाही…
अहिल्यानगर, दि. २८ मार्च – राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राहुरी येथे दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत…
संगमनेर, दि. २८ मार्च – प्रतिनिधी संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित मोक्का खटल्याचा गुरुवारी (२७ मार्च) निकाल लागला. या खटल्यातील सर्व चारही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी संतोष शिवाजी जाधव, चंदर दादाभाऊ गाडे, संजय दत्तू धांडे आणि शरद बन्सी निचित यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(२), ३(४) प्रमाणे या आरोपींविरोधात कारवाई केली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तत्कालीन निरीक्षक निघोट यांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले…
अहिल्यानगर, दि. २८ मार्च – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ एप्रिल २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता राखण्यास…
मुंबई, दि. २८ मार्च – प्रतिनिधी मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘मंत्रालय सुरक्षा प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात चेहऱ्याद्वारे ओळख पटवून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ (Visitor Management System) म्हणजेच अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांना प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी: * अभ्यागतांना ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच विभागात आणि दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल. * मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे कोणतेही एक…
नाशिक, दि. २७ मार्च – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील ॲग्री हायटेक शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (वय ४०, रा. संगमनेर) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. कौटे यांनी ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची रक्कम…
संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी मार्च अखेर ऊन चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह इतर भागातून संगमनेर मध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहराध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी केली आहे. संगमनेर नगर परिषदेने एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात बहुतांश ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याचे एटीएम बसविले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होत नाही. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना अल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध…
सोलापूर, दि. २७ मार्च – प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही वडिलांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी न देणाऱ्या मुलाच्या नावावरील २२ गुंठे जमीन पुन्हा वडिलांच्या नावे करण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्यातील विशेषाधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे. अरण (ता. माढा) येथील २२ गुंठे जमीन मुलाच्या नावे करूनही तो आई-वडिलांना सांभाळत नव्हता. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी अरण येथील सोपान वासुदेव राऊत (वय ७०) यांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. पण, त्यावेळी देखील तो सुनावणीला हजर राहत नव्हता. निकालानंतर मुलाने सहा महिन्यात कधीही पोटगीची रक्कम न दिल्याने सोपान राऊत यांनी तत्कालीन प्रांताधिकारी कार्यालयात…
अहिल्यानगर दि. २६ मार्च – अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी कारवाई करत सचिन पांडुरंग खताळ या दुय्यम निबंधकाला ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी तक्रारदारांनी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांच्याकडे दिला होता. खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या…
नाशिक, दि. २६ मार्च – रोजगार हमी योजनेतील देयके मंजूर करण्यासाठी २ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या नाशिक येथील घरातून २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांची २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांची देयके प्रलंबित होती. ही देयके मंजूर करण्यासाठी पोतदार यांनी तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, विभागाने सापळा…
